महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर 10 व 11 ऑक्टोबर रोजी जिल्हयात
महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर
10 व 11 ऑक्टोबर रोजी जिल्हयात
वाशिम, दि.09 (जिमाका) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर हया 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी जिल्हयात दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता अमरावती येथून शासकीय वाहनाने वाशिमकडे प्रयाण व वाशिम येथे मुक्काम.11 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 10.30 वाजतापर्यंत राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय,आंबेडकर चौक,वाशिम येथे भेट व विद्यार्थीनी सोबत संवाद साधतील.सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 वाजतापर्यंत जनसुनावणी. दुपारी 1.30 ते दुपारी 3 वाजतापर्यंत राखीव. दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय आढावा बैठक घेतील.सायंकाळी 5 ते 5.30 वाजतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद घेतील.सायंकाळी 6 वाजता वाशिम येथून पातुर,जि. अकोलाकडे प्रयाण करतील.
*******
Comments
Post a Comment