अटल अर्थसहाय्य योजना अशासकीय सदस्यपदासाठी अर्ज मागविले
- Get link
- X
- Other Apps
अटल अर्थसहाय्य योजना
अशासकीय सदस्यपदासाठी अर्ज मागविले
वाशिम, दि. 03 (जिमाका) : सहकार आणि पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या २ जानेवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजनेच्या राज्यस्तरीय समितीची सभा ४ सप्टेंबर २०२३ रोजी झाली. सभेत अटल अर्थसहाय्य योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय समितीमधील नविन अशासकिय सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. त्याबाबत अनुभवी व्यक्तींच्या नावाची यादी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांना सादर करण्याबाबत सूचना दिल्या आहे.
तरी जिल्हयातील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करीत असलेल्या समाजसेवी संस्था किंवा जिल्हास्तरीय सहकारी संस्थेत 5 वर्षांपेक्षा जास्त काम केलेल्या शासकीय व अर्धशासकीय आस्थापना व संस्थांवर कामकाजाचा अनुभव असणाऱ्या सेवानिवृत्त व विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी ५ दिवसाच्या आत त्यांची शैक्षणिक पात्रता व अनुभवाबाबतच्या तपशिलासह जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अटल अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अशासकीय सदस्यपदी नियुक्तीसाठी अर्ज सादर करावे. प्राप्त अर्जापैकी पात्र व्यक्तींची नावे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांच्याकडे पाठविण्यात येतील. असे जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय राठोड यांनी कळविले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment