कायदेविषयक जनजागृती वकोर्ट परिसरात स्वच्छता अभियान
- Get link
- X
- Other Apps
कायदेविषयक जनजागृती व
कोर्ट परिसरात स्वच्छता अभियान
वाशिम, दि. 04 (जिमाका) : 2 ऑक्टोबर रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने वाशिम येथील जिल्हा स्त्री रुग्णालय (लेडी आर्डिंग), जिल्हा सामान्य रुग्णालय, पाटणी चौक आणि जुना रिसोड नाका येथे जेष्ठ नागरिक दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती करण्यात आली. सोबतच बेटी बचाव बेटी पढाओ, समाजातील वाईट व्यसनांपासून दूर रहाण्यासाठी, कौटुंबिक हिंसाचार, वाढती लोकसंख्या व इतर विषयांवर शाहीर उत्तम इंगोले यांनी आपल्या आवाजात गाणी गायली. इतर विधी स्वयंसेवकांनी विधी सेवा प्राधिकरणच्या कार्याबाबत लोकांना माहिती दिली. तसेच मुख्य बाजारपेठेत व नागरिकांना हस्तपत्रके वितरित केली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विधी स्वयंसेवक सुशील भिमजियाणी, उत्तम इंगोले, मोतीराम खडसे, राजकुमार पडघाण, जगदीश मानवतकर, माधव डोंगरदिवे, शीतल बन्सोड, मेघा दळवी, अंजुश्री काळे, गणेश पंडित, प्रिया पाठक आदींनी परिश्रम घेतले.
जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात विधी स्वयंसेकांनी सहभागी होत न्यायालय परिसराची स्वच्छता केली. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विजय टेकवाणी तसेच सर्व न्यायाधीश व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment