आधारभूत किंमत खरेदी योजना शेतकऱ्यांनी 11 जूनपर्यंत चना विक्री करावी


आधारभूत किंमत खरेदी योजना 

शेतकऱ्यांनी 11 जूनपर्यंत चना विक्री करावी 

वाशिम दि.4 (जिमाका) केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हमी भावाने रब्बी हंगाम सन 2022-23 ची चना खरेदी सुरू आहे. केंद्र शासनाचे यापूर्वीचे 2 लक्ष 42 हजार 480  क्विंटल चना खरेदीचे दिलेले उद्दिष्ट संपले आहे. त्यामुळे शासनाने  84 हजार 66 क्विंटल चना खरेदीचे वाढीव उद्दिष्ट दिले आहे.
          ज्या शेतकऱ्यांनी चना पिकाची विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे,परंतु अद्यापही चना विक्री केली नाही,अशा शेतकऱ्यांना सब एजंट संस्थेमार्फत वाढीव चना खरेदीसाठी त्यांच्या मोबाईलवर एसएमएस पाठविण्यात आले आहे.ज्या शेतकऱ्यांनी चना विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे,त्यांनी संबंधीत चना खरेदी केंद्रावर पिकपेऱ्यानुसार प्रति दिवस 25 क्विंटल याप्रमाणे 100 क्विंटलपर्यंतच्या मर्यादेत चना विक्रीसाठी घेऊन जावा. 
         तरी चना विक्रीसाठी एसएमएस आलेल्या शेतकऱ्यांनी 11 जूनपर्यंत चना विक्री करावी.असे आवाहन जिल्हाधिकारी, वाशीम आणि जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर