कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अशासकीय सदस्य नियुक्तीसाठी संस्था व व्यक्तींकडून 26 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविले





कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण

अशासकीय सदस्य नियुक्तीसाठी संस्था व व्यक्तींकडून

26 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविले

       वाशिम, दि. 20 (जिमाका) : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ नुसार प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, रुग्णालये व खाजगी आस्थापना याठिकाणी महिला तक्रार निवारण समित्या स्थापन करणे बंधनकारक आहे. या समित्यांमध्ये शासकीय सदस्या व्यतिरिक्त अशासकीय सदस्यांचा समावेश असावा. त्यानुसार समितीवर महिलांच्या विविध प्रश्नावर काम करत असणाऱ्या इच्छुक संस्था व व्यक्तींनी अर्ज सादर करण्यासाठी संस्था आणि व्यक्तीनी समितीवरील सदस्याबाबतचे अर्ज २६ ऑक्टोबरपर्यंत सादर करावे. संबंधितांनी अर्जाचा नमूना कार्यालयातून प्राप्त करुन घ्यावा. अधिक माहिती व अर्ज प्राप्त करुन घेण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे