वाशिम बसस्थानकात मतदार जनजागृती कार्यक्रम




 ·         ‘स्वीप’ अंतर्गत उपक्रम 
वाशिम, दि. १२ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा प्रयत्नशील आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’चे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली  ‘स्वीप’ अंतर्गत विविध उपक्रम राबवून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. आज महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने वाशिम बसस्थानक येथील वर्कशॉपमध्ये कामगार व प्रवाशांसाठी मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिलीप राठोड, राहुल गवई यांनी उपस्थितांना मतदानाचे महत्व सांगितले. तसेच २१ ऑक्टोंबर २०१९ रोजी सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन केले. यावेळी आगार व्यवस्थापक विनोद इलामे, एनसीसी अधिकारी अमोल काळे, वाहतूक निरीक्षक श्री. तेलगोटे, देवानंद दाभाडे, मालती दाभाडे, गजानन आरु, अंबिका कठाडे, मंगला नवरे, प्रमिला ढोके यांची उपस्थिती होती.
 मतदार जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथावरील एलईडी स्क्रीनवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी मतदारांना केलेले आवाहन तसेच इतर व्हिडीओ संदेश यावेळी उपस्थितांना दाखविण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश