जिल्ह्यात ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानाला प्रारंभ

 




वाशिम, दि. १८ : वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात ३२ वे रस्ते वाहतूक अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा आज, १८ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता श्री. माळवत यांच्या हस्ते शुभारंभ झाला.

यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रमेश तांगडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे, शहर वाहतूक शाखेचे श्री. मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. हिरडे यांनी रस्ते सुरक्षा विषयक नियमांची माहिती देवून रस्ता सुरक्षा का महत्वाची आहे, याविषयी मार्गदर्शन केले. वाहतुकीच्या नियमांविषयी माहिती देणारी पुस्तिका व भिंतीपत्रीकेचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. तसेच उपस्थितांना रस्ते वाहतूक नियम पालनाबाबत शपथ देण्यात आली. उद्घाटन कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते वाहंना रेट्रो रिफ्लेक्टिव्ह टेप लावण्यात आली. यावेळी सर्व वाहन विक्रेते, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी, पीयुसी केंद्रधारक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश