महिला आयोग आपल्या दारी " उपक्रम11 ऑक्टोबरला जनसुनावणी
- Get link
- X
- Other Apps
" महिला आयोग आपल्या दारी " उपक्रम
11 ऑक्टोबरला जनसुनावणी
वाशिम, दि. 05 (जिमाका) : राज्य महिला आयोग मुंबई येथे असल्याने राज्यातील अनेक महिलांना मुंबई येथे पोहचणे शक्य होत नाही. त्यामुळे महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिकस्तरावर आपले म्हणणे मांडण्याकरीता " महिला आयोग आपल्या दारी " या उपक्रमाच्या माध्यमातून 11 ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता नियोजन भवन येथे जनसुनावणी होणार आहे. या जनसुनावणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर उपस्थीत राहणार आहे.
जिल्ह्यातील तक्रारदार पिडीत महिलांना थेट जनसूनावणीस उपस्थित राहुन आपली समस्या व तक्रारी आयोगापुढे मांडता येणार आहे. तरी या जनसूनावणीस जिल्ह्यातील जास्तीत जास्त तक्रारदार पिडीत महिलांनी उपस्थित राहून आपल्या समस्या व तक्रारी मांडाव्यात. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बाळासाहेब सुर्यवंशी यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment