जातीय दंगा नियंत्रणाची पोलीस दलाकडून रंगीत तालीम




वाशिम, दि. १५ :  लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वाशिम शहर अथवा परिसरात जातीय तेढ निर्माण झाल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस दलामार्फत केल्या जाणाऱ्या कार्यवाहीची रंगीत तालीम १४ मार्च रोजी वाशिम शहरातील पाटणी चौक येथे घेण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, उपविभागीय अधिकारी डॉ. पवन बन्सोड सहभागी झाले होते.
यावेळी वाशिम जिल्हा पोलीस दलातील वरुण वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, आरसीपी, क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी), पोलीस पथक, डॉग युनिट, अग्निशमन दल, होमगार्ड्स असे एकूण ७ वाहने, १० पोलीस अधिकारी, १ नायब तहसीलदार आणि ११५ पोलीस कर्मचारी यांनी दंगा नियंत्रणासाठी केल्या जाणाऱ्या कार्यवाहीचे प्रात्यक्षिक सादर केले.   लोकसभा सार्वत्रिक निवडणूक शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सज्ज असून जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे