Posts

Showing posts from October, 2023

धनगर समाज बांधवांना मागील वर्षी मिळाले 41 घरकुल यावर्षी 115 पात्र लाभार्थ्यांची यादी शासनास सादर

Image
धनगर समाज बांधवांना मागील वर्षी मिळाले 41 घरकुल यावर्षी 115 पात्र लाभार्थ्यांची यादी शासनास सादर  वाशीम दि 31 (जिमाका) धनगर समाज बांधवांसाठी वैयक्तिक लाभाची घरकुल योजना 6 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयाद्वारे सुरू करण्यात आली आहे.राज्यातील धनगर समाजातील लोकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामीण भागातील या समाजातील लोकांसाठी 10 हजार घरकुल देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.                 जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 2 मार्च 2022 आणि 26 डिसेंबर 201 रोजी झालेल्या सभेत 12 सप्टेंबर 2022 आणि 13 जुलै 2023 च्या शासन निर्णयानुसार 41 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला आहे. 27 मार्च 2023 आणि 10 जुलै 2023 रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत 115 पात्र लाभार्थ्यांची यादी शासनाकडे पाठविण्यात आली आहे. प्रत्येक महिन्यात धनगर बांधवांकडून घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज मागविण्यात येतात.तसेच अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येते.धनगर समाजातील कोणताही पात्र लाभार्थी हा घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती समाज कल्य

खरीप पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी 48 पैसे

Image
खरीप पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी 48 पैसे  वाशिम,दि. 31 (जिमाका) सन 2023-24 च्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची जिल्ह्याची सरासरी हंगामी पैसेवारी 48 पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे.जिल्ह्यात एकूण 793 महसूल गावे आहेत.यातील सर्वच 793 गावांची खरीप हंगामाची नजर अंदाज पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे.        वाशिम तालुक्यात एकूण 131 महसुली गावे आहेत.या सर्व 131 गावांची पैसेवारी 48 पैसे इतकी आहे. मालेगाव तालुक्यातील 122 गावे आहे, या 122 गावांची पैसेवारी 49 पैसे आहे.रिसोड तालुक्यात 100 महसूली गावे असून या सर्व 100 गावांची हंगामी पैसेवारी 47 पैसे आहे. मंगरुळपीर तालुक्यात 137 महसूल गावे असून या सर्व गावांची पैसेवारी 47 पैसे आहे. कारंजा तालुक्यात एकूण 167 महसूली गावांची पैसेवारी 47 पैसे आणि मानोरा तालुक्यातील सर्व 136 गावांची पैसेवारी 48 पैसे आहे.जिल्ह्यातील खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी सरासरी 48 पैसे इतकी आढळून आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.                      *******

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानसमान व असमान निधी योजना शासनमान्य ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविले

Image
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान समान व असमान निधी योजना शासनमान्य ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविले वाशिम, दि. 31 (जिमाका)  :   केंद्र सरकारच्या सांस्कृतीक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठान,कोलकाता यांच्या अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय,मुंबई यांच्या वतीने राबविण्यात येतात. समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी सन 2023-24 या वर्षासाठी विविध समान व असमान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहे. यासाठी नियम,अटी व अर्जाचा नमुना  www.rrlf.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावा.             सन 2023-24 या  वर्षासाठी समान निधी योजनेअंतर्गत इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजनेसाठी 25 लक्ष रुपये. या योजनेव्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पध्दतीने देण्यात येत असल्यामुळे इतर योजनेसाठी प्रस्ताव सादर करु नये.             सन 2023-24 

जिल्हा न्यायालयात मध्यस्थीबाबत केले मार्गदर्शन

Image
जिल्हा न्यायालयात मध्यस्थीबाबत केले मार्गदर्शन वाशिम, दि. 31 (जिमाका)  :   जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ यांच्या वतीने 30 ऑक्टोबर रोजी जिल्हा न्यायाधीश व्ही.व्ही.नाशिककर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा न्यायालय कक्ष क्र.13 मध्ये मध्यस्थी संबंधित जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. न्या.श्री.नाशिककर यांनी मध्यस्थी प्रक्रीयेबाबत उपस्थितांना माहिती देवून वाद व तंटे मध्यस्थीच्या माध्यमातून मिटविण्याचे आवाहन केले. दिवाणी न्यायाधीश आर.पी. कुलकर्णी यांनी प्री-इंस्टीटयुशन मिडीएशन ॲन्ड सेटलमेंट इन कमर्शियल डिसपुट या विषयावर मार्गदर्शन करतांना मध्यस्थी प्रक्रीयेतील विविध टप्प्यांबाबत माहिती देवून मध्यस्थीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार मुख्य लोक अभिरक्षक परमेश्वर शेळके यांनी मानले. कार्यक्रमाला न्या.एस.एस. घोरपडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही.ए. टेकवाणी, सर्व न्यायीक अधिकारी, लोक अभिरक्षक, जिल्हा विधीज्ञ संघाचे सदस्य, विधीज्ञ, पक्षकार व न्यायालयीन कर्मचारी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.  *******

समृध्दी महामार्गावर होणाऱ्या अपघाताची माहितीत ात्काळ जिल्हा प्रशासन व जिल्हा नियंत्रण कक्षाला दयावी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. समृध्दी महामार्गावरील रस्ते अपघाताविषयी दूरदृश्यप्रणालीव्दारे आढावा

Image
समृध्दी महामार्गावर होणाऱ्या अपघाताची माहिती तात्काळ जिल्हा प्रशासन व जिल्हा नियंत्रण कक्षाला दयावी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. समृध्दी महामार्गावरील रस्ते अपघाताविषयी दूरदृश्यप्रणालीव्दारे आढावा वाशिम, दि. 30 (जिमाका)  :   समृध्दी महामार्ग हा राज्य शासनाचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. आपल्या जिल्हयातून जवळपास 100 किमी समृध्दी महामार्ग जात आहे. समृध्दी महामार्गावर होत असलेल्या अपघाताची माहिती जिल्हा नियंत्रण कक्ष व जिल्हा प्रशासनाला मिळणे आवश्यक आहे. अपघाताची माहिती तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्ष व जिल्हा प्रशासनाला मिळाल्यास अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासोबत अग्नीशमन दलाची मदत पोहोचविणे शक्य होईल. यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी दिले. आज 30 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्यप्रणालीव्दारे जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांनी समृद्धी महामार्गावरील रस्ते अपघाताविषयी संबंधित यंत्रणांकडून आढावा घेतला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना

खतांचा पुरवठा वेळेत करतांना साठेबाजी होणार नाही याची दक्षता घ्यावी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समिती सभा

Image
खतांचा पुरवठा वेळेत करतांना साठेबाजी होणार नाही याची दक्षता घ्यावी      जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस  जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समिती सभा वाशिम दि.28(जिमाका) येत्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा वेळेत करण्यात यावा.पुरवठा वेळेत करतांना खतांची साठेबाजी होणार नाही याची कृषी विभागाने दक्षता घ्यावी.असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी दिले.                      27 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीच्या सभेत अध्यक्ष म्हणून श्रीमती बुवनेश्वरी एस. बोलत होत्या. सभेला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा,प्रभारी कृषी विकास अधिकारी गणेश गिरी,मोहीम अधिकारी भागडे,सर्व पंचायत समितीचे कृषी अधिकारी,सर्व तालुका कृषी अधिकारी,रासायनिक खत कंपनीचे प्रतिनिधी,खते व बियाणे विक्रेते प्रामुख्याने उपस्थित होते.                   जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या,सर्व खत कंपन्यानी खताचा पुरवठा नियोजनानुसार वेळेत करावा.रब्बी हंगामात किती खत पुरवठा करणार याबाबतचे नियोजन दोन दिवसात सादर करावे.निविष्ठा विक्रे

अवैधरित्या बनावट विदेशी दारुची विक्री : दोन व्यक्तींना अटक कारवाईत 6 लक्ष 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Image
अवैधरित्या बनावट विदेशी दारुची विक्री : दोन व्यक्तींना अटक कारवाईत 6 लक्ष 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त वाशिम, दि. 27 (जिमाका)  :   अमरावती विभागाचे राज्य उत्पादन शुल्क विभागीय उप आयुक्त अ.ना.ओहोळ आणि वाशिमचे राज्य उत्पादन शुल्काचे अधिक्षक अभिनव बालुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेलूबाजार ते कारंजा रोडवर अवैधरित्या बनावट विदेशी दारुची अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. राज्य उत्पादन शुल्क,वाशिमच्या पथकाने 25 ऑक्टोबर रोजी मंगरुळपीर तालुक्यातील मौजे तऱ्हाळा शिवारातील श्री.हनुमान मंदीराजवळच्या रोडवर एका हुंदाई कंपनीच्या चारचाकी वाहन क्रमांक एमएच-43-आर-3318 या वाहनात बनावट विदेशी दारु रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 240 सिलबंद बाटल्या, बनावट एम्पेरीयल ब्लू व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 240 बाटल्या तसेच 750 मिली क्षमतेच्या बॉम्बे रॉयल व्हिस्कीच्या 48 सिलबंद बाटल्या गोवा राज्यात विक्रीस असलेल्या परंतू महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधीत असलेला विदेशी मद्य तसेच बनावट विदेशी दारु तयार करण्याकरीता लागणारे झाकणे व लेबल तसेच 180 मिली क्

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम वेळापत्रक जाहीर

Image
मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम वेळापत्रक जाहीर वाशिम, दि. 26 (जिमाका)  :   भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे - 27 ऑक्टोबर 2023, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी - 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023, विशेष मोहिमेचा कालावधी - मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार, मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे 5 जानेवारी 2024 तसेच 4 नोव्हेंबर, 5 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबर व 26 नोव्हेंबर 2023 रोजी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सर्व मतदार केंद्रावर विशेष नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष मतदार नोंदणी शिबीरांमध्ये विद्यार्थी, महिला, दिव्यांग तसेच तृतीयपंथीय आणि देहविक्री करणाऱ्या महिला व घर नसलेले भटक्या विमुक्त जमातीच्या मतदारांची मतदार नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी कैलास देवरे यांनी दिली. *******

नगरपरिषद गट-क परीक्षा उपकेंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू

Image
नगरपरिषद गट-क परीक्षा उपकेंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू वाशिम, दि. 26 (जिमाका)  :   महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट-क परीक्षा- 2023 अन्वये विविध संवर्गाची ऑनलाईन परीक्षा शहरातील डिजीटल परीक्षा परीसर, 1 ला मजला, गुलाटी टॉवर, शासकीय पॉलीटेक्नीक कॉलेज समोर, रिसोड रोड, वाशिम येथे 28 ऑक्टोबरपर्यंत आणि 2 व 3 नोव्हेंबर 2023 रोजी तीन सत्रात ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर 100 मीटर परिक्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच परीक्षेसंबंधी गैरप्रकार घडू नये. यासाठी परीक्षा केंद्रावर जिल्हादंडाधिकरी बुवनेश्वरी एस.यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले आहे. ही परीक्षा सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजता दरम्यान तीन सत्रात घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात शासनाकडून नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचाऱ्याव्यतिरीक्त इतर व्यक्तीस मनाई राहणार आहे. परीक्षा केंद्रावर 100 मिटरच्या आत रस्त्यावरुन वाहने नेण्यास मनाई राहील. परीक्षा केंद्राच्या 100 मिटरच्या परी

फिट इंडिया मोहिम विद्यार्थ्यांनी प्रश्न मंजुषामध्ये सहभागी व्हावे शिक्षण व क्रीडा विभागाचे आवाहन

Image
फिट इंडिया मोहिम विद्यार्थ्यांनी प्रश्न मंजुषामध्ये सहभागी व्हावे शिक्षण व क्रीडा विभागाचे आवाहन वाशिम, दि. 26 (जिमाका)  :   केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने २०२१ या वर्षात फिट इंडिया क्विझ सुरु केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया मुव्हमेंट या योजनेची घोषणा केली आहे. या उद्देशाने प्रत्येकाने जीवनात सदृढ राहावे. फिट इंडियाअंतर्गत राष्ट्रीय क्विझ स्पर्धा शाळास्तरावरुन घेण्यात येणार आहे. स्पर्धेचे स्वरुप प्राथमिक, राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर आहे. इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. प्रत्येक शाळेतील कमीत-कमी दोन खेळाडू विद्यार्थ्यांनी सहभाग होणे आवश्यक आहे. ही स्पर्धा नॅशनल टॅलेंट एजन्सी घेत असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राष्ट्रीयस्तरावर विजेत्या संघास सुवर्ण संधी असुन सेलेब्रेटीसोबत खेळाडूची लहान वयात भेट होणार आहे. त्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढविण्यास निश्चित मदत होईल. या मोहिमेअंतर्गत एकुण ३ कोटी २५ लक्ष रुपयांचा निधी शाळांना मिळणार आहे. त्यापैकी खेळाडूंना २ कोटी ५ लक्ष व श

माझी माती माझा देशअमृत कलश यात्रा मुंबईसाठी रवाना जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी

Image
माझी माती माझा देश अमृत कलश यात्रा मुंबईसाठी रवाना जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी वाशिम,दि.२५ (जिमाका) " माझी माती माझा देश " या अभियानातंर्गत जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने अमृत सरोवर, जलकुंभ,तिरंगा यात्रा,स्वच्छता प्रतिज्ञा,वृक्षारोपण,अमृत सरोवराच्या ठिकाणी मुलांसाठी विविध स्पर्धा, अमृत सरोवराच्या ठिकाणी ग्रामीण खेळांच्या स्पर्धांसह आयोजन करण्यात आले.            १७ ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हास्तरीय कलश एकत्रीकरणाचा कार्यक्रम, महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, एनएसएस,एनसीसी,एनवायके,भारत स्काऊट गाईड्स,अंगणवाडी कर्मचारी आणि इतर युवक स्वयंसेवक कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमालासुध्दा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.             आज २५ ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहा तालुक्यांचे ६ व नगरपालीका प्रशासनाचा १ असे एकूण ७ अमृत कलश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मुंबईसाठी रवाना करण्यात आले.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी

उमरी- पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सर्व कामे गुणवत्तापूर्ण असावी पालकमंत्री संजय राठोड जिल्हास्तरीय तीर्थक्षेत्र विकास समितीची सभा

Image
उमरी- पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सर्व कामे गुणवत्तापूर्ण असावी                  पालकमंत्री संजय राठोड  जिल्हास्तरीय तीर्थक्षेत्र विकास समितीची सभा  वाशिम दि.21 (जिमाका) देशातील कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे पोहरादेवी हे मुख्य तीर्थक्षेत्र आहे. पोहरादेवी व उमरी तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भरीव तरतूद केली आहे.तीर्थक्षेत्र विकास आराखडयाअंतर्गत करण्यात येत असलेली सर्व कामे गुणवत्तापूर्ण असावी.अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.             जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात 20 ऑक्टोबर रोजी आयोजित जिल्हास्तरीय तीर्थक्षेत्र विकास समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री श्री. राठोड बोलत होते.          सभेला खासदार भावना गवळी, आमदार ऍड.किरणराव सरनाईक, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घ

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अशासकीय सदस्य नियुक्तीसाठी संस्था व व्यक्तींकडून 26 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविले

Image
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अशासकीय सदस्य नियुक्तीसाठी संस्था व व्यक्तींकडून 26 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविले        वाशिम, दि. 20 (जिमाका) : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ नुसार प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, रुग्णालये व खाजगी आस्थापना याठिकाणी महिला तक्रार निवारण समित्या स्थापन करणे बंधनकारक आहे. या समित्यांमध्ये शासकीय सदस्या व्यतिरिक्त अशासकीय सदस्यांचा समावेश असावा. त्यानुसार समितीवर महिलांच्या विविध प्रश्नावर काम करत असणाऱ्या इच्छुक संस्था व व्यक्तींनी अर्ज सादर करण्यासाठी संस्था आणि व्यक्तीनी समितीवरील सदस्याबाबतचे अर्ज २६ ऑक्टोबरपर्यंत सादर करावे. संबंधितांनी अर्जाचा नमूना कार्यालयातून प्राप्त करुन घ्यावा. अधिक माहिती व अर्ज प्राप्त करुन घेण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे. *******

शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना जर्मनीतून तुषार जोगीचे ऑनलाईन मार्गदर्शन

Image
शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना जर्मनीतून तुषार जोगीचे ऑनलाईन मार्गदर्शन वाशिम, दि. 20 (जिमाका)  :   वाशिम येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे यंत्र अभियांत्रिकी पदविका विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग मटेरियल अँड इट्स इम्पॉर्टन्स या विषयावर १५ ऑक्टोबर रोजी जर्मनी येथील रिसर्च साईंटीस्ट रुर युनिवर्सिटीचे तुषार जोगी यांचे ऑनलाईन एक्सपर्ट लेक्चरर आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे प्राचार्य डॉ. बि. जि. गवलवाड, विभाग प्रमुख, शासकीय तंत्रनिकेतनचे अधिकारी वकर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. श्री. जोगी यांनी इंजिनिअरिंग मटेरियल त्यांचे प्रकार तसेच बदलत्या काळानुसार उद्योग क्षेत्रात झालेल्या क्रांतीनंतर याचे उपयोग याविषयी विस्तृत माहिती दिली. नवीन तंत्रज्ञानामुळे या मटेरीयालचा उपयोग सर्व क्षेत्रामध्ये होत असून त्याचे महत्वही त्यांनी संगितले. यावेळी विभागप्रमुख के.पी जोशी म्हणाले, तज्ञांची व्याख्याने एखाद्या विशिष्ट विषयात खोलवर जाण्याची संधी देतात. तज्ञांना त्यांच्या क्षेत्राची सर्वसमावेशक समज असते म्हणून माहिती देऊ शकतात. जी कदाचित इतरत्र सहज उपलब्ध होणार नाहीत. या व्

जांभरुण (परांडे) येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर उत्साहात

Image
जांभरुण (परांडे) येथे  कायदेविषयक जनजागृती शिबीर उत्साहात वाशिम, दि. 20 (जिमाका)  :   जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ यांच्या संयुक्त वतीने वाशिम तालुक्यातील जांभरुण (परांडे) येथे 19 ऑक्टोबर रोजी कायदेविषयक जनजागृती शिबीर उत्साहात संपन्न झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्ही.ए. टेकवाणी होते. यावेळी जिल्हा विधीज्ञ संघाचे कोषाध्यक्ष ॲड. दलित गुडदे, पोलीस पाटील श्रीमती गीता मोहळे, मुख्य लोक अभिरक्षक ॲड. परमेश्वर शेळके, ॲड. जी.व्ही मोरे यांची प्रमख उपस्थिती होती. श्री. टेकवाणी म्हणाले, नागरीकांना कायदेविषयक मदत लागल्यास मोफत विधी सेवेचा लाभ घ्यावा. कायदेविषयक मदतीसाठी नागरीक जिल्हा विधी प्राधिकरण वाशिम या कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. ॲड. शेळके यांनी ज्येष्ठ नागरीकांचे कायदे व नालसा योजना याविषयी, ॲड. मोरे यांनी दिव्यांगांचे कायदे व कल्याणकारी योजना तसेच सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला जांभरुण परांडे येथील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कर्मचारी व विधी स्वय

यंत्रणांनी निधीची मागणी वेळेत करुन जिल्हयाच्या विकासाला गती द्यावी पालकमंत्री संजय राठोड वार्षिक योजनेच्या मंजूर व प्रस्तावित कामांचा आढावा

Image
यंत्रणांनी निधीची मागणी वेळेत करुन जिल्हयाच्या विकासाला गती द्यावी    पालकमंत्री संजय राठोड वार्षिक योजनेच्या मंजूर व प्रस्तावित कामांचा आढावा        वाशिम, दि. 20 (जिमाका)  :   जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून विविध विकास कामे करतांना नागरीकांना सुविधा निर्माण करुन देण्यात येतात. विविध योजनेच्या लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे, यासाठी यंत्रणांमार्फत लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. यंत्रणांनी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि लाभार्थ्यांना निर्धारीत वेळेत लाभ देण्यासाठी यंत्रणांनी निधीची मागणी करुन निधी निर्धारीत वेळेत खर्च करुन जिल्हयाच्या विकासाला गती दयावी. असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.           आज 20 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती व आदिवासी उपयोजनेअंतर्गत सन 2023-24 या वर्षात यंत्रणांचे प्राप्त प्रस्ताव, घेण्यात येणारी कामे, आयपास प्रणालीवर प्रस्तावित कामे व मान्यता मिळालेल्या कामांचा आढावा घेतांना पालकमंत्री श्

विशेष सहाय्य योजनापात्र लाभार्थ्यांना राज्य पुरस्कृत योजनेच्या अनुदानाचे वितरण

Image
विशेष सहाय्य योजना पात्र लाभार्थ्यांना राज्य पुरस्कृत योजनेच्या अनुदानाचे वितरण  वाशिम दि.20 (जिमाका) राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे जुलै ते सप्टेंबर 2023 या कालावधीतील अनुदान ऑक्टोबर 2023 मध्ये प्राप्त झाले.प्राप्त झालेले अनुदान जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम यांच्याकडून सर्व तहसील कार्यालयांना लाभार्थी संख्येनुसार व त्यांनी केलेल्या मागणीनुसार वितरित करण्यात आले.                 केंद्र पुरस्कृत योजनेसाठी अद्यापही अनुदान प्राप्त झालेले नाही.अनुदान प्राप्त होताच त्याचे वितरण करण्यात येणार आहे.             राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्वसाधारण 21 हजार 603 लाभार्थ्यांना,संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अनुसूचित जातीच्या 7382 लाभार्थ्यांना सप्टेंबर 2023 पर्यंतचे,संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अनुसूचित जमातीच्या 1934 लाभार्थ्यांना ऑगस्टपर्यंतचे,श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या 35 हजार 7 सर्वसाधारण लाभार्थ्यांना सप्टेंबरपर्यंतचे,श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अनुसूचित जातीच्या 1

पालकमंत्री संजय राठोड उदया 20 ऑक्टोबरला जिल्ह्यात*

Image
*पालकमंत्री संजय राठोड उदया 20 ऑक्टोबरला जिल्ह्यात*  वाशिम दि.19 (जिमाका) मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड हे 20 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.सकाळी 10:20 वाजता दिग्रस येथून शासकीय वाहनाने मानोरा - मंगरूळपीरमार्गे वाशिमकडे प्रयाण. सकाळी 11:20 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व जिल्हा नियोजन समिती, सभागृह येथे आयोजित जिल्हा नियोजन  समितीची मंजूर झालेली,प्रस्तावित व मंजूर करावयाच्या कामांचा आढावा घेतील.दुपारी 2 वाजता विश्रामगृहाकडे प्रयाण.दुपारी 2:10 वाजता विश्रामगृह येथे आगमन व राखीव.दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय वाशिमकडे प्रयाण.दुपारी 3:10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,वाशिम येथे आगमन व तीर्थक्षेत्र विकास समितीच्या आढावा बैठकीला उपस्थित राहून सोयीनुसार यवतमाळकडे प्रयाण करतील.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीव्दारे प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन जिल्हयातील 8 ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा समावेश शिरपूर (जैन) येथील कार्यक्रमास जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती

Image
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीव्दारे प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन जिल्हयातील 8 ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा समावेश शिरपूर (जैन) येथील कार्यक्रमास जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती        वाशिम, दि. 19 (जिमाका)  :   जिल्हयात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 19 ऑक्टोबर रोजी दूरदृष्यप्रणालीव्दारे करण्यात आले. जिल्हयातील मालेगांव तालुक्यातील शिरपूर (जैन) येथे देखील या केंद्राचा उदघाटन सोहळा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी माजी आमदार ॲड. विजय जाधव, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, गटविकास अधिकारी कैलाश घुगे, कौशल्य विकास अधिकारी सीमा खिरोडकर, शिरपूर (जैन) चे संतोष अढागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.           श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, कौशल्य विकासविषयक विविध प्रकारचे प्रशिक्षण युवा वर्गाला या केंद्राच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या

जि.प.रिक्तपदांसाठीची परीक्षा पुढे ढकलली

Image
जि.प.रिक्तपदांसाठीची परीक्षा पुढे ढकलली        वाशिम, दि. 18 (जिमाका)  :   जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी 21 ते 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) बांधकाम/ग्रामीण पाणी पुरवठा व औषध निर्माण अधिकारी या पदाची नियोजित परीक्षा काही अपरिहार्य कारणामुळे आयबीपीएस कंपनीकडून पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचे पुढील वेळापत्रक परीक्षार्थींना  www.zpwashim.in  या संकेतस्थळावर कळविण्यात येईल. असे सदस्य सचिव, जिल्हा निवड समिती तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे.  *******

पालकमंत्री संजय राठोड 20 ऑक्टोबरला घेणार विविध विषयांचा आढावा

Image
पालकमंत्री संजय राठोड 20 ऑक्टोबरला घेणार विविध विषयांचा आढावा  वाशिम दि 18 (जिमाका) पालकमंत्री संजय राठोड हे 20 ऑक्टोबर रोजी वाशीम येथे येत आहे. सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन येथे विविध विषयांचा आढावा आयोजित सभेत ते घेणार आहे.या सभेत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण),अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना सन 2023 - 24 या वर्षात यंत्रणांनी प्रस्तावित केलेल्या कामांचा तसेच आय - पास प्रणालीवर प्रस्तावित केलेली कामे व मान्यता मिळालेली कामे यांचा ते आढावा घेतील.               तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ विकास आराखडा अंतिम करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.16 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक झाली.या बैठकीनुसार आराखड्यामध्ये झालेल्या बदलासाठी जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

शिष्यवृत्ती,फ्रिशीप व शैक्षणिक योजना**महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज मागविले*समाज कल्याण विभागाचे आवाहन

Image
*शिष्यवृत्ती,फ्रिशीप व शैक्षणिक योजना* *महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज  मागविले* समाज कल्याण विभागाचे आवाहन          वाशिम, दि.17 (जिमाका)   सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जाती,ईतर मागास वर्ग,विशेष मागास प्रवर्ग या विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, फ्रिशीप व इतर शैक्षणिक योजनांचे सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाचे अर्ज महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन भरण्यासाठी विद्यार्थ्यांना 11 सप्टेंबर 2023 पासून माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून पोर्टल कार्यान्वीत करण्यात आले आहे.                   सन 2022- 23 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे व नुतनकरणाचे अर्ज महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन भरण्यासाठी विद्यार्थ्यांना शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.          अनुसूचित जाती,ईतर मागास वर्ग,विशेष मागास प्रवर्ग या विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाडिबीटीच्या https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाचे अर्ज भरण्यासाठी 11 ऑक्टोंबर 2023 पास

19 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हयात स्थापीत 8 प्रशिक्षण केंद्राचे ऑनलाईन उदघाटन

Image
19 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हयात स्थापीत 8 प्रशिक्षण केंद्राचे ऑनलाईन उदघाटन उदघाटन सोहळयाचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे आवाहन         वाशिम,दि.17 (जिमाका) ग्रामीण भागातील 18 ते 45 वयोगटातील युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याकरीता ग्रामपंचायतस्तरावर कौशल्य, विकास,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून राज्यात 511 ठिकाणी प्रमोद महाजन उद्योजकता कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.या प्रशिक्षण केंद्रात जिल्हयातील इच्छुक युवकांना पुर्णत: नि:शुल्क स्वरुपाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.           या स्थापीत झालेल्या प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे.हा उदघाटन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीसुध्दा व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सूचना दिल्या आहे.                   जिल्हयातील वाशिम तालुक्यातील अनसिंग,मालेगांव तालुक्यातील किन्हीराजा व शिरपुर, मंगरुळपीर तालुक्यातील जा

*जि.प.च्या रिक्तपदांसाठी* *21 ते 23 ऑक्टोबरपर्यंत परीक्षा*

Image
*जि.प.च्या रिक्तपदांसाठी*  *21 ते 23 ऑक्टोबरपर्यंत परीक्षा*   वाशिम,दि.17 (जिमाका) जिल्हा परिषदेच्या विविध गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.त्यानुसार ऑनलाईन पध्दतीने अर्ज केलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन परिक्षेचे वेळापत्रक आयबीपीएस कंपनीकडून प्राप्त झाले आहे.ही परीक्षा डिजीटल परीक्षा परिसर, गुलाटी टॉवर,शासकीय तंत्रनिकेतन समोर,लाखाळा,रिसोड रोड,वाशिम या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.                   परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते सकाळी 10.30 वाजता,सकाळी 11 ते दुपारी 2.30 वाजतापर्यंत आणि दुपारी 3 ते सायंकाळी 6.30 वाजतादरम्यान कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) बांधकाम/ ग्रामीण पाणी पुरवठा या पदासाठी पहिले,दुसरे व तिसरे सत्रात, 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते सकाळी 10.30 वाजता,सकाळी 11 ते दुपारी 2.30 वाजतापर्यंत आणि दुपारी 3 ते सायंकाळी 6.30 वाजतादरम्यान औषध निर्माण अधिकारी या पदासाठी पहिले,दुसरे व तिसरे सत्रात आणि 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते  सकाळी 10.30 वाजता कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) बांधकाम/ग्रामीण पाणी प

जिल्हा ग्रंथालयात विद्यार्थ्यांना‌ सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन

Image
जिल्हा ग्रंथालयात विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन वाशिम, दि.17 (जिमाका) जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात 16 ऑक्टोबर रोजी सायबर सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्री.टेकवाणी होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य लोक अभिरक्षक ॲड.राजेश विसपुते व सहायक लोक अभिरक्षक ॲड. राहुल पुरोहित यांची उपस्थिती होती.               यावेळी श्री.टेकवाणी यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत घ्यावयाची काळजी तसेच कोणतीही कायदेविषयक मदत लागल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले.                ॲड.पुरोहित यांनी सायबर सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारीपासून बचाव करण्याकरीता घ्यावयाची दक्षता याविषयी तर श्री. विसपुते यांनी सायबर क्राईममध्ये कोणती काळजी घ्यावी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार दिपक बनसोडे यांनी मानले. कार्यक्रमाला ज

मानव तस्करी विरोधी रॅली उत्साहात

Image
*मानव तस्करी विरोधी रॅली उत्साहात* वाशिम,दि.17 (जिमाका) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,जिल्हा विधीज्ञ संघ व ॲड.रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त वतीने 13 ऑक्टोबर रोजी मानव तस्करी विरोधी रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.पी.पांडे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून उदघाटन केले.यावेळी मुख्य लोक अभिरक्षक ॲड.परमेश्वर शेळके,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्री.टेकवाणी, राजस्थान आर्य महाविद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश झंवर व ॲड. रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश दाभाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.           या रॅलीला जिल्हा व सत्र न्यायालय येथून सुरुवात होवून जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद,उपप्रादेशिक परिवहन कार्यालय,नगर परिषद व जिल्हा सामान्य रुग्णालय या मार्गाने जावून अकोला नाका ते ॲड.रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.रॅलीत 150 पेक्षाही जास्त विद्यार्थी,विधी स्वयंसेवक,कर्मचारी सहभागी होते. रॅलीत मानव तस्करी विरोधी घोषणा देत नागरीकांचे लक्ष वेधले.विधी स्वयंस

जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते टेम्पल गार्डन अमृत कलश यात्रा

Image
जिल्हा प्रशासनाच्यावतीने  जिल्हाधिकारी कार्यालय ते टेम्पल गार्डन  अमृत कलश यात्रा  वाशिम दि.१७ (जिमाका) " माझी माती माझा देश " अभियानातंर्गत आज १७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,नगर पालिका प्रशासन व जिल्हा परिषद वाशिमच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते टेम्पल गार्डन दरम्यान अमृत कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, नितीन चव्हाण,उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे,जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे, कारंजा नगर परिषदेचे मुख्याधिकारी दिपक मोरे,रिसोडचे मुख्याधिकारी सतीश शेवदा,मालेगावचे मुख्याधिकारी पंकज सोनवणे, सहाय्यक पुरवठा अधिकारी राजेश वजीरे,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.                  जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांनी या मातीला नमन करून देशासाठी लढणाऱ्या वीरांना वंदन केले.हे अभियान देशासाठी आपले जीवन त्यागणाऱ्या शूरवीरांसाठी समर्पित असल्याची भावना व्यक्त

पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली 20 ऑक्टोबरला जिल्हा नियोजन समिती सभा

Image
पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली  20 ऑक्टोबरला जिल्हा नियोजन समिती सभा  वाशिम दि. 17 (जिमाका) पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली 20 ऑक्टोबर रोजी जिल्हा नियोजन समितीची सभा सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह वाशिम येथे आयोजित करण्यात आली आहे.या सभेमध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसूचित जाती योजना व आदिवासी उपयोजना सन 2023 - 24 या वर्षात करण्यात येणाऱ्या कामांचा, आय-पास प्रणालीवर प्रस्तावित केलेली कामे व मान्यता मिळालेल्या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे.

राजस्थान आर्य महाविद्यालयात आपत्ती धोके निवारण दिवस साजरा

Image
राजस्थान आर्य  महाविद्यालयात आपत्ती धोके निवारण दिवस साजरा  वाशिम,दि.१६ (जिमाका) एन एस एस विभाग राजस्थान आर्य महाविद्यालय, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा सामान्य रुग्णालय यांचे संयुक्त विद्यमाने १५ ऑक्टोंबर रोजी डागा सभागृह,राजस्थान महाविद्यालय वाशिम येथेआपत्ती धोके निवारण दिवस   आयोजित करण्यात आला होता.            संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्यानुसार राज्य स्तरावर व जिल्हा स्तरावर दरवर्षी १३ ऑक्टोबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता दिलेली आहे.           राज्य शासनाने दिनांक ८ सप्टेंबर २०१७ रोजी शासन परिपत्रक निर्गमित करून दर वर्षी जिल्हा पातळीवर आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.       यानिमित्ताने राजस्थान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपत्ती धोके निवारण दिवसानिमित्त आपत्ती प्रतिसादासाठी कटिबद्ध होण्यासंदर्भात प्रतिज्ञा दिली.        यावेळी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना याबाबत विद्यार्थ्यां मध्ये जाणीव जागृती करून आयुष्यमान भारत जन

समृद्ध व्यक्तिमत्वासाठी ग्रंथ वाचन महत्वाचे -निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे

Image
समृद्ध व्यक्तिमत्वासाठी ग्रंथ वाचन महत्वाचे    -निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे        वाशिम, दि. 16 (जिमाका)  :   माजी राष्ट्रपती भारतरत्न स्व.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्षपूर्तिनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने 13 ऑक्टोबर रोजी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.           निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे हे उपस्थित कर्मचारी यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले, प्रत्येकाने ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. मनःस्वाथ्यासाठी वाचन हे आवश्यक आहे. समृध्द जीवन जगण्यासाठी आणि आदर्श व्यक्तीत्व विकासासाठी वाचनाचे महत्व त्यांनी विषद केले.              श्री.घुगे पुढे म्हणाले,जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात समृद्ध ग्रंथ संग्रह उपलब्ध असून यासाठी फक्त 100 रुपये द्विवार्षिक वर्गणी आहे. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांने ग्रंथालयाचे सभासदत्व स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.           कार्यक्रमाच्या सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते स्व.ए.पी.जे. अब्दुल कलाम व छत्रपती शिवाजी महा

मनरेगाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांचे यंत्रणांना निर्देश

Image
मनरेगाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांचे यंत्रणांना निर्देश        वाशिम, दि. 16 (जिमाका)  :   जिल्हयात मनरेगाच्या वतीने " ग्रामसमृद्धी व सुविधा संपन्न कुटुंब मिशन " राबविण्यासाठी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी,वन अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी व इतर कार्यक्रम अधिकारी यांना कालबद्ध कार्यक्रम दिला आहे. यामध्ये यावर्षी प्रत्येक ग्रामपंचायमध्ये किमान 25 सिंचन विहिरींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील सेफझोनमधील प्रत्येक ग्रामपंचायतसाठी किमान 25 विहिरींचा वैयक्तिक लाभ व सेमी क्रिटिकल झोनमधील प्रत्येक ग्रामपंचायतसाठी किमान 25 समूह सिंचन विहीरीचा लाभ इच्छुक अर्जदारांना द्यावयाचा आहे. यासाठी लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त करुन घेणे, लाभार्थ्यांची निवड करणे,पंचायत समितीस्तरावर प्रस्तावाची छाननी करून कामांना वर्क कोड देणे, तांत्रिक मान्यतेचे आदेश तयार करून घेणे व प्रशासकीय मान्यता देण्यासाठीची कार्यवाही येत्या पंधरा दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश आहे. यासोबतच प्रत

जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांची प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना भेटी*

Image
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांची प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना भेटी वाशिम दि.15(जिमाका) जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी आज 15 ऑक्टोबर रोजी मालेगाव तालुक्यातील आरोग्य वर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशी, उपकेंद्र डोंगरकिन्ही व डव्हा येथे भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष बोरसे व जिल्हा पर्यवेक्षक श्री.मिरगे प्रामुख्याने उपस्थित होते.                 भेटीदरम्यान जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांनी आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील डिलिव्हरी रूम, प्रयोगशाळेची व परिसर स्वच्छतेची पाहणी केली.आशा वर्कर यांना कामकाजाविषयी मार्गदर्शन करून संवाद साधला. गरोदर माता तपासणी, अतिजोखमीच्या माता, दर महिन्याच्या 9 तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान तसेच जास्तीत जास्त गरोदर महिलांची स्त्री रोग तज्ञांकडून तपासणी करून घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या तसेच गोल्डन कार्ड,आधारकार्ड व 18 वर्षे पुरुषांच्या आरोग्य तपासणी बा