मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम वेळापत्रक जाहीर





मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

वेळापत्रक जाहीर

वाशिम, दि. 26 (जिमाका)  भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे - 27 ऑक्टोबर 2023, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी - 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023, विशेष मोहिमेचा कालावधी - मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार, मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे 5 जानेवारी 2024 तसेच 4 नोव्हेंबर, 5 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबर व 26 नोव्हेंबर 2023 रोजी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सर्व मतदार केंद्रावर विशेष नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.

विशेष मतदार नोंदणी शिबीरांमध्ये विद्यार्थी, महिला, दिव्यांग तसेच तृतीयपंथीय आणि देहविक्री करणाऱ्या महिला व घर नसलेले भटक्या विमुक्त जमातीच्या मतदारांची मतदार नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी कैलास देवरे यांनी दिली.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे