शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी पीक कर्जाचे नुतनीकरण करावेजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन




शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी

पीक कर्जाचे नुतनीकरण करावे

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

        वाशिम, दि. 26 (जिमाका) : येत्या खरीप हंगाम 2023-24 या वर्षात शेतकऱ्यांना विविध बँकांकडून पिक कर्ज वाटप करण्यात येत आहे. सन 2023-24 या वर्षात जिल्हयातील 1 लक्ष 31 हजार 388 शेतकऱ्यांना 1 हजार 404 कोटी 84 लक्ष रुपये खरीप पिक कर्ज वाटपाचे उदिष्ट दिले आहे. आज 26 जूनपर्यंत 92 हजार 626 शेतकऱ्यांना 913 कोटी 1 लक्ष 29 हजार रुपये खरीप पिक कर्ज वाटप केले आहे. जिल्हयातील नव्याने पिक कर्ज घेण्यास पात्र असलेले आणि नुतनीकरणापासून आजही दूर असलेल्या अशा एकूण 29 हजार 362 शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी पिक कर्जाचे नुतनीकरण करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

           खरीप पिक कर्ज वाटपाचे निर्धारीत उदिष्ट साध्य करण्यासाठी नवीन पिक कर्ज वाटप करणे तसेच पिक कर्ज वाढीसह नुतनीकरण करणे आवश्यक आहे. सर्व बँका पिक कर्ज वाटपासाठी गावोगावी शिबीरे घेत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या घरी जावूनसुध्दा पिक कर्जाचे नुतनीकरण करण्याबाबत आवाहन करीत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार अल्प मुदतीच्या पिक कर्जाची परतफेड 365 दिवसाच्या आत किंवा दरवर्षी 30 जून रोजी किंवा त्यापूर्वी केली पाहिजे. तेंव्हाच हे शेतकरी रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्जाच्या रक्कमेत वाढ करण्यास पात्र ठरतात.

           जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आणि केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत प्रत्येकी 3 टक्के व्याज सवलत मिळते. पिक कर्जाचे वेळेवर नुतनीकरण केल्यामुळे शेतकरी बँकांच्या इतर सुविधांचा लाभ घेऊ शकतात. तरी संबंधित शेतकऱ्यांनी 30 जूनपर्यंत पिक कर्जाचे नुतनीकरण करावे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे