Posts

Showing posts from March, 2019

मतदारांच्या सेवेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार सहाय्यता कक्ष

Image
वाशिम ,   दि .   २२   :   लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिल रोजी तर अकोला लोकसभा मतदारसंघात १८ एप्रिल रोजी मतदान होत आहे. यानिमित्त मतदारांना मतदार यादीमध्ये नाव , अनुक्रमांक व मतदान केंद्र शोधण्यास मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी हृषीकेश मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा निवडणूक कार्यालयात मतदार सहाय्यता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अद्ययावत मतदार यादी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे मतदार यादीमध्ये नाव शोधणे , मतदान केंद्राविषयी माहिती मिळविण्यामध्ये समस्या येऊ नयेत , याकरिता मतदार सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याठिकाणी नियुक्त अधिकारी , कर्मचारी मतदारांना यादीमध्ये नाव , अनुक्रमांक व मतदान केंद्र शोधण्यासाठी मदत करतील. १९५० क्रमांकावर मिळणार माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या मतदार सहाय्यता कक्षामध्ये १९५० हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. १९५० या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन मतदारांना मतदार यादीतील नाव, अनुक्रम

विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी

Image
·          मतदान केंद्रांवर उपलब्ध सोयी-सुविधांचा आढावा वाशिम ,   दि .   १९   :    आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी जिह्यातील काही मतदान केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक , मालेगावचे तहसीलदार रवी काळे उपस्थित होते. विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी सर्वप्रथम मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील मतदान केंद्राची पाहणी केली. त्यानंतर मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा , कवरदरी , वरदरी बु. , वरदरी खुर्द , नागरतास , मालेगाव येथील ना. ना. मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्र , डोंगरकिन्ही व भौरद येथील मतदान केंद्रांची पाहणी केली. मतदान केंद्रावरील पिण्याच्या पाण्याची सुविधा , संपर्काचे साधन , कनेक्टीव्हिटी , दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर , रॅम्पची सुविधा यासह इतर बाबींचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर व्हीलचेअर उपलब्ध ठेवावी. तसेच रॅम्पही

मतदान ओळखपत्र नसले तरी करता येईल मतदान

·         पर्यायी दस्तऐवजांची यादी जाहीर वाशिम ,   दि . १६   :    भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार ११ एप्रिल २०१९ रोजी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. तसेच १८ एप्रिल २०१९ रोजी अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्‍क बजावितांना मतदारांकडे मतदान ओळखपत्र नसल्यास सोबत आणावयाच्या पर्यायी दस्तऐवजांची यादी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. मतदार ओळखपत्र नसलेल्या मतदारांना मतदान करण्यासाठी पासपोर्ट , वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) , छायाचित्र असलेले कमर्चारी ओळखपत्र (केंद्र किंवा राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम अथवा सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक, पॅन कार्ड , एनपीआर अंतर्गत आरजीआयद्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्ताऐवज, खासदार अथवा आमदार अथवा विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र व आधारकार्ड यापैकी कोणताही एक द

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करावे - हृषीकेश मोडक

Image
·         नोडल अधिकारी यांची आढावा बैठक वाशिम ,   दि . १६   :     लोकसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व नोडल अधिकारी यांनी समन्वयाने व नियोजनबद्ध काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. निवडणूक विषयक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, महसूलचे उपजिल्हाधिकारी आर. डी. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी व्यंकट जोशी, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा खनिकर्म अधिकारी विनय राठोड, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, अधीक्षक शीतल वाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्व संबंधिता

१७ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन

Image
·        दाखलपुर्व , न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांवर सुनावणी वाशिम , दि. १५ :   राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा यांच्या सूचनेनुसार रविवार, १७ मार्च २०१९ रोजी वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत सन २०१९ मधील पहिल्या राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये दाखलपुर्व व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. तरी संबंधित पक्षकारांनी राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने मिटवावेत , असे आवाहन वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने करण्यात आले आहे.              दाखलपुर्व प्रकरणे जसे धनादेश अनादर प्रकरणे, बँकेचे कर्ज वसुली प्रकरणे, कामगाराचे वाद, विद्युत आणि पाणी देयक बद्दलची प्रकरणे व आपसात तडजोड करण्याजोगे फौजदारी प्रकरणे, वैवाहिक आणि इतर दिवाणी वाद तसेच न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांमध्ये आपसात तडजोड करण्याजोगे फौजदारी प्रकरणे , धनादेश अनादर प्रकरणे, बँकेचे कर्ज वसुली प्रकरणे, वैवाहिक वाद, कामगारांचे वाद, भू-संपादन प्रकरणे , सेवावि

वाशिम शहरात पोलीस प्रशासनामार्फत कोंबिंग ऑपरेशन

Image
·         नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन वाशिम ,   दि . १५   :     लोकसभा निवडणूक निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी वाशिम शहरात पोलीस प्रशासनामार्फत गुन्हेगारांची शोध मोहीम व कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. १५ मार्च रोजी सकाळी ५ वाजलेपासून शहरातील कलम ३०७ व ३०२ सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची शोध मोहीम व कोंबिंग ऑपरेशन सुरु करण्यात आली होते. यावेळी शहरातील सौदागरपुरा येथे राहणाऱ्या बबलू खान उर्फ शेख फिरोज शेख इस्माईल यांच्या घरी तलवारी व इतर घातक शस्त्रे असल्याबाबतची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. पवन बन्सोड, वाशिमचे ठाणेदार बी. आर. गीते, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे व पोलीस कर्मचारी यांनी बबलू खान उर्फ शेख फिरोज शेख इस्माईल याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात ३ तलवारी, १ सुरा, २ चाकू, ७ लोखंडी रॉड व १ कुकरी अशी धारदार शस्त्रे मिळून आली.   कारवाई टाळण्याच्या उद्देशाने बबलू खान याने जप्त हत्यारामधून अचानकपणे कुकरी उचलून पोलीस कर्मचारी ज्ञानदेव मात्रे यांच्या मानेवर मारण्याचा प्रयत्न

जातीय दंगा नियंत्रणाची पोलीस दलाकडून रंगीत तालीम

Image
वाशिम ,   दि . १५   :     लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वाशिम शहर अथवा परिसरात जातीय तेढ निर्माण झाल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस दलामार्फत केल्या जाणाऱ्या कार्यवाहीची रंगीत तालीम १४ मार्च रोजी वाशिम शहरातील पाटणी चौक येथे घेण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, उपविभागीय अधिकारी डॉ. पवन बन्सोड सहभागी झाले होते. यावेळी वाशिम जिल्हा पोलीस दलातील वरुण वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, आरसीपी, क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी), पोलीस पथक, डॉग युनिट, अग्निशमन दल, होमगार्ड्स असे एकूण ७ वाहने, १० पोलीस अधिकारी, १ नायब तहसीलदार आणि ११५ पोलीस कर्मचारी यांनी दंगा नियंत्रणासाठी केल्या जाणाऱ्या कार्यवाहीचे प्रात्यक्षिक सादर केले.     लोकसभा सार्वत्रिक निवडणूक शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सज्ज असून जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात आले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पोलीस पाटलांची कार्यशाळा संपन्न

Image
वाशिम ,   दि . १४   :     गावपातळीवर पोलीस प्रशासन आणि जनता यामधील पोलीस पाटील हा अत्यंत महत्वाचा दुवा म्हणून ओळखला जातो. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने बंदोबस्ताची कर्तव्ये व जबाबदाऱ्या या विषयावर जिल्ह्यातील पोलीस पाटलांची कार्यशाळा आज पोलीस मुख्यालय येथे संपन्न झाली. पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी कार्यशाळेत निवडणुकीच्या संदर्भाने पोलीस पाटील यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या, पोलीस पाटील यांचे निवडणूक काळातील निःपक्ष वर्तन व घ्यावयाची दक्षता, निवडणूक प्रचार काळातील निवडणूक आदर्श आचारसंहिता आणि मतदानाच्या दिवशी आदर्श आचारसंहिता या विषयवार सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित पोलीस पाटलांनी निवडणूक काळात आपली कर्तव्ये चोखपणे आणि जबाबदारीने पार पाडून लोकसभा निवडणूक शांततामय व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील ३५० पोलीस पाटील उपस्थित होते. यावेळी महिला पोलीस पाटील छाया डहाके यांचा सत्कार करण्यात आला. छाया डहाके यांनी नारीरत्न हा कवितासंग्रह लिहिला असून त

पोलीस मुख्यालयात ‘मॉब डिस्पर्सल’

Image
वाशिम ,   दि . १४   :     आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने पोलीस अधीक्षक वसंत परदेशी व अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आज वाशिम पोलीस मुख्यालय येथे आरसीपी व क्यूआरटी तसेच पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी यांच्याकडून मॉब डिस्पर्सलचा सराव करून घेण्यात आला. भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या कामी या सरावाचा फायदा होणार आहे. मॉब डिस्पर्सलचा सराव सर्व तालुकास्तरावर घेण्याचे नियोजित आहे. राखीव पोलीस निरीक्षक क्षीरसागर, राखीव पोलीस उपनिरीक्षक पवार व सर्व कवायत निर्देशक यांनी या कामी मोलाचे मार्गदर्शन केल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक (गृह) किरण धात्रक यांनी दिली.

सोशल मिडीयावर ‘वाशिम सायबर’ची करडी नजर

Image
वाशिम ,   दि . १४   :     जिल्हा पोलीस दल लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोशल मिडीयाच्याबाबतीत सतर्क झाले असून त्यांची यावर करडी नजर आहे. माहिती तंत्रज्ञानाचे सध्याचे हे जग असल्याने सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. सोशल मिडीयाचा वापर विविध पक्षांचा प्रचार करण्यासाठी केला जातो. त्या संबंधाने तणाव निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्या ऑनलाईन गुन्हेगारीवर सायबर पेट्रोलिंगद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे. वाशिम पोलीस सायबर सेलच्या माध्यमातून अशा प्रकारचे सायबर गुन्हे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. पक्षाच्या उमेदवाराकडून सोशल मिडियाचा प्रभावी वापर करत प्रचार सुरु करण्यात आला आहे. दिवसेंदिवस इंटरनेटचा वापर करून करण्यात येणाऱ्या गुन्हाच्या संख्येत वाढ होत आहे. फ्रॉड मेल, धमकी देणारा मेल, ऑनलाईन फसवणूक, फिशिंग, बनावट फेसबुक अकौंट, फेसबुक अकौंट हॅक करणे, डेटा थेफ्ट, सायबर स्कॉटिंग, हॅकिंग सारख्या गुन्ह्यांवर तपास करून गुन्हेगारांना गजाआड करण्यासाठी वाशिम सायबर सेल सज्ज आहे. नागरिकांनी याद्वारे सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट न टाकण्याचे, योग्य व सुरक्षितरित्

उमेदवारांनी निवडणूक खर्च विषयक सूचनांचे पालन करावे - हृषीकेश मोडक

Image
·         निवडणूक विषयक विविध बाबींची दरनिश्चिती वाशिम ,   दि .   १३   : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उमेदवाराला निवडणुकीसाठी ७० लाख रुपयेपर्यंत खर्च मर्यादा ठरवून दिली आहे. निवडणुकीदरम्यान प्रचार तसेच इतर बाबींवर होणाऱ्या खर्चाची माहिती निवडणूक यंत्रणेला सादर करणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे पालन सर्व राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले. निवडणूक खर्चविषयक विविध बाबींचे दर निश्चित करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, निवडणूक खर्च संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी व्यंकट जोशी, जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अंतर्गत लेखा परीक्षक युसुफ शेख, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, तहसीलदार राजू सुरडकर, श्री. चव्हाण यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प

निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांची विविध पथके तैनात

Image
वाशिम ,   दि .   १२   : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली आहे. ही निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी, याकरिता पोलीस प्रशासन आवश्यक ती खबरदारी घेत आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, तसेच आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, याकरिता पोलिसांची विविध पथके तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस दलामार्फत देण्यात आली आहे. निवडणूक काळात अवैध दारू, अवैध रोकड, अवैध शस्त्र, दारुगोळा इत्यादीची वाहतूक रोखण्यासाठी जिल्ह्यालगतच्या इतर जिल्ह्याच्या हद्दीवर ११ चेकपोस्ट कार्यरत करण्यात आल्या आहेत. वाशिम ते हिंगोलीमार्गावर राजगाव येथे, रिसोड ते सेनगाव मार्गावर निजामपूर फाटा, रिसोड ते लोणार मार्गावर मेहकर फाटा, वाशिम ते अकोला मार्गावर मेडशी फाटा, मालेगाव ते मेहकर मार्गावर सरहद्द पिंप्री, वाशिम ते पुसद मार्गावर पन्हाळा फाटा, कारंजा ते मुर्तीजापूर मार्गावर खेर्डा फाटा, कारंजा ते दारव्हा मार्गावर सावंगी फाटा, मानोरा ते दिग्रस मार्गावर सावळी फाटा, कारंजा ते अमरावती मार्गावर ढंगार खेडा आणि कारंजा ते वर्धा, नागपूर मार्गावर दोनद फाटा येथ

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज - हृषीकेश मोडक

Image
·         पत्रकार परिषदेत दिली माहिती वाशिम ,   दि .   १२   : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ चा निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाकरिता पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी तर अकोला लोकसभा मतदारसंघाकरिता दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबत निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी मोडक यावेळी म्हणाले, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील कारंजा आणि वाशिम या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघांकारिता ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर अकोला लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या जिल्ह्यातील रिसोड विधानसभ

आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करा - हृषीकेश मोडक

Image
·         सर्व शासकीय विभाग प्रमुख, नोडल अधिकारी यांची बैठक ·         शासकीय यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश ·         निवडणूक कामात हलगर्जीपणा नको वाशिम ,   दि .   ११   : भारत निवडणूक आयोगाने रविवारी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व शासकीय विभाग व निवडणुकीसाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज दिल्या. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, महसूलचे उपजिल्हाधिकारी आर. डी. काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहे