पालकमंत्री संजय राठोड उदया 20 ऑक्टोबरला जिल्ह्यात*
*पालकमंत्री संजय राठोड उदया 20 ऑक्टोबरला जिल्ह्यात*
वाशिम दि.19 (जिमाका) मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड हे 20 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.सकाळी 10:20 वाजता दिग्रस येथून शासकीय वाहनाने मानोरा - मंगरूळपीरमार्गे वाशिमकडे प्रयाण. सकाळी 11:20 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व जिल्हा नियोजन समिती, सभागृह येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीची मंजूर झालेली,प्रस्तावित व मंजूर करावयाच्या कामांचा आढावा घेतील.दुपारी 2 वाजता विश्रामगृहाकडे प्रयाण.दुपारी 2:10 वाजता विश्रामगृह येथे आगमन व राखीव.दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय वाशिमकडे प्रयाण.दुपारी 3:10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,वाशिम येथे आगमन व तीर्थक्षेत्र विकास समितीच्या आढावा बैठकीला उपस्थित राहून सोयीनुसार यवतमाळकडे प्रयाण करतील.
Comments
Post a Comment