पालकमंत्री संजय राठोड 20 ऑक्टोबरला घेणार विविध विषयांचा आढावा


पालकमंत्री संजय राठोड 20 ऑक्टोबरला घेणार विविध विषयांचा आढावा 

वाशिम दि 18 (जिमाका) पालकमंत्री संजय राठोड हे 20 ऑक्टोबर रोजी वाशीम येथे येत आहे. सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन येथे विविध विषयांचा आढावा आयोजित सभेत ते घेणार आहे.या सभेत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण),अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना सन 2023 - 24 या वर्षात यंत्रणांनी प्रस्तावित केलेल्या कामांचा तसेच आय - पास प्रणालीवर प्रस्तावित केलेली कामे व मान्यता मिळालेली कामे यांचा ते आढावा घेतील.
              तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ विकास आराखडा अंतिम करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.16 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक झाली.या बैठकीनुसार आराखड्यामध्ये झालेल्या बदलासाठी जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर