जांभरुण (परांडे) येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर उत्साहात
- Get link
- X
- Other Apps
जांभरुण (परांडे) येथे
कायदेविषयक जनजागृती शिबीर उत्साहात
वाशिम, दि. 20 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ यांच्या संयुक्त वतीने वाशिम तालुक्यातील जांभरुण (परांडे) येथे 19 ऑक्टोबर रोजी कायदेविषयक जनजागृती शिबीर उत्साहात संपन्न झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्ही.ए. टेकवाणी होते. यावेळी जिल्हा विधीज्ञ संघाचे कोषाध्यक्ष ॲड. दलित गुडदे, पोलीस पाटील श्रीमती गीता मोहळे, मुख्य लोक अभिरक्षक ॲड. परमेश्वर शेळके, ॲड. जी.व्ही मोरे यांची प्रमख उपस्थिती होती.
श्री. टेकवाणी म्हणाले, नागरीकांना कायदेविषयक मदत लागल्यास मोफत विधी सेवेचा लाभ घ्यावा. कायदेविषयक मदतीसाठी नागरीक जिल्हा विधी प्राधिकरण वाशिम या कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. ॲड. शेळके यांनी ज्येष्ठ नागरीकांचे कायदे व नालसा योजना याविषयी, ॲड. मोरे यांनी दिव्यांगांचे कायदे व कल्याणकारी योजना तसेच सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला जांभरुण परांडे येथील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कर्मचारी व विधी स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment