श्रीमती पंत यांनी केली सुरक्षित मातृत्व अभियानाची पाहणी

श्रीमती पंत यांनी केली 
सुरक्षित मातृत्व अभियानाची पाहणी 

वाशिम दि.9 (जिमाका) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी आज 9 ऑक्टोबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मनभा, उंबर्डाबाजार व कासोळा,आरोग्य वर्धिनी केंद्र कारंजा व ग्रामीण रुग्णालय मंगरूळपीर येथे प्रत्यक्ष भेट देऊन सुरक्षित मातृत्व अभियान कार्यक्रमाची पाहणी केली.यावेळी त्यांनी गरोदर महिला व स्तनदा मातांशी संवाद साधला. उपस्थित महिलांना देण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक सेवांविषयी विचारणा देखील त्यांनी यावेळी केली.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे उपस्थित होते.
                  आरोग्य संस्थांमध्ये औषधीसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे का याची पाहणी करून खात्री देखील त्यांनी यावेळी केली. तसेच आभा व गोल्डन कार्डविषयी सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून आढावा घेतला. कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
         जिल्ह्यात दर महिन्याच्या 9 तारखेला सुरक्षित मातृत्व अभियान हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये, उपजिल्हा रुग्णालयामध्ये,ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये राबविण्यात येतो.या अभियानादरम्यान गरोदर महिला व स्तनदा माता यांची मोफत आरोग्य  तपासणी करून उपचार केले जातात. योग्य ते आरोग्य शिक्षण त्यांना दिले जाते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे