जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात स्वच्छतेचा जागर " स्वच्छता ही सेवा " उपक्रम उत्साहात संपन्न
जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात
स्वच्छतेचा जागर " स्वच्छता ही सेवा
" उपक्रम उत्साहात संपन्न
वाशिम.दि.1 (जिमाका) 2 ऑक्टोबर या महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून " स्वच्छता ही सेवा 2023 " हा उपक्रम (एक तारीख-एक तास) 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात राबविण्यात आला .
यावेळी सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार,सहाय्यक पुरवठा अधिकारी राजेश वझीरे, महसुल तहसीलदार राहुल वानखेडे, सहाय्यक अधीक्षक सुनील घोडे,मीरा पुरोहित,मंडळ अधिकारी गजानन करवते,नाझर आनंद आरू,सुमेध खडसे,निखिल मनवर,शरद भाग्यवंत, ज्ञानेश्वर बाजड,सुधाकर गोगरकर, शरद भाग्यवंत,रंजना अडकीने,रवि अंभोरे,श्रीकांत वडोदे, विनोद मारवाडी,ज्ञानेश्वर अवधूत,शीतल पावडे,गजानन कु-हाडे यांच्या इतर कर्मचारी उपस्थित होते.उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुरवठा विभाग,आस्थापना विभाग,महसूल विभाग,भूसंपादन विभाग, रोहयो, नैसर्गिक आपत्ती विभाग,विविध शाखा आदी विभागात स्वच्छता मोहीम राबविली.
#SwachhaBharat
#SwachhataHiSeva
Comments
Post a Comment