Posts

Showing posts from February, 2021

देगाव शाळेतील बाधित विद्यार्थ्यांची सर्वोतपरी काळजी घेण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

  ·         पालकांनी काळजी न करण्याचे आवाहन वाशिम दि. २५ : रिसोड तालुक्यातील देगाव येथील शाळेतील कोरोना बाधित आढळलेल्या सर्व २२९ विद्यार्थ्यांची सर्वोतोपरी काळजी घेवून त्यांना आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्याकडून दूरध्वनीद्वारे कोरोना बाधित विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत माहिती जाणून घेतली. तसेच सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोरोनाची कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत , त्यामुळे पालकांनी काळजी करू नये , असे आवाहन त्यांनी केले. देगाव येथील निवासी शाळेतील ४ शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी आणि वसतिगृहात राहणारे २२९ विद्यार्थी कोरोना बाधित आले आहेत. या विद्यार्थ्यांना सर्व आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. याठिकाणी डॉक्टरांचे पथक , रुग्णवाहिका उपलब्ध ठेवावी. विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही , याची दक्षता घ्यावी. एखाद्या विद्यार्थाला काही मध्यम अथवा गंभीर लक्षणे दिसल्यास त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे. या विद्यार्थ्यां

देगाव येथील शाळेतील सर्व बाधित विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

Image
  ·         कोणालाही कोरोनाचे गंभीर लक्षण नाही ·         शाळेचे कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतर ·         विद्यार्थ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी ·         जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची शाळेला भेट वाशिम (जिमाका) दि. २५ : रिसोड तालुक्यातील देगाव येथील एका निवासी शाळेतील ४ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व वसतिगृहात राहणारे २२९ विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आले. त्यानंतर जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी २४ फेब्रुवारी रोजी तातडीने शाळेला भेट देवून बाधित विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी संबंधित विभागांना सूचना दिल्या. या शाळेच्या वसतिगृहाची इमारत आता कोविड केअर सेंटर म्हणून घोषित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनीही आज, २५ फेब्रुवारी रोजी शाळेला भेट देवून विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक सद्यस्थितीचा आढावा घेतला. सर्व बाधित विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही गंभीर लक्षणे आढळलेली नाहीत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. देगाव येथील संबंधित शाळेत आजूबाजूच्या जिल्ह्यातून विद्यार्थी दाखल झाले. कोरोना

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

Image
  ·         कोणत्याही कार्यक्रमाला ५० पेक्षा जास्त उपस्थिती नको ·         सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक ·         भाजीपाला, फळे बाजार विकेंद्रित ठिकाणी सुरु करा वाशिम ,   दि. १७ (जिमाका) :   कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरपालिका व ग्रामपंचायत क्षेत्रात गर्दी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, १७ फेब्रुवारी रोजी विविध जिल्हास्तरीय अधिकारी, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, नगरपालिका व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अतुल कानडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, प्रभारी उपमुख्य कार्यकारी अ

कोरोना चाचणीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

Image
    ·         लक्षणे असल्यास चाचणी करून घ्यावी ·         जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा सभा ·           ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात होणार चाचणी   वाशिम ,   दि. १५ (जिमाका) :   गेल्या काही दिवसांत आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. आपल्या जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी कोरोना बाधितांचा लवकर शोध घेवून त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना चाचणीसाठी घशातील स्त्राव नमुने संकलित केले जाणार आहेत. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींनी याठिकाणी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.   यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर

अवकाळी पावसामुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घ्या

Image
  ·        कृषि विभागाचे आवाहन ·        पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वाशिम ,   दि. १५ (जिमाका) :   जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये चांगला पाऊस झाला असल्याने पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे रब्बी हंगामात पेरणी क्षेत्रात सरासरी क्षेत्राच्या ११४ टक्के क्षेत्रावर गहू व हरभरा पिकाची लागवड झाली. यामध्ये गहू पेरणी क्षेत्र ३३ हजार ४८२ हेक्टर व हरभरा पेरणी क्षेत्र ५९ हजार ५३२ हेक्टर आहे.   ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी करण्यात आलेल्या पिकाचा परिपक्व होण्याचा कालावधी पूर्ण झाला असून पिक काढणीस आलेले आहे. काही ठिकाणी गहू व हरभरा पिकाची काढणी चालू आहे. काही शेतकऱ्यांनी पिकाची काढणी करून शेतामध्ये सुकवणी करिता ढीग लावलेले आहेत.   हवामान खात्याच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणात उष्णता निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या १६ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे कापणी करून ठेवलेल्या पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच त्याचे ढी

मोटार सायकल रॅलीद्वारे हेल्मेट वापराबाबत जनजागृती

Image
  ·         रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त उपक्रम वाशिम , दि. ०२ : वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात १८ जानेवारीपासून रस्ता सुरक्षा अभियान सुरु आहे. या अभियानांतर्गत वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी परिवहन विभाग, पोलीस विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मोटारसायकल चालकांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी आज, २ फेब्रुवारी रोजी मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक वसंत परदेशी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून पोलीस अधीक्षक कार्यालय येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विजय पाटकर, वाशिम शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ध्रुवास बावनकर, शहर वाहतूक शाखेचे श्री. मोहोड, जयाकांत राठोड, एस. आर. पगार, एस. ए. सोयगांवकर, एस. जी. पल्लेवाड व विभागीय नियंत्रक श्री. इलमे यांची उपस्थिती होती. पोलीस अधीक्षक कार्यालय येथून पोलीस स्टेशन चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर