डव्हा तलाव मासेमारीसाठी संस्थांकडून अर्ज मागविले
डव्हा तलाव मासेमारीसाठी
संस्थांकडून अर्ज मागविले
वाशिम, दि. 27 (जिमाका) : जिल्हयातील डव्हा लघु पाटबंधारे तलाव 21 हेक्टर क्षेत्राचा आहे. हा तलाव 1 जुलै 2023 ते 30 जून 2028 या पाच वर्षाच्या कालावधीकरीता मासेमारी ठेक्याने देण्याचे प्रस्तावित आहे. जिल्हयातील नोंदणीकृत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांकडून तलावातील मासेमारी ठेक्याकरीता 28 जून ते 5 जुलै 2023 पर्यंत निविदा विक्रीसाठी उपलब्ध आहे. निविदा स्विकृत करण्याची, निविदा उघडण्याबाबत दिनांक व वेळ, निविदेच्या अटी व शर्तीविषयक माहिती ही कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे. असे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, वाशिम यांनी कळविले आहे.
*******
Comments
Post a Comment