शिष्यवृत्ती,फ्रिशीप व शैक्षणिक योजना**महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज मागविले*समाज कल्याण विभागाचे आवाहन


*शिष्यवृत्ती,फ्रिशीप व शैक्षणिक योजना*

*महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज  मागविले*

समाज कल्याण विभागाचे आवाहन 
      
 वाशिम, दि.17 (जिमाका)   सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जाती,ईतर मागास वर्ग,विशेष मागास प्रवर्ग या विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, फ्रिशीप व इतर शैक्षणिक योजनांचे सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाचे अर्ज महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन भरण्यासाठी विद्यार्थ्यांना 11 सप्टेंबर 2023 पासून माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून पोर्टल कार्यान्वीत करण्यात आले आहे. 
                 सन 2022- 23 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे व नुतनकरणाचे अर्ज महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन भरण्यासाठी विद्यार्थ्यांना शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.
         अनुसूचित जाती,ईतर मागास वर्ग,विशेष मागास प्रवर्ग या विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाडिबीटीच्या https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाचे अर्ज भरण्यासाठी 11 ऑक्टोंबर 2023 पासून पोर्टल सुरू झाले आहे.तरी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी,परिक्षा फी प्रदाने,राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती,व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना व व्यावसायीक अभ्यासक्रमांशी संलग्न असलेल्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी विद्यावेतन योजनेचे अर्ज भरावे.जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यानी सुध्दा आपल्या महाविद्यालयात प्रवेशित योजनेस पात्र असलेल्या अनुसूचित जाती, ईमाव,विमान,विजाभज प्रवर्गातील संपुर्ण विद्यार्थ्यांचे अर्ज महाडिबीटी संकेतस्थळावर विहित मुदतीपूर्वी अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही करावी.महाविद्यालयाच्या सूचना फलकावर याबाबत सूचना देण्यात याव्या.असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे. 
                    *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश