शासन आपल्या दारी 167 लाभार्थ्यांना मिळाल्या दुय्यम शिधापत्रिका घरपोच लाभार्थ्यांमध्ये आनंद
शासन आपल्या दारी
167 लाभार्थ्यांना मिळाल्या दुय्यम शिधापत्रिका घरपोच
लाभार्थ्यांमध्ये आनंद
वाशिम दि.10(जिमाका) शिधापत्रिका हा शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना लागणारा महत्वाचा दस्ताऐवज.जर एखाद्या लाभार्थीची शिधापत्रिका गहाळ झाली किंवा फाटल्या गेली तर योजनांचा लाभ मिळणे लाभार्थ्यांना कठीण होते. रिसोड तालुक्यातील अशा लाभार्थ्यांना शिधापत्रिका देण्याचे काम " शासन आपल्या दारी " उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.9 जून रोजी रिसोड तालुक्यातील काही गावातील 167 लाभार्थ्यांना दुय्यम शिधापत्रिका देण्यात आल्या.यामध्ये 120 केशरी शिधापत्रिका आणि 47 पिवळ्या शिधापत्रिकाचा समावेश आहे.
रिसोड तहसीलदार श्रीमती तेजनकर यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून आवाहन करुन ज्यांच्या शिधापत्रिका गहाळ झाल्या आहे किंवा फाटल्या आहे,त्यांनी आपल्या रास्त भाव दुकानदाराकडे एक अर्ज भरून त्यासोबत शिधापत्रिकेची छायांकित प्रत,शिधापत्रिकेत असलेल्या सदस्यांची नावे आणि आधार क्रमांक मागविण्यात आले. त्यानुसार लाभार्थ्यांच्या प्राप्त अर्जावर श्रीमती तेजनकर यांनी तातडीने कार्यवाही करून 167 लाभार्थ्यांना दुय्यम शिधापत्रिकेचे वाटप संबंधित गावातील रास्त भाव दुकानदाराच्या माध्यमातून लाभार्थ्यांना घरपोच करण्यात आले.घरपोच दुय्यम शिधापत्रिका मिळाल्याने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसून आले.दुय्यम शिधापत्रिका तयार करण्यासाठी लाभार्थ्यांचा तालुक्याच्या ठिकाणी या कामानिमित्त होणारा खर्च व वेळ वाचण्यास मदत झाली आहे.
Comments
Post a Comment