रिसोड तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ
·
सर्व
गावांना आठ सवलती लागू
वाशिम, दि. १९ :
सन २०१८ च्या खरीप हंगामात राज्य शासनाने रिसोड तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ
जाहीर केला आहे. तालुक्यातील सर्व गावांना या दुष्काळामुळे जमीन महसुलात सुट,
सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपाच्या
चालू वीज बिलात ३३.५ टक्के सुट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा
शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाच्या निकषात काही
प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर आणि
टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे
आदी आठ प्रकारच्या सवलती मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण
मिश्रा यांनी दिली.
Comments
Post a Comment