Posts

Showing posts from December, 2018

जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी लोकसहभाग वाढवा - शैलेश हिंगे

Image
‘सुजलाम सुफलाम वाशिम’ अभियान ·         ग्रामस्तरीय लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा ·         बीजेएसच्या १३ पोकलॅन मशीन जिल्ह्यात दाखल वाशिम ,   दि . २९ :   राज्य शासन व भारतीय जैन संघटना अर्थात बीजेएस यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम वाशिम’ अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत जिल्ह्यात अनेक ठिकाणी जलसंधारणाची कामे सुरु आहेत. जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी या अभियानात लोकसहभाग वाढवून जलसंधारणाच्या कामांना गती देणे आवश्यक असून याकरिता लोकप्रतिनिधी व ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले. नियोजन भवन सभागृहात आयोजित ग्रामस्तरीय लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा जलसंधारण अधिकारी एस. एस. सोळंकी, उपविभागीय कृषि अधिकारी दत्तात्रय चौधरी, बीजेएसचे जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा, जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांची उपस्थिती होती. श्री. हिंगे म्हणाले, ‘सुजलाम सुफलाम व

लाभार्थी बोलणार थेट मुख्यमंत्र्यांशी

Image
·         बुधवारी ‘ लोकसंवाद ’ ·         मोबाईल , लॅपटॉप आणि संगणकावर पाहता येणार वाशिम , दि . २८ : शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ ,   त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   ‘ लोक संवाद ’   साधून जाणून घेणार आहेत. बुधवार दि. २ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११ वाजता लाभार्थी आणि मुख्यमंत्री यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणारा थेट लाईव्ह संवाद मोबाईल , संगणक , टॅब आणि लॅपटॉपवरही पाहता येणार आहे. हा थेट लाईव्ह संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या   devendra.fadnavis   या फेसबुक पेजवर , Dev_Fadnavis   या ट्विटर हॅण्डलवर आणि   Devendra.Fadnavis   या यु ट्यूब चॅनलच्या माध्यमातून तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या   facebook.com/MahaDGIPR   या फेसबुक पेज आणि   youtube.com/maharashtradgipr   यु ट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी व ग्रामीण) ,   उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना ,   छत

मतदान यंत्राबाबत मतदारांमध्ये विश्वास निर्माण करा - जिल्हाधिकारी लक्षीनारायण मिश्रा

Image
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यशाळा   वाशिम , दि . २६ : निवडणूक प्रक्रियेत मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनबाबत साशंकता आणि  संभ्रम आहे. त्यांच्या शंका आणि संभ्रम दूर करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत नव्यानेच वापरण्यात येणाऱ्या व्हीव्हीपॅट मशीन आणि ईव्हीएम मशीन या दोन्हीच्या माध्यमातून मतदानाची प्रात्यक्षिके दाखवून आणि याबाबत योग्य माहिती देवून मतदारांमध्ये विश्वास निर्माण करा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले. २६ डिसेंबर रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिमेतील पथकांसाठी आयोजित कार्यशाळेत जिल्हाधिकारी मिश्रा बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश्वर हांडे, वाशिमचे उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख, कारंजाचे उपविभागीय अधिकारी शरद जावळे, मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले, जनजागृती मोहिमेसाठी गठीत करण्यात आलेल्या पथकांनी गावकऱ्यांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या माध्यमात

‘वत्सगुल्म ग्रंथोत्सव २०१८ ’चा समारोप

Image
वाशिम , दि . २३ : राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या ग्रंथालय संचलनालयाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित दोन दिवसीय ‘ वत्सगुल्म ग्रंथोत्सव २०१८ ’ चा आज समारोप झाला. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालय चळवळीतील प्रा. कमलाकर टेमधरे होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्र. म. राठोड, जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह प्रभाकर घुगे, राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालयाचे सचिव माधवराव शेवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रा. टेमधरे म्हणाले, ग्रंथ हा माणसाचा सर्वात चांगला गुरु असतो. ग्रंथ वाचनामुळे आपल्याला ज्ञान मिळते आणि या ज्ञानामुळेच आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. या आत्मविश्वासाचा जोरावर आपण जीवनातील संकटांचा सामना करू शकतो, जीवनात यशस्वी होऊ शकतो. आज विविध कारणांमुळे लोक वाचनापासून दुरावले असले तरी ग्रंथांचे महत्त्व सदैव कायम राहणार आहे. आजच्या तरुण पिढीला ग्रंथ वाचनाची आवश्यकता आहे. त्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळण्यासाठी त

ग्रंथ वाचनामुळे माणूस घडतो - धोंडूजा इंगोले

Image
·         ‘वत्सगुल्म ग्रंथोत्सव’चे उद्घाटन ·         विविध ग्रंथ एकाच ठिकाणी खरेदी करण्याची संधी वाशिम , दि . २२ : जीवनात ग्रंथ महत्वाची भूमिका बजावू शकतात. ग्रंथ वाचनामुळे माणूस ज्ञानसमृद्ध होतो. त्याची माणूस म्हणून जडणघडण होते. त्यामुळे प्रत्येकाने ग्रंथ वाचनाची आवड जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक धोंडूजा इंगोले यांनी केले. जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित ‘वत्सगुल्म ग्रंथोत्सव २०१९’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे हे होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्र. म. राठोड, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रमेश काळे, प्रमुख कार्यवाह प्रभाकर घुगे, डॉ. सीताराम नालेगावकर यांची उपस्थिती होती. श्री. इंगोले म्हणाले, ग्रंथ हा उत्तम गुरु असतो. ग्रंथ वाचनामुळे आपल्याला वेगवेगळ्या विषयांमधील ज्ञान संपादन करणे शक्य होते. कोणत्याही प्रकारचा ग्रंथ हा आपल्या अनुभवात नवीन भर टाकत असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ग्रंथ वाचनाची आवड जोपासली पाहिजे. ग्रंथ वाचनामुळे

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत जिल्ह्यात राबविणार जनजागृती मोहीम

Image
वाशिम , दि . २१ : लोकशाही व्यवस्थेत मतदान प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएम मतदान यंत्रासोबतच वापरण्यात येणाऱ्या व्हीव्हीपॅट या नवीन यंत्राच्या वापराबाबतची माहिती देण्यासाठी जिल्ह्यात २६ डिसेंबरपासून जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट याबाबतची माहिती प्रत्येक मतदाराला व्हावी, यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील गावोगावी जावून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या मतदान यंत्राची प्रात्यक्षिके मतदारांपुढे करून ही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील रिसोड, वाशिम आणि कारंजा या तीन विधानसभा मतदारसंघात १०४३ मतदान केद्रे आहेत. रिसोड विधानसभा मतदारसंघात ३२६, वाशिम मतदारसंघात ३६५ आणि कारंजा मतदारसंघात ३५२ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन पथक स्थापन करण्यात आले असून प्रत्येक पथकात पाच सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रमाणे जिल्ह्यात सात पथके याबाबत जनजागृ

विकास कार्यक्रमांमध्ये खासगी कंपन्या व समाज घटकांना सहभागी करून घेणार - लक्ष्मीनारायण मिश्रा

Image
वाशिम , दि. १९ : जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी नीती आयोगाने जिल्ह्याची निवड आकांक्षित जिल्हा म्हणून केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तसेच सर्व समाज घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध विकास कार्यक्रमांमध्ये खासगी कंपन्या आणि समाज घटकांना सहभागी करून घेणार असल्याचे मत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात १८ डिसेंबर रोजी सोशल रिस्पॉन्सबिलीटी सेलचे सहकार्य जिल्ह्याच्या विकास कार्यक्रमामध्ये घेण्याच्या दृष्टीने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री सचिवालयाच्या विशेष कार्यकारी अधिकारी प्रिया खान यांची विशेष उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री. मिश्रा म्हणाले, इथल्या गरजा आणि परिस्थिती पाहून आवश्यक त्या ठिकाणी खासगी कंपन्यांना सहभागी करून घेण्यात येईल. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कशाप्रकारे देता येईल, याचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी, आर्थिक उत्पन्न वाढ, सोबतच शेतकऱ्यांचे उ

रोजगार व मार्गदर्शन मेळाव्यात ६१० उमेदवारांची प्राथमिक निवड

Image
युवावर्गाने कौशल्य विकसित करावी – खा. भावना गवळी वाशिम , दि. १९ : आज बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. नोकऱ्या ह्या मर्यादित स्वरूपाच्या आहे. युवावर्गाने केवळ नोकरीच्या मागे न लागता विविध प्रकारचे प्रशिक्षण घेवून कौशल्य विकसित करावीत. त्यामुळे स्वावलंबनासोबतच रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध असतील, असे प्रतिपादन खासदार भावना गवळी यांनी केले. रविवारी वाशिम येथील विठ्ठलवाडी सभागृहात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि नगर परिषद वाशिमच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्तवतीने आयोजित पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन मेळाव्याच्या उद्घाटक म्हणून खा. गवळी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा हे होते. प्रमुख अतिथी म्हणून रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालक सुनंदा बजाज, नगर परिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले यांची उपस्थिती होती. खा. गवळी म्हणाल्या, आजचे युग हे स्पर्धेचे आहे. या युगात आपल्याला स्पर्धेत टिकायचे असेल तर कठोर मेहनत घ्यावी लागेल. कौशल्य आत्मसात करावी लागेल. रोजगा

अपघाताला आळा घालण्यासाठी अतिक्रमणे हटविण्यासोबतच नियमांची अंमलबजावणी करा - लक्ष्मीनारायण मिश्रा

Image
·          जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक वाशिम , दि. १८ : जिल्ह्यात शहरी भागात रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात असलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. ही अतिक्रमणे हटविण्यासाठी संबंधित नगरपालिका, नगरपंचायतीने तातडीने कार्यवाही करावी. अपघातावर आळा घालण्यासाठी अतिक्रमणे हटविण्यासोबतच वाहतूक नियमांचा वाहन चालकांकडून भंग होणार नाही, यासाठी वाहतूक नियमांची पोलीस आणि परिवहन विभागाने कठोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले. १७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत श्री. मिश्रा बोलत होते. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक तानाजी नरळे, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बी. आर. राठोड, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विनायक जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंता निलेश नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. मिश्रा म्हणाले, अपघात प्रवण असलेल्या ब्लॅकस्पॉटबाबत येत्या

शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘लोक संवाद’

Image
प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी 1 जानेवारीला संवाद वाशिम , दि. १८ : शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ , त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘ लोक संवाद ’ साधून जाणून घेणार आहेत. त्यासाठी या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. १ जानेवारी २०१९ रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधणार आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी व ग्रामीण) , उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना , छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना , प्रधानमंत्री पीक विमा योजना , मागेल त्याला शेततळे , गाळमुक्त धरण , गाळयुक्त शिवार , स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना , सूक्षम सिंचन आणि मृदा परीक्षण सारख्या या योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फड

२२ व २३ डिसेंबर रोजी वाशिम येथे वत्सगुल्म ग्रंथोत्सव

Image
·         भव्य ग्रंथ प्रदर्शन, विक्री व साहित्य मेळावा वाशिम , दि. १५ : राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या ग्रंथालय संचलनालयाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत २२ व २३ डिसेंबर २०१८ रोजी वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे ‘वत्सगुल्म ग्रंथोत्सव २०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसार होण्यासाठी ग्रंथ प्रदर्शन व विक्री, परिसंवाद, काव्यवाचन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमांना जिल्ह्यातील जास्तीत जास्त साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रंथोत्सव जिल्हा समन्वय समितीच्यावतीने करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवानिमित्त २२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालय येथून ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. यावेळी नगराध्यक्ष अशोक हेडा, माजी आमदार विजयराव जाधव, राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष व्य. रा. बावणे, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. प्रज्ञा क्षीरसागर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रमेश काळे उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वाजता पालकमं