19 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हयात स्थापीत 8 प्रशिक्षण केंद्राचे ऑनलाईन उदघाटन


19 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हयात स्थापीत 8 प्रशिक्षण केंद्राचे ऑनलाईन उदघाटन

उदघाटन सोहळयाचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे आवाहन
      
 वाशिम,दि.17 (जिमाका) ग्रामीण भागातील 18 ते 45 वयोगटातील युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याकरीता ग्रामपंचायतस्तरावर कौशल्य, विकास,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून राज्यात 511 ठिकाणी प्रमोद महाजन उद्योजकता कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.या प्रशिक्षण केंद्रात जिल्हयातील इच्छुक युवकांना पुर्णत: नि:शुल्क स्वरुपाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
          या स्थापीत झालेल्या प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे.हा उदघाटन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीसुध्दा व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सूचना दिल्या आहे.
                  जिल्हयातील वाशिम तालुक्यातील अनसिंग,मालेगांव तालुक्यातील किन्हीराजा व शिरपुर, मंगरुळपीर तालुक्यातील जांब - सोनखास,कारंजा तालुक्यातील कामरगांव व उंबर्डाबाजार,रिसोड तालुक्यातील वाकद व मानोरा तालुक्यातील पोहरादेवी या 8 ग्रामपंचायतस्तरावर स्थापीत प्रशिक्षण केंद्राचे ऑनलाईन उदघाटन होणार आहे.
                 तरी या ग्रामपंचात व जवळच्या ठिकाणचे रोजगार इच्छुक युवक,पालक व इतर रहिवाशानी 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता उपस्थित राहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य केंद्राच्या उदघाटन व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी केले आहे           
                     *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे