दोन ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक : आचारसंहिता लागू ..डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
- Get link
- X
- Other Apps
दोन ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक : आचारसंहिता लागू
डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
वाशिम, दि. 05 (जिमाका) : डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायती आणि नव्याने स्थापित व सन 2022 मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीव्दारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारीक पध्दतीने राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम प्राप्त झाला आहे. निवडणूका असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ती निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील.
जिल्हयात मंगरुळपीर तालुक्यातील पोटी आणि कारंजा तालुक्यातील कामठवाडा या दोन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहे. तसेच जिल्हयातील वाशिम, मालेगांव, रिसोड, मंगरुळपीर, कारंजा व मानोरा तालुक्यातील निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणामुळे सदस्य/ थेट सरपंचाच्या जागा रिक्त झालेल्या 66 ग्रामपंचायतीतील 81 सदस्यांच्या व 4 थेट सरपंचाच्या ग्रामपंचायतीध्ये असे एकूण 85 रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची निवडणूक होणार आहे.
सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीव्दारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
6 ऑक्टोबरला निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येईल. 16 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागविण्याची व सादर करण्याची नमुना अ मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशनपत्रांची छाननी सुरू होईल. 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. त्यानंतर त्याचदिवशी म्हणजे 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजतानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. आवश्यक असल्यास 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वाजेपासून ते सायंकाळी 5.30 वाजतापर्यंत मतदान घेण्यात येईल. 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी व निकाल घोषित होईल. 9 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. असे ग्रामपंचायत निवडणूकीचे नोडल अधिकारी यांनी कळविले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment