शेतकऱ्यांनी शेती निगडित व्यवसायाची कास धरावी. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.जांभरून परांडे येथे भाग्यलक्ष्मी ग्रुपच्या पुढाकारातून शेतकरी चर्चासत्र


शेतकऱ्यांनी शेती निगडित व्यवसायाची कास धरावी.
           जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.

जांभरून परांडे येथे भाग्यलक्ष्मी ग्रुपच्या पुढाकारातून शेतकरी चर्चासत्र


वाशिम दि.2(जिमाका) शेतकऱ्यांनी त्यांच्या आर्थिक विकासासाठी आता शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून एकत्र येणे आवश्यक आहे.आता केवळ शेती न करता शेती आधारीत उद्योगाची कास धरावी.असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी केले.
         जांभरुण परांडे तामसी फाटा येथे 1 ऑक्टोबर रोजी भाग्यलक्ष्मी ग्रुपच्या वतीने शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. चर्चासत्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी यांनी केले.अध्यक्षस्थानी कृषीभूषण शेतकरी राधेश्याम मंत्री होते.प्रमुख अतिथी म्हणून परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर,चंद्रपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार,फार्म लॅब पुणेचे डॉ.संतोष चव्हाण,कृषी विज्ञान केंद्र हिंगोलीचे शास्त्रज्ञ श्री.भालेराव,महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक डॉ.प्रशांत घावडे,तालुका कृषी अधिकारी श्री.जावळे व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
     श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या,महिला बचत गटांनी व शेतकरी गटांनी विविध उद्योगांची उभारणी करून एकत्रित मार्केटिंग केल्यास पैशाची बचत होऊन उत्पादन वाढेल, त्या दृष्टीने पुढे येऊन त्यांनी मार्केटिंग ब्रॅण्डिंग यावर भर दिला पाहिजे.शेतकऱ्यांनी एकच एक पीक न घेता वेगवेगळी पिके घेऊन त्याचे मूल्यवर्धन केले पाहिजे. शेतकऱ्यांनी विविध शासकीय योजनेच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगांची उभारणी केली तर हे शक्य होईल. विविध योजना आहेत त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा.तसेच सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाने मागेल त्याला विहीर देण्याची योजना आहे त्याची शेतकऱ्यांनी मागणी करण्याचे आवाहन श्रीमती बुवनेश्वरी यांनी यावेळी केले.
                    जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.तोटावर यांनी सोयाबीन अष्टसूत्रीबाबत मार्गदर्शन केले.  विविध उत्पादन वाढीच्या बाबी शेतकऱ्यांना सांगितल्या.
       जैविक निविष्ठा फार्म लॅबविषयी डॉ.चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. सोयाबीन पिकाच्या सध्याच्या परिस्थितीबाबत कृषी विज्ञान केंद्र हिंगोलीचे शास्त्रज्ञ राजेश भालेराव यांनी मार्गदर्शन केले.
         यावेळी शिवारफेरी राधेश्यामजी मंत्री यांच्या शेतातील करटोली व तोंडली रान भाजीच्या प्रयोगाला जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. तसेच एस आर टी पद्धतीचे सोयाबीन व जैविक शेती संकल्पना समजावून घेतली. हिंगोली,वाशिम,अमरावती, चंद्रपूर,बुलढाणा व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या चर्चासत्रामध्ये समावेश होता.    
         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाग्यलक्ष्मी व्हाट्सअप ग्रुपच्या  महादेव नवघरे,श्री.चव्हाण व श्री. देवळे या सदस्यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक ग्रुप ॲडमिन चव्हाण यांनी केले.संचालन जयप्रकाश लव्हाळे व देवळे यांनी केले.उपस्थितांचे आभार  श्री. मंत्री यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे