जिल्हा ग्रंथालयात विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन
जिल्हा ग्रंथालयात विद्यार्थ्यांना
सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन
वाशिम, दि.17 (जिमाका) जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात 16 ऑक्टोबर रोजी सायबर सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्री.टेकवाणी होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य लोक अभिरक्षक ॲड.राजेश विसपुते व सहायक लोक अभिरक्षक ॲड. राहुल पुरोहित यांची उपस्थिती होती.
यावेळी श्री.टेकवाणी यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत घ्यावयाची काळजी तसेच कोणतीही कायदेविषयक मदत लागल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
ॲड.पुरोहित यांनी सायबर सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारीपासून बचाव करण्याकरीता घ्यावयाची दक्षता याविषयी तर श्री. विसपुते यांनी सायबर क्राईममध्ये कोणती काळजी घ्यावी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार दिपक बनसोडे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेले विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
*******
Comments
Post a Comment