प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीव्दारे प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन जिल्हयातील 8 ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा समावेश शिरपूर (जैन) येथील कार्यक्रमास जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती



प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीव्दारे

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन

जिल्हयातील 8 ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा समावेश

शिरपूर (जैन) येथील कार्यक्रमास जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती

       वाशिम, दि. 19 (जिमाका)  जिल्हयात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 19 ऑक्टोबर रोजी दूरदृष्यप्रणालीव्दारे करण्यात आले. जिल्हयातील मालेगांव तालुक्यातील शिरपूर (जैन) येथे देखील या केंद्राचा उदघाटन सोहळा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी माजी आमदार ॲड. विजय जाधव, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, गटविकास अधिकारी कैलाश घुगे, कौशल्य विकास अधिकारी सीमा खिरोडकर, शिरपूर (जैन) चे संतोष अढागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

          श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, कौशल्य विकासविषयक विविध प्रकारचे प्रशिक्षण युवा वर्गाला या केंद्राच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे युवा वर्गाची कौशल्य विकसीत होवून ते विविध प्रकारचे उद्योग व्यवसाय करुन स्वावलंबी होण्यास या केंद्राची मदत होणार आहे. उपस्थित विद्यार्थ्यांना उद्देशून त्या पुढे म्हणाल्या, मोबाईलचा दोन प्रकारे वापर करता येतो. एक चांगला आणि एक वाईट. अभ्यासासाठी मुलांनी मोबाईलचा वापर करणे ही चांगली बाब आहे. परंतू मोबाईलचा अनावश्यक वापर केला तर मुलांची प्रगती होणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

          कार्यक्रमाला विस्तार अधिकारी श्री. पळसकर, श्री. देवकते, ग्रामपंचायतचे सचिव संजय घुगे यांचेसह शिरपूर (जैन) येथील विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच युवा वर्ग तसेच नागरीक व महिला मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विकास अधिकारी सीमा खिरोडकर यांनी केले. संचालन प्रगती स्किल डेव्हलपेंट सेंटरचे संचालक श्री. डोईफोडे यांनी केले.

          कारंजा तालुक्यातील कामरगांव येथे प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला कारंजा उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे, तहसिलदार कुणाल झाल्टे, कारंजा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. भालेराव, तालुका कृषी अधिकारी श्री. जटाळे, कौशल्य विकासचे फेलो प्रतिक बाराहाते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कामरगांव येथील विविध शाळांचे विद्यार्थी, बचतगटांच्या महिला तसेच नागरीकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

         मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी कैलास देवरे, तहसिलदार रवि राठोड, जि.प. सदस्य अजय जयस्वाल, पोहरादेवीचे सरपंच विनोद राठोड, वसंतनगरचे सरपंच गणेश जाधव, पंचायत समितीचे अधिक्षक श्री. पदमने, आयटीआयचे प्राचार्य श्री. भुयार, परम स्किल ट्रेनिंग इन्स्टिटयूटचे संचालक श्री. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला पोहरादेवी येथील विविध शाळांचे विद्यार्थी, नागरीक व बचतगटांच्या महिलामोठया संख्येने उपस्थित होत्या.

         जिल्हयात वाशिम तालुक्यातील अनसिंग, मालेगांव तालुक्यातील किन्हीराजा, मंगरुळपीर तालुक्यातील जांब-सोनखास, कारंजा तालुक्यातील उंबर्डाबाजार व रिसोड तालुक्यातील वाकद या ग्रामपंचायतस्तरावर स्थापीत प्रशिक्षण केंद्राचे दूरदृष्यप्रणालीव्दारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला देखील संबंधित तालुक्याचे तहसिलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, आत्मा प्रकल्प संचालक व कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते.  

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे