विविध व्यावसयिक प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित


वाशिम, दि. १५ : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वाशिम जिल्हा कार्यालयामार्फत सन २०१८-१९ मध्ये टू व्हीलर सर्व्हिसिंग, मोबाईल रिपेरिंग, रेफ्रिजरेशन, एअर कंडीशनर रिपेरिंग, मोटार रिवायडींग, फेब्रीकेटर-वेल्डिंग, रिटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, संगणक प्रशिक्षण (डिप्लोमा इन जी.एस.टी), सौंदर्य प्रसाधने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाकरिता जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील १८ ते ४० वयोगटातील उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयेपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, आधारकार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, निवडणूक कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट फोटो आदी कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज २२ नोव्हेंबर २०१८ पर्यंत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वाशिम जिल्हा कार्यालयात सादर करावेत, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे