मुलींची वसतिगृह : प्रवेश प्रक्रिया सुरु २७ जूनपर्यंत अर्ज मागविले
- Get link
- X
- Other Apps
मुलींची वसतिगृह : प्रवेश प्रक्रिया सुरु
२७ जूनपर्यंत अर्ज मागविले
वाशिम, दि. 23 (जिमाका) : अल्पसंख्यांक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी शहरातील सिव्हील लाईन भागात असलेल्या वसतीगृहामध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थिनींचे अर्ज महाविद्यालयामार्फत मागविण्यात येत आहे. या वसतीगृहात ७० टक्के जागा अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी, उर्वरित ३० टक्के जागा बिगर अल्पसंख्याक मुलींसाठी असतील. ७० टक्के जागेच्या प्रवेशाकरीता अर्ज प्राप्त न झाल्यास किंवा जागा शिल्लक राहिल्यास हया जागा बिगर अल्पसंख्याक मुलींमधून भरण्यात येतील.
वसतीगृहात मागील सत्रात राहत असलेल्या विद्यार्थिनींना नियमानुसार प्राधान्य देण्यात येईल. वसतीगृहात प्रवेश इयत्ता १२ वीच्या गुणांच्या टक्केवारीनुसार देण्यात येईल. वसतीगृहात प्रवेशासाठी विद्यार्थिनींना प्रत्येक सत्रासाठी २ हजार ८५० रुपये शुल्क आकारल्या जाईल. परंतू अल्पसंख्यांक कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लक्ष रुपयापेक्षा कमी असल्यास त्यांना शुल्क माफ असेल. विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या प्राचार्यामार्फत आले अर्ज व आवश्यक कागदपत्रे २७ जून २०२३ पर्यंत सादर करावे. प्रवेश प्रक्रीया ३० जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता राबविण्यात येईल. सर्व विद्यार्थीनींनी व पालक वर्गांनी वसतीगृहात उपस्थित राहावे. असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. गवलवाड यांनी केले आहे. प्रवेश प्रक्रीयेसंबंधी सविस्तर माहिती शासकीय तंत्रनिकेतन, वाशिमच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment