Posts

Showing posts from January, 2021

‘कोरोना’ची लस सुरक्षित, कोणताही त्रास जाणवला नाही !

Image
  ·         लस टोचून घेतलेल्या कोरोना योद्ध्यांशी संवाद ·         विषाणू संसर्ग टाळण्यासाठी सर्वांनी लस घेण्याचे आवाहन वाशिम , दि. १९ : कोरोना विषाणू संसार्गाला रोखण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला शनिवारपासून प्रारंभ झाला आहे. वाशिम जिल्ह्यातही तीन ठिकाणी ही मोहीम सुरु झाली आहे. या मोहिमेंतर्गत वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय येथील लसीकरण केंद्रात आज, लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी ही लस सुरक्षित असल्याचे सांगितले. तसेच लस टोचून घेतल्यानंतर कोणताही त्रास जाणवला नाही, कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी लस घेणे आवश्यक असून सर्वांनी लस घेण्याचे आवाहनही केले. वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील क्ष-किरण तज्ज्ञ डॉ. विश्वनाथ बगाटे यांनीही आज लस घेतली. लस घेतल्यानंतर त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना वार्डमध्ये आम्ही काम करीत आहे. कोरोना बाधितांवर उपचार करीत असताना मनोमन वाटत होते की, या आजारावरील लस लवकर यावी. कोरोना लसीकरण सुरु झाल्यानंतर लस घेण्यासाठी मी उत्सुक होतो, लसीकरणासाठ

जिल्ह्यात ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानाला प्रारंभ

Image
  वाशिम , दि. १८ : वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात ३२ वे रस्ते वाहतूक अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा आज, १८ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता श्री. माळवत यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रमेश तांगडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे, शहर वाहतूक शाखेचे श्री. मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. हिरडे यांनी रस्ते सुरक्षा विषयक नियमांची माहिती देवून रस्ता सुरक्षा का महत्वाची आहे, याविषयी मार्गदर्शन केले. वाहतुकीच्या नियमांविषयी माहिती देणारी पुस्तिका व भिंतीपत्रीकेचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. तसेच उपस्थितांना रस्ते वाहतूक नियम पालनाबाबत शपथ देण्यात आली. उद्घाटन कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते वाहंना रेट्रो रिफ्लेक्टिव्ह टेप लावण्यात आली. यावेळी सर्व वाहन विक्रेते, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी, पीयुसी केंद्रधारक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्र

वाशिम जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात

Image
    वाशिम , दि. १६ : कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेस आजपासून प्रारंभ झाला असून जिल्ह्यातही या मोहिमेला आजपासून सुरुवात झाली. वाशिम येथे आमदार लखन मलिक , जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या उपस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कर्मचारी पूनम सराफ यांना लस देवून लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, डॉ. उमेश मडावी, डॉ. राजेश पवार, डॉ. संदीप हेडाऊ, डॉ. लक्ष्मीकांत राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरणराव सरनाईक यांनीही वाशिम येथील लसीकरण केंद्राला भेट देवून लसीकरणाच्या कार्यवाहीची पाहणी केली. पहिल्या दिवशी वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय , कारंजा उपजिल्हा रुग्णालय आणि मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालय या तीन ठिकाणी कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली. केंद्र शासनाच्या दिशानिर्देशानुसार कोरोना लसीकरण केंद्रांवर सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी १०० आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आले. या सर्वा

वाशिम जिल्ह्यात कोरोना लसीकरणची रंगीत तालीम यशस्वी

Image
  ·         विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडून लसीकरण केंद्राची पाहणी वाशिम , दि. ०८ : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज जिल्ह्यात वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय, कारंजा उपजिल्हा रुग्णालय आणि शेलूबाजार प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरणाची रंगीत तालीम (ड्राय रन) घेण्यात आली. तिन्ही ठिकाणी घेण्यात आलेली लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वी झाला. अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील लसीकरण केंद्राला भेट देवून लसीकरण रंगीत तालीम कार्यवाहीचा आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांची उपस्थिती होती. लसीकरणाच्या रंगीत तालमीसाठी प्रत्येक लसीकरण केंद्रावर २५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार त्यांना मोबाईलवर मेसेज पाठवून कळविण्यात आले. सदर लाभार्थी लसीकरण केंद्रावर आल्यानंतर त्याच्या नावाची ‘कोवीन’ अॅपवर पडताळणी करणे, ओळख पटविणे, लसीकरण करणे आणि त्यानंतर त्याला निरीक्षणात ठेवणे आदी संपूर्ण कार्यवाही शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पाडण्य

‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत पर्यावरण संवर्धन उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढवा - विभागीय आयुक्त पीयूष सिंह

Image
  वाशिम ,   दि. ०८ (जिमाका) :   पर्यावरण संवर्धन व रक्षणासाठी नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, उपक्रमांमध्ये स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा सहभाग वाढवावा, अशा सूचना विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिल्या. अभियानाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, अपर जिल्हाधिकारी शरद पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी सुनील विंचनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी यावेळी अभियानाचा नगरपरिषद, नगरपंचायत निहाय आढावा घेतला. श्री. सिंह म्हणाले, पर्यावरण रक्षणासाठी शहरी भागातील संपूर्ण घनकचऱ्याचे संकलन, विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया होणे आवश्यक आहेत. तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया होणे गरजेचे असून जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींनी त्यादृष्टीने नियोजन