कारंजा वसतीगृह प्रवेश अर्ज वाटप सुरु
- Get link
- X
- Other Apps
कारंजा वसतीगृह प्रवेश
अर्ज वाटप सुरु
वाशिम, दि. 09 (जिमाका) : कारंजा (लाड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह येथे शालेय, कनिष्ठ महाविद्यालय, व्यावसायीक महाविद्यालय व बिगर व्यवसायीक महाविद्यालयात रिक्त असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्टया मागासवर्ग, अनाथ, दिव्यांग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जागा भरावयाच्या आहे. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरीता इयत्ता 8 वी, इ. 11 वी, व्यावसायीक, बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या मुलांना वसतीगृहात प्रवेश देण्यासाठी अर्ज वाटप सुरु आहे. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी अर्ज वाटप सुरु राहील. ज्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात राहून पुढील शिक्षण घ्यावयाचे आहे. त्यांनी तात्काळ गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतीगृह यांचेशी संपर्क साधावा.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment