दिव्यांग मेळाव्याचा जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन



दिव्यांग मेळाव्याचा जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

       वाशिम, दि. 03 (जिमाका) : दिव्यांग व्यक्ती हा समाजाचा एक महत्वाचा घटक आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामिल करुन घेण्यासाठी शासनस्तरावरुन अनेक शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि कल्याणकारी योजना, उपक्रम व कार्यक्रम तसेच अभियान राबविण्यात येतात. त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती त्यांना व्हावी तसेच त्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी 4 ऑक्टोबर 2023 रोजी रिसोड रोडवरील तिरुपती लॉन येथे आयोजित दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या अभियानाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले आहे.

            दिव्यांगाच्या विकासामध्ये शिक्षण व प्रशिक्षण याचे मोठे स्थान आहे. परंतू या सवलती मिळविण्याकरीता त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दिव्यांग व्यक्ती हा प्रत्येक विभागामध्ये जावून त्यांना देण्यात येणाऱ्या सवलतीचा लाभ घेऊ शकत नाही. ही बाब शासनाच्या लक्षात येताच शासनच अशा दिव्यांग बांधवांच्या घरी गेले तर खऱ्या अर्थानी दिव्यांगांची सेवा होवू शकते हा हेतू समोर ठेवून जिल्हास्तरावर सर्व शासकीय विभागाच्या अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेवून त्याच ठिकाणी कामाचा निपटारा करता येईल. याकरीता दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी हे अभियान राज्यात राबविण्यात येत आहे.

           या अभियानातील शिबीराच्या माध्यमातून जिल्हयातील विविध प्रशासकीय यंत्रणेचे सर्व अधिकारी हे एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांग व्यक्तींना न्याय कसा देईल याबाबत सर्वतोपरी प्रयत्न करुन आयोजित शिबीरामध्ये त्यांना सेवा देण्यासाठी उपलब्ध राहतील. शिबीरामध्ये देण्यात येणाऱ्या सेवा यामध्ये दिव्यांगांना आवश्यक असणारी सर्व प्रमाणपत्रे जसे की, दिव्यांगत्वाचे युडीआयडी प्रमाणपत्र, शेत जमीनीशी संबंधित कागदपत्रे, जात प्रमाणपत्र व अन्य आवश्यक ती प्रमाणपत्रे देण्यासाठी दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या अभियानांतर्गत 4 ऑक्टोबर रोजी दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये 35 पेक्षा अधिक शासकीय यंत्रणेचा सहभाग राहणार आहे. या विभागांचे माहिती देणारे स्टॉल देखील उपलब्ध राहणार आहे. तरी जास्तीत जास्त जिल्हयातील दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घ्यावा.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे