उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस13 ऑक्टोबर रोजी जिल्हयात
- Get link
- X
- Other Apps
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13 ऑक्टोबर रोजी जिल्हयात
वाशिम, दि. 12 (जिमाका) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 13 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सकाळी 11.55 वाजता मुंबई येथून विमानाने अकोला विमानतळ येथे आगमन. दुपारी 12.05 वाजता हेलीकॉप्टरने वाशिम जिल्हयातील मानोरा तालुक्यातील वसंतनगर (पोहरादेवी) कडे प्रयाण करतील. दुपारी 12.35 वाजता वसंतनगर (पोहरादेवी) येथील हेलीपॅडवर हेलीकॉप्टरने आगमन. दुपारी 12.40 वाजता मोटारीने पोहरागडकडे प्रयाण. दुपारी 12.50 वाजता पोहरागड येथे आगमन व दर्शनाकरीता राखीव. दुपारी 1.10 वाजता मोटारीने सभा स्थळाकडे प्रयाण. दुपारी 1.15 वाजता सभास्थळ येथे आगमन व भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने आयोजित ओबीसी जागर यात्रेच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थिती. दुपारी 2.45 वाजता वसंतनगर हेलीपॅडकडे प्रयाण. दुपारी 2.55 वाजता वसंतनगर (पोहरादेवी) हेलीपॅड येथे आगमन. दुपारी 3 वाजता हेलीकॉप्टरने अकोला विमानतळाकडे प्रयाण करतील.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment