Posts

Showing posts from November, 2018

राष्ट्रीय लोक अदालतीसाठी पूर्व बैठकांचे आयोजन

वाशिम ,   दि .   १९ : ८ डिसेंबर रोजी वाशिम येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या अदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी वकिलांसोबत चर्चा करण्यासाठी वेळ मिळावा, याकरिता पूर्व बैठकांचे आयोजन जिल्हा न्यायालय येथे करण्यात आले आहे. २३ नोव्हेंबर रोजी मोटार वाहन अपघात प्रकरणे, २४ नोव्हेंबर रोजी भूसंपादन, २७ नोव्हेंबर रोजी धनादेश अनादराची प्रकरणे, २९ नोव्हेंबर रोजी वैवाहिक वादाची प्रकरणे याबाबत सर्व वकिलांसोबत पूर्व बैठका होणार आहेत. तसेच १ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता विधी सेवा प्राधिकरणाच्या मोबाईल व्हॅनचे देखील उद्घाटन होणार आहे. तरी न्यायिक अधिकारी, वकील मंडळींनी आणि सर्व बँक इन्सुरन्स कंपन्यांच्या प्रतिनिधींनी पूर्व बैठका व उद्घाटनाला उपस्थित रहावे, असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशिम यांनी केले आहे.

ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत विविध विषावर चर्चा

वाशिम ,   दि .   १९ : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली . यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली . शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक तेवढया प्रमाणात विज पुरवठा होत नसल्यामुळे तसेच एकाच रोहित्रावर अनेक कृषिपंप कनेक्शन असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो . या प्रश्नाची तातडीने सोडवणूक करुन शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने न्याय द्यावा . तसेच वीज वितरण कंपनीशी संबंधित विषयावर उत्तर देण्यासाठी स्वत : कार्यकारी अभियंता यांनी उपस्थित रहावे . प्रतिनिधी पाठवू नये, असे सदस्यांनी सुचविले. राष्ट्रीयकृत बँकाच्या शाखा पिक कर्ज देतांना शेतकऱ्यांकडून विविध बॅंकांचे नो ड्युज सर्टिफिकेट मागतात तसेच हे सर्टिफिकेट देतांना पैशाची मागणी करतात, तेव्हा असे प्रकार बंद व्हावेत आणि नो ड्युज सर्टिफिकेटची आवश्यकता नसल्याचे माहिती फलक बँकेच्या दर्शनी भागात लावावेत . त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व श्रम वाचेल अशी सुचना काही सदस्यांनी केली . शहरातील हॉटेल्समध्ये ग्राहकांना शुद्ध पाणी हॉटेल माल

लवाद नामतालिकासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

·        ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार अर्ज वाशिम ,   दि .   १५   :    अमरावती विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम २००२ चे कलम ८४ (४) अन्वये सन २०१९-२२ या कालावधीसाठी लवाद नामतालिका तयार करण्यात येणार आहे. तरी इच्छुक व पात्र व्यक्तींनी आपले विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत अमरावती सहनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात सादर करावेत. विहित नमुन्यातील अर्ज ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत अमरावती विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातून प्राप्त करून घेता येतील. लवाद नामतालिकासाठी सर्व न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश व सेवानिवृत विधी अधिकारी , प्रॅक्टीसींग अॅडव्होकेट्स , चार्टंड अकाऊटंट , कॉस्ट अकाऊटंट, राष्ट्रीयकृत बँका , ग्रामिण बँका , भूविकास बँका , जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका , व्यापारी बँका , नागरी सहकारी बँका , राज्य सहकारी बँक यांचे सेवेतील व्यवस्थापक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले सेवानिवृत्त अधिकारी (ज्यांना सेवानिवृत्त होऊन दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी झाला आहे) , सहकार विभागातील उपनिबंधक दर्जापेक्षा

गरिबी निर्मुलन योजना अंतर्गत सायखेडा येथे शेतकरी मेळावा संपन्न

Image
वाशिम , दि. १९ : राष्ट्रीय विधी सेवा गरिबी निर्मुलन योजना २०१५ तथा शेतकरी विधी सेवा अभियान अंतर्गत वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कृषि विभाग, प्रेरणा प्रकल्प, विविध बँक आणि जिल्हा विधिज्ञ संघाच्यावतीने १६ नोव्हेंबर रोजी सायखेडा येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर उपयोजना करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय कार्यालये व बँकाच्या समन्वयाने हा मेळावा घेण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधिज्ञ संघाचे अध्यक्ष अॅड. अजयकुमार बेरिया होते. यावेळी जिल्हा विधिज्ञ संघाचे सचिव अॅड.प्रसाद ढवळे, उपाध्यक्ष अॅड. अमर रेशवाल, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. मंगेश भाग्यवंत, कृषि अधिकारी सुभाष उलेमाले, कृषि सहाय्यक प्रवीण उलेमाले, एम. डी. तायडे, सुनील पाटील, जयंत जगताप, राजीव दारोकर, निलेश भोजणे, प्रेरणा प्रकल्पचे राहुल कसादे, सोपान अंभोरे आदींनी यावेळी मार्गदर्शन केले. नागार्जुन बौद्ध अल्पसंख्याक बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने शेतकरी आत्महत्या रोखण्याबाबत समाजप्रबोधनपर लघु नाटिका सादर करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच, पोलीस पाटील

रिसोड तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ

·         सर्व गावांना आठ सवलती लागू वाशिम ,   दि .   १९ : सन २०१८ च्या खरीप हंगामात राज्य शासनाने रिसोड तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. तालुक्यातील सर्व गावांना या दुष्काळामुळे जमीन महसुलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सुट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे आदी आठ प्रकारच्या सवलती मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात इंदिरा गांधी यांना अभिवादन

Image
वाशिम , दि. १९ : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी देवराम वानखेडे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच यावेळी उपस्थित असलेल्या अधिकारी , कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. याप्रसंगी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, नायब तहसीलदार डॉ. राहुल वानखेडे, घनश्याम डाहोरे, गिरीश जोशी, श्री. नागपूरकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिकारी, प्राधिकारी नियुक्त

वाशिम ,   दि . १७   :   जिल्ह्यात   ध्वनी   प्रदूषण   नियंत्रण करण्यासाठी १६   ध्वनी   प्रदूषण   नियंत्रण प्राधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच जिल्हास्तरावर सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी   ध्वनी   प्रदूषण   होत असल्यास याबाबतची माहिती संबंधित   प्रदूषण   नियंत्रण अधिकारी ,   प्राधिकारी यांना द्यावी ,   असे वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी कळविले आहे. ध्वनी   प्रदूषण   नियंत्रण प्राधिकारी म्हणून वाशिमच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती नंदा पराजे (दूर ध्वनी   क्र. ०७२५२-२३२५४५ ,   भ्रमण ध्वनी   क्र. ९७३०१४५३०७) ,   वाशिम शहरचे पोलीस निरीक्षक हरिष गवळी (दूर ध्वनी   क्र. ०७२५२-२३२१०० ,   भ्रमण ध्वनी   क्र. ७७१८९८२५९९) ,   वाशिम ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय वाढवे (दूर ध्वनी   क्र. ०७२५२-२३४१०० ,   भ्रमण ध्वनी   क्र. ८९७५२७५१२१) ,   रिसोडचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील (दूर ध्वनी   क्र. ०७२५१-२२२३५६ ,   भ्रमण ध्वनी   क्र. ९८२३६८४६६०) ,   मालेगावचे पोलीस निरीक्षक पितांबर जाधव (दूर ध्वनी   क्र. ०७२५४-२७१२५३ , भ्रमण ध्वनी  

कंत्राटी पद्धतीने लिपीक, शिपाई भरती

·         २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन वाशिम ,   दि . १७   :   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेस मग्रारोहयोच्या कामाकरिता कंत्राटी पद्धतीने एक लिपीक व एक शिपाई या पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी १९ ते २८ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत कार्यालयीन दिवशी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यतच्या कालावधीत कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेत उपस्थित राहून विहित नमुन्यातील अर्जातील माहिती व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती, पासपोर्ट आकराचे फोटो सादर करावेत. २८ नोव्हेंबर नंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. लिपीक पदासाठी उमेदवार किमान इयत्ता १२ वी उत्तीर्ण असावा, मराठी व इंग्रजी टंकलेखन अनुक्रमे ३० व ४० शब्द प्रति मिनिट तसेच एमएस-सीआयटी परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच एमआयएसचे ज्ञान असणे सुध्दा आवश्यक आहे. उच्च शैक्षणिक अर्हता व अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. उमेदवार सद्यस्थितीस डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करीत असल्यास किंवा डाटा एन्ट्री

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

वाशिम ,   दि .   १७   :    पिडीत व समस्याग्रस्त   महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा ,   या दृष्टीने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय   महिला   लोकशाही   दिनाचे   आयोजन करण्यात येते. त्यानुसार ऑक्टोंबर महिन्यातील जिल्हास्तरीय   महिला लोकशाही   दिनाचे   आयोजन सोमवार ,   १९ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात करण्यात आले आहे. तरी संबंधितांनी काटा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील कक्ष क्र. २०४ मध्ये   महिला   व बालविकास अधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा   महिला   व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे. तालुका स्तरावर चौथ्या सोमवारी आयोजित होणाऱ्या   महिला   लोकशाही   दिनात दाखल तक्रारींबाबत समाधान न झाल्यास   महिलांनी तालुका स्तरावर दाखल केलेल्या तक्रारीच्या टोकन क्रमांकासाहित विहित नमुन्यात जिल्हास्तरीय   महिला   लोकशाही   दिनात अर्ज सादर करावेत. जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित तक्रारी सरळ जिल्हास्तरीय महीला   लोकशाही   दिन

राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

वाशिम ,   दि .   १७   : जिल्ह्यातील सर्व राज्य शासनाच्या निवृत्तीवेतन धारक तथा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये हयात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी कोणत्याही एका पद्धतीने १५ डिसेंबर २०१८ पर्यंत आपले हयात प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे यांनी केले आहे. निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतून आपले निवृत्तीवेतन घेत आहेत, त्या बँकेत जिल्हा कोषागार कार्यालयाने निवृत्तीवेतनधारकांची यादी पाठविली आहे. सर्व निवृत्तीवेतन धारकांनी १५ डिसेंबर २०१८ पर्यंत संबंधित बँकेशी संपर्क साधून आवश्यक पुराव्यासह या यादीवर स्वाक्षरी करावी. वाशिम जिल्हा कोषागार कार्यालय व अधिनस्त तालुकास्तरावरील उपकोषागार कार्यालयामध्ये जीवनप्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. याठिकाणी निवृत्तीवेतनधारक आधारकार्ड, बँक पासबुक व मोबाईल घेवून हजर राहून हयात प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करू शकतात. हयात प्रमाणपत्रावर आपला निवृत्ती वेतन प्रदान आदेश, बँक खाते क्रमांक व शाखा नमूद करून सदर प्रमाणपत्रावर निवृत

अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना मिळणार मोफत पोलीस भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण

Image
·         १९ नोव्हेंबर रोजी होणार निवड चाचणी वाशिम , दि . १६ : वाशिम जिल्ह्यातील मुस्लिम , ख्रिश्चन , बौध्द , शीख , पारशी आणि जैन या अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांना विनामुल्य पोलिस भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजना सन २०१८-१९ मध्ये राबविण्यात येणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी सोमवार, १९ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी १० वाजता आवश्यक अर्ज व कागदपत्रांसह वाशिम येथील जिल्हा पोलीस मुख्यालय (परेड ग्राउंड) येथे उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी उमेदवार अल्पसंख्यांक प्रवर्गातील   ( मुस्लिम , ख्रिश्चन , बौध्द , शीख , पारसी आणि जैन )   असणे आवश्यक असून प्रशिक्षणार्थीचे वार्षीक कौंटुंबिक उत्पन्न रुपये दोन लाख पन्नास हजार रुपयेपेक्षा जास्त नसावे , उमेदवार १८ ते २८ वयोगटातील असावा व इयत्ता १२ वी उत्तीर्ण असावा , उमेदवारांची उंची - महिला १५५ सें.मी व पुरुष १६५ सें.मी. छाती- पुरुष- ७९ सें.मी.   ( फुगवुन ८४ सें.मी. )   असणे आवश्यक आहे. उमेदवार शाररीकदृष्टा निरोगी व सक्षम असावा. उमेदवाराने निवड चाचणीसाठी येताना अर्जासोबत शैक्षणिक अर्हता

वाहतूक नियम जागृतीसाठी रविवारी महा वॉकेथॉन

·         नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वाशिम , दि . १६ : रस्ता सुरक्षा, नो-हॉर्न व सुरक्षित वाहन चालविणे याबाबत जनजागृती करण्यासाठी वाशिम उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने रविवार, १८ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ८ वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथून २ किलोमीटर महा वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयीन कर्मचारी, राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, अध्यापक, विद्यार्थी व नागरिकांनी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे उपस्थित रहावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

डिजिटल युगात प्रसारमाध्यमांची जबाबदारी वाढली

Image
·         राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रातील सूर वाशिम , दि . १६ : आजच्या डिजिटल युगात पत्रकारितेसाठी विविध साधने उपलब्ध झाल्याने बातमी तयार करणे व पाठविणे, तसेच ती प्रसिद्ध करण्याच्या सुविधा वाढल्या आहेत. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत पत्रकारिता सोपी झाली असली तरी आजच्या युगात प्रसारमाध्यमांची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असा सूर आज जिल्हा माहिती कार्यालयात ‘डिजिटल युगातील पत्रकारिता : आचारनिती आणि आव्हान’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ऐकावयास मिळाला. राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राचे मुख्य वक्ता म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील अंतर्गत लेखा परीक्षक युसुफ शेख उपस्थित होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांच्यासह सुनील मिसर, चंद्रकांत लोहाना, सुनील कांबळे, अनिल आतिश देशमुख, अनिल वाल्ले, अजय ढवळे, गजानन भोयर, संदीप पिंपळकर, निलेश सोमाणी, प्रदीप टाकळकर, सारनाथ अवचार, सुभाष देवहंस आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी श्री. शेख म्हणाले, आज माहितीचे डिजिटलायझेशन झाल्याने इंटरनेटच्या