सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील 4 ऑक्टोबरला जिल्ह्यात
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील
4 ऑक्टोबरला जिल्ह्यात
वाशीम दि.3 (जिमाका) सहकार मंत्री दिलीप वळसे - पाटील 4 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.4 ऑक्टोबर रोजी सकाळी 8:50 वाजता मुंबई येथून विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ,नागपूर येथे आगमन. सकाळी 9 वाजता मोटारीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग मार्गे कारंजा( लाड) जि.वाशिमकडे प्रयाण.सकाळी 11 वाजता पुंजानी कॉम्प्लेक्स, मेन रोड कारंजा लाड येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वाजता मोटारीने पुंजानी कॉम्प्लेक्स, मेन रोड कारंजा (लाड) येथून वाशिमकडे प्रयाण.दुपारी 1 वाजता स्वागत लॉन,शुक्रवार पेठ वाशिम येथे आगमन. दुपारी 1.15 वाजता वाशिम येथील स्वागत लॉन येथे येथे आयोजित वाशिम जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक व कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती. दुपारी 3 वाजता मोटारीने स्वागत लॉन येथून अकोलाकडे प्रयाण करतील.
Comments
Post a Comment