ग्रा.पं.धुमका येथे स्वच्छता हीच सेवा उत्साहात



ग्रा.पं.धुमका येथे स्वच्छता हीच सेवा उत्साहात 

वाशिम दि.1(जिमाका) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम 1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत धुमका येथे उत्साहात राबविण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत कार्यालय येथून स्वच्छता मोहीम सुरु करण्यात आली.ग्रामपंचायत कार्यालय परिसर संपूर्ण स्वच्छ करण्यात आला,त्यानंतर गावातील प्रमुख रस्ता मार्ग जिल्हा परिषद शाळा समोरील परिसर स्वच्छ करण्यात आला. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे स्वच्छता हीच सेवा कार्यक्रम संपन्न करून समारोप करण्यात आला.ग्रामपंचायत धुमका अंतर्गत स्वच्छता हीच सेवा श्रमदान सकळी 10 वाजता सुरु करून दुपारी 12 पर्यंत ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील नागरिक यांनी श्रमदान केले.तसेच निलेश कंकाळ यांनी स्वच्छता विषयक गाणे गाऊन नागरिकांना प्रोत्साहन दिले यावेळी सरपंच सौ. कविता दशरथ राठोड यांनी उपस्थित राहून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन केले. ग्रामपंचायत सचिव धम्मानंद भगत यांनी स्वच्छता सेवाविषयक महत्त्व विषद केले.यावेळी उपसरपंच सौ.गीता नंदू धुळे, ग्रामपंचायत सदस्य संदीप राठोड,आनंदा इंगोले,प्रकाश पवार,दत्ता जोजार,प्रियांका भगत, उषा जाधव,अनुसया राठोड,सुनीता जाधव संगणक परिचालक शेखर हिरगुडे,शिपाई रामू राठोड,रोजगार सेवक राजेश राठोड ,पाणीपुरवठा निलेश राठोड ,आरोग्य उपकेंद्र अंतर्गत पूजा गोटे समुदाय आरोग्य अधिकारी मालती तालेवार आरोग्य सेविका श्रीमती गिरी ,श्रीमती मस्के, गावातील नागरिक बंदेसिंग राठोड, बाबाराव राठोड,सुधाकर राठोड,प्रदीप राठोड धनराज इंगोले,भास्कर इंगोले, दिनकर इंगोले, पंजाब पवार,जेमला जाधव,पवन जाधव,विष्णू राठोड, विनोद आडे,गुणवंत जाधव,शेषराव दुकानदार,नारायण वानखेडे,दिनेश राठोड,रोहिदास इंगोले,रवी बबन, विलास इंगोले व गावातील इतर नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे