Posts

Showing posts from October, 2019

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ वाशिम , दि. १५ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार २१ ऑक्टोंबर २०१९ रोजी जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्कर बजावितांना मतदारांकडे मतदान ओळखपत्र नसल्यास सोबत आणावयाच्या ११ पर्यायी दस्तऐवजांची यादी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. मतदार ओळखपत्र नसलेल्या मतदारांना मतदान करण्यासाठी पासपोर्ट , वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) , छायाचित्र असलेले कमर्चारी ओळखपत्र (केंद्र किंवा राज्य शासन , सार्वजनिक उपक्रम अथवा सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र) , छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक , पॅन कार्ड , एनपीआर अंतर्गत आरजीआयद्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड , मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड , भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड , छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्रे , खासदार किंवा आमदार किंवा विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र व आधारकार्ड यापैकी कोणताही एक दस्ताऐवज सोबत आणावा लागणार आहे. निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेली छायाचि

११ हजार विद्यार्थ्यांनी, महिलांनी मानवी साखळीतून साकारले भारत निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ ·         ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने घेतली नोंद ·         वाशिम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ·         मतदार जागृतीसाठी ‘स्वीप’ अंतर्गत अनोखा उपक्रम ·           वाशिम , दि. १५ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा म्हणून मतदार जागृतीसाठी आज वाशिम येथील पोलीस कवायत मैदानावर सुमारे ११ हजार विद्यार्थी, महिलांनी एकत्र येत मानवी साखळीतून भारत निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह (लोगो) साकारला. ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये जागतिक विक्रम म्हणून या उपक्रमाची नोंद झाली असून यामुळे वाशिम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘ स्वीप ’ चे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ ऑक्टोंबर २०१९ रोजी मतदान होत असून यामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी आपला हक्क बजवावा, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. य

मतदान प्रक्रियेत सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका महत्वाची - प्रकाश बिंदू

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ ·         सूक्ष्म निरीक्षकांची कार्यशाळा वाशिम , दि. १५ : मतदान केंद्रांवर नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांवर निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असते. मतदान प्रक्रिया शांतता व निःपक्षपातीपणे पार पाडण्यामध्ये त्यांची भूमिका महत्वाची असून सर्व सूक्ष्म निरीक्षकांनी सजग राहून काम करावे , अशा सूचना सामान्य निवडणूक निरीक्षक प्रकाश बिंदू यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या सूक्ष्म निरीक्षकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन , महसूलचे उपजिल्हाधिकारी रमेश काळे, मनुष्यबळ व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी तथा अधीक्षक प्रशांत जाधव, श्री. बिंदू यांचे संपर्क अधिकारी तथा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांच्यासह ७१ सूक्ष्म निरीक्षकांची उपस्थिती होती. श्री. बिंदू म्हणाले , मतदानादिवशी होणाऱ्या ‘ मॉक पोल’चे सूक्ष्म निरीक्षकांनी सजग राहून सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पडत असल्याची खात्री करावी. त्याच बरोबर प्रत्यक्ष मतदान सुरु झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या

सामान्य निवडणूक निरीक्षक प्रकाश बिंदू यांच्या मंगरूळपीर तालुक्यातील मतदान केंद्रांना भेटी

Image
वाशिम , दि. १२ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले सामान्य निवडणूक निरीक्षक प्रकाश बिंदू यांनी आज मंगरूळपीर तालुक्यातील मतदान केंद्रांची पाहणी केली. तसेच या मतदान केंद्रांवर उपलब्ध असलेल्या किमान आवश्यक सुविधांचा आढावा घेतला. यावेळी श्री. बिंदू यांचे संपर्क अधिकारी तथा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे, मंडळ अधिकारी डी. जे. चौधरी, तलाठी भागवत भताने आदी उपस्थित होते. सामान्य निवडणूक निरीक्षक श्री. बिंदू यांनी मंगरूळपीर तालुक्यातील लाठी, शेलूबाजार, चिखली, हिसई येथील मतदान केंद्रांची तसेच मंगरूळपीर शहरातील कलंदरिया उर्दू हायस्कूल येथील ४ मतदान केंद्र, अकोला चौक येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील चार मतदान केंद्रांची पाहणी केली. याठिकाणी दिव्यांग मतदारांना व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, रँप, स्वच्छता गृह आदी सुविधांची पाहणी केली.

महिला मतदारांच्या जनजागृतीसाठी अंगणवाडीसेविकांचा पुढाकार

Image
·         ‘स्वीप’ अंतर्गत उपक्रमात १ हजार १७४ अंगणवाडीसेविकांचा सहभाग वाशिम , दि. १२ : जिल्ह्यातील महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अंगणवाडीसेविकांनी पुढाकार घेतला आहे. ‘स्वीप’ अंतर्गत आयोजित उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व १ हजार १७४ अंगणवाडीसेविका आपापल्या गावामध्ये मतदार जागृती करीत असून विशेषतः महिला मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करीत आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’चे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडीसेविकांच्या माध्यमातून गावागावातील महिलांपर्यंत मतदार जागृतीचा संदेश पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अंगणवाडीसेविकांना मतदार जागृतीसाठी आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. गावांमधील प्रमुख कार्यालये, शाळा, महाविद्यालयांच्या इमारतींवर मतदार जागृतीचा संदेश देणारी पोस्टर

वाशिम बसस्थानकात मतदार जनजागृती कार्यक्रम

Image
  ·          ‘स्वीप’ अंतर्गत उपक्रम   वाशिम , दि. १२ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा प्रयत्नशील आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’चे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली   ‘स्वीप’ अंतर्गत विविध उपक्रम राबवून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. आज महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने वाशिम बसस्थानक येथील वर्कशॉपमध्ये कामगार व प्रवाशांसाठी मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.   यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिलीप राठोड, राहुल गवई यांनी उपस्थितांना मतदानाचे महत्व सांगितले. तसेच २१ ऑक्टोंबर २०१९ रोजी सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन केले. यावेळी आगार व्यवस्थापक विनोद इलामे, एनसीसी अधिकारी अमोल काळे, वाहतूक निरीक्षक श्री. तेलगोटे, देवानंद दाभाडे, मालती दाभाडे, गजानन आरु, अंबिका कठाडे, मंगला नवरे, प्रमिला ढोके यांची उपस्थिती होती.   मतदार जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथावरील एलईडी स्क्रीनवर जि

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

Image
·         वक्तृत्व स्पर्धा, परिसंवादात मांडले विचार ·         ‘स्वीप’ अंतर्गत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद ·         सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग वाशिम , दि. १२ : ‘ मतदान हा आपल्याला मिळालेला बहुमूल्य अधिकार आहे , आपलं मत वाया घालवू नका , कोणतेही कारण न देता २१ ऑक्टोंबरला मतदान करा... ’ ‘ मतदान करताना जाती-धर्माचा विचार न करता योग्य उमेदवार निवडा... ’ ‘ आपलं मत विकू नका , प्रत्येक मत लोकशाहीची ताकद आहे , ते वाया घालवू नका... ’ असे विचार व्यक्त करून शालेय विद्यार्थ्यांनी मतदान आणि लोकशाही प्रक्रियेचे महत्व पटवून दिले. निमित्त होते जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत ‘ स्वीप ’ अंतर्गत आयोजित वक्तृत्व स्पर्धा आणि परिसंवादाचे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘ स्वीप ’ चे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारी जिल्ह्यातील शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा आणि परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालक व कुटुंबातील इतर मतदारांपर्यंत मतदार जागृतीचा संद