धनगर समाजातील महिलांकरीता मार्जिन मनी योजना



धनगर समाजातील महिलांकरीता मार्जिन मनी योजना

       वाशिम, दि. 01 (जिमाका) : स्टॅन्ड अप इंडिया योजनेत धनगर समाजातील महिलांकरिता मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी केंद्र शासनाने तरतूद उपलब्ध केली आहे. सदर रक्कम SIDBI (Small Industries Development Bank of India) सिडबीकडे वर्ग केली आहे. सिडबीने या रकमेचे सुरक्षा हमी कवच तयार केले आहे. लाभार्थ्याना जे कर्ज दिले जाईल त्याला सिडबी हमी देईल. या योजनेंतर्गत राज्यातील धनगर समाजातील महिलांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅन्ड अप इंडिया योजनेअंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित Front End Subsidy १५ टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे.

         सदरचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या योजनेकरिता इच्छुक लाभार्थ्यांनी सर्व अटी व शर्तीची पूर्तता करून प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांचेकडे सादर करावा. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर