अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना मिळणार मोफत पोलीस भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण
·
१९ नोव्हेंबर रोजी होणार
निवड चाचणी
वाशिम, दि. १६ : वाशिम
जिल्ह्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द,
शीख, पारशी आणि जैन या अल्पसंख्यांक समाजातील
उमेदवारांना विनामुल्य पोलिस भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजना सन २०१८-१९ मध्ये
राबविण्यात येणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी सोमवार, १९ नोव्हेंबर २०१८ रोजी
सकाळी १० वाजता आवश्यक अर्ज व कागदपत्रांसह वाशिम येथील जिल्हा पोलीस मुख्यालय
(परेड ग्राउंड) येथे उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने
करण्यात आले आहे.
प्रशिक्षणासाठी
उमेदवार अल्पसंख्यांक प्रवर्गातील (मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द,
शीख, पारसी आणि जैन) असणे आवश्यक असून प्रशिक्षणार्थीचे
वार्षीक कौंटुंबिक उत्पन्न रुपये दोन लाख पन्नास हजार रुपयेपेक्षा जास्त नसावे, उमेदवार १८ ते २८ वयोगटातील असावा व इयत्ता १२
वी उत्तीर्ण असावा, उमेदवारांची उंची - महिला १५५ सें.मी व
पुरुष १६५ सें.मी. छाती- पुरुष- ७९ सें.मी. (फुगवुन ८४ सें.मी.) असणे आवश्यक आहे. उमेदवार शाररीकदृष्टा
निरोगी व सक्षम असावा.
उमेदवाराने
निवड चाचणीसाठी येताना अर्जासोबत शैक्षणिक अर्हता, रहिवासी दाखला, आधारकार्ड, सेवायोजन
कार्यालयाअंतर्गत नाव नोंदणी दाखला यांची सत्यप्रत देणे आवश्यक राहील. हे
प्रशिक्षण दोन महिन्याचे असून दररोज ३ तासाचे प्रशिक्षणवर्ग व २ तासाचे मैदानी
प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांस दरमहा १५०० रुपये प्रमाणे
विद्यावेतन मिळणार आहे. गणवेश साहित्यासाठी रुपये १००० रुपये अनुदान देण्यात येणार
आहे. मैदानी प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण संस्थेकडून चहापान व अल्पोपहार देण्यात
येणार आहे. निवडलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणादरम्यान निवासाची व्यवस्था
स्वत: करावी लागेल, या अटीची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांनी १९ नोव्हेंबर २०१८ रोजी
सकाळी १० वाजता वाशिम जिल्हा मुख्यालयाचे पोलीस परेड ग्रांऊडवर विहित अर्ज आणि
सर्व कागदपत्राच्या सत्यप्रतीसह निवड चाचणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन
जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment