राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानसमान व असमान निधी योजना शासनमान्य ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविले





राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान

समान व असमान निधी योजना शासनमान्य ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविले

वाशिम, दि. 31 (जिमाका)  केंद्र सरकारच्या सांस्कृतीक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठान,कोलकाता यांच्या अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय,मुंबई यांच्या वतीने राबविण्यात येतात. समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी सन 2023-24 या वर्षासाठी विविध समान व असमान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहे. यासाठी नियम,अटी व अर्जाचा नमुना www.rrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावा.

            सन 2023-24 या  वर्षासाठी समान निधी योजनेअंतर्गत इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजनेसाठी 25 लक्ष रुपये. या योजनेव्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पध्दतीने देण्यात येत असल्यामुळे इतर योजनेसाठी प्रस्ताव सादर करु नये.

            सन 2023-24  साठीच्या असमान निधी योजनेअंतर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्ताराअंतर्गत फर्निचर खरेदीसाठी 4 लक्ष रुपये व इमारत बांधकाम 10 ते 15 लक्ष रुपये अर्थसहाय्य. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान “ज्ञान कोपरा” विकसित करण्यासाठी 2 लक्ष 50 हजार रुपये व विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरणासाठी 2 लक्ष रुपये अर्थसहाय्य. महोत्सवी वर्ष जसे 50, 60, 75, 100, 125 व 150 वर्ष साजरे करण्यासाठी 6 लक्ष 20 हजार रुपये व इमारत विस्तारासाठी 10 लक्ष रुपये अर्थसहाय्य. राज्यस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रमाच्या आयोजनासाठी 1 लक्ष 50 हजार रुपये, 2 लक्ष 50 हजार रुपये व 3 लक्ष रुपये अर्थसहाय्य. बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय "बाल कोपरा स्थापन करण्याकरीता 6 लक्ष 80 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

            योजनेच्या लाभासाठी  www.mmlf.gov.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे. आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी या योजनेपैकी कोणत्याही एका योजनेसाठी प्रस्ताव 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी व हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास सादर करावा. असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे