इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे 13 ऑक्टोबरला जिल्हयात


इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे 13 ऑक्टोबरला जिल्हयात 
 
वाशिम,दि.12 (जिमाका)  गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे शुक्रवारी 13 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.सकाळी 7.45 वाजता शासकीय विश्रामगृह,वाशिम येथे आगमन व राखीव,सकाळी 8 वाजता भाजपा कार्यालय येथे मान्यवरांच्या भेटी ,सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह येथे त्यांची पत्रकार परिषद .दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह येथुन पोहरादेवीकडे प्रयाण.दुपारी 1 वाजता पोहरादेवी येथे आगमन व मेळाव्यास उपस्थित राहून जागर यात्रेच्या पहिल्या टप्प्यातील समारोपीय कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत उपस्थित राहतील. सोईनूसार पोहरादेवी येथुन छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित