पोलीस मुख्यालयात ‘मॉब डिस्पर्सल’




वाशिम, दि. १४ :  आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने पोलीस अधीक्षक वसंत परदेशी व अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आज वाशिम पोलीस मुख्यालय येथे आरसीपी व क्यूआरटी तसेच पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी यांच्याकडून मॉब डिस्पर्सलचा सराव करून घेण्यात आला.
भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या कामी या सरावाचा फायदा होणार आहे. मॉब डिस्पर्सलचा सराव सर्व तालुकास्तरावर घेण्याचे नियोजित आहे. राखीव पोलीस निरीक्षक क्षीरसागर, राखीव पोलीस उपनिरीक्षक पवार व सर्व कवायत निर्देशक यांनी या कामी मोलाचे मार्गदर्शन केल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक (गृह) किरण धात्रक यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे