दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान* 4 ऑक्टोबरला वाशीम येथे दिव्यांग मेळावा*
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान
*4 ऑक्टोबरला वाशीम येथे दिव्यांग मेळावा*
वाशिम दि.3 (जिमाका) " दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी " हा या कार्यक्रमाअंतर्गत दिव्यांग मेळाव्याचे आयोजन 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता तिरुपती लॉन,शासकीय तंत्रनिकेतन समोर रिसोड रोड,वाशिम येथे केले आहे.
अध्यक्षस्थानी मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड हे असतील.मेळाव्याचे उद्घाटन दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक राज्यमंत्री दर्जा असलेले आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे करतील.यावेळी जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,खासदार भावना गवळी,खासदार संजय धोत्रे, आमदार सर्वश्री एड.किरणराव सरनाईक,वसंत खंडेलवाल, धीरज लिंगाडे,लखन मलिक,राजेंद्र पाटणी व अमित झनक जिल्हा परिषद उपाध्यक्ष चक्रधर गोटे,समाज कल्याण समिती सभापती अशोक डोंगरदिवे,अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी,महिला बालकल्याण समिती सभापती वैशाली लळे आणि कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती वैभव सरनाईक यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,पोलीस अधीक्षक बच्चन सिंह,समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम व जिल्हा समाज कल्याण अधिकारी मारुती वाठ यांची देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या मेळाव्याला उपस्थित राहुन विविध योजनांची माहिती जाणून घेऊन योजनांचा लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,यांनी केले आहे.
Comments
Post a Comment