Posts

Showing posts from February, 2020

प्रत्येक मराठी माणसाने मराठीचा अभिमान बाळगावा

Image
·          मराठी भाषा गौरव दिनी मान्यवरांचे प्रतिपादन ·          जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचा उपक्रम वाशिम , दि. २७ : मराठी ही आपली मातृभाषा आहे. सुमारे २ हजार वर्षांचा इतिहास असलेल्या मराठी भाषेचा प्रत्येक मराठी माणसाने अभिमान बाळगला पाहिजे, असे मत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातील प्रमुख वक्त्यांनी मांडले. वाशिम जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने आज, २७ फेब्रुवारी रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी भाषेचे अभ्यासक, लेखक प्रा. गजानन वाघ, सुप्रसिद्ध कवी मोहन शिरसाट व कवी महेंद्र ताजणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी ज. सु. पाटील यांच्यासह पत्रकार, युवक-युवतींची उपस्थिती होती. ग्रंथपूजनाने कार्यक्रमाचे उदघाटन झाले. तसेच यावेळी उपस्थितांना मराठी भाषेच्या संवर्धनाची प्रतिज्ञा देण्यात आली. मराठी भाषा, अभिजात भाषा : मोहन शिरसाट मराठी भाषेला सुमारे २ हजार वर्षांचा इ

चित्ररथाद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची प्रसिद्धी

Image
* जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम वाशिम, दि. 26 : जिल्ह्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची जनजागृती चित्ररथाद्वारे करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती उपयोजना 2019-20 अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या या चित्ररथाला आज, 26 फेब्रुवारी रोजी अमरावती येथे समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे व उपसंचालक (माहिती) राधाकृष्ण मुळी यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, हर्षवर्धन पवार (अमरावती), डॉ. मिलिंद दुसाने (अकोला), राजेश येसनकर (यवतमाळ), सहायक संचालक गजानन कोटूरवार यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या महिला बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा, रमाई आवास योजना, भारत सरकार शिष्यवृत्ती योजना आणि अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुला-मुलींसाठी निवासी शाळा

कळंबा महाली, सावरगाव बर्डे येथे आधार प्रमाणीकरण सुरु

Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ·          पहिल्या टप्प्यात दोन गावातील शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध ·          आधार प्रमाणीकरणसाठी गावातच सुविधा उपलब्ध ·          कर्जमुक्तीमुळे शेतकऱ्यांना दिलासा वाशिम , दि. २४ : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी आज, २४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाली. जिल्ह्यातील कळंबा महाली व सावरगाव बर्डे येथील ४३७ शेतकऱ्यांच्या नावांचा या यादीमध्ये समावेश आहे. यादीमध्ये नावे असलेल्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही दोन्ही गावांमध्ये सुरु झाली आहे. दोन्हीं गावांमध्ये आपले सरकार सेवा केंद्र तसेच जिल्हा प्रशासन व अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत विशेष शिबीराच्या माध्यमातून आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही होत आहे. कर्जमुक्ती योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या पहिल्या यादीत कळंबा महाली गावातील २६६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांची नावे असलेल्या यादीच्या प्रती ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच ग्रामपंचायत परिसरातील आपले सरकार सेवा केंद्रामध्ये

महिला बचत गट होणार ‘डीजीटल’

Image
\·         बचत गटांचे व्यवहार पारदर्शी होणार ·         प्रत्येक सदस्याला एसएमएसद्वारे मिळणार व्यवहाराची माहिती वाशिम , दि. १८ : राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड)द्वारा जिल्हातील सर्व महिला बचत गटांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी ‘ई-शक्ती’ कार्यक्रम वाशिम महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्हातील दोन हजार बचत गटांच्या डिजिटलायझेशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.  ई-शक्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून डिजिटलायझेशन करण्यासाठी बचत गटांच्या ६० अॅनिमेटर यांना आज, १८ फेब्रुवारी रोजी स्मार्टफोनचे वाटप  करण्यात आले. बचत गटांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी ई-शक्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून नाबार्ड प्रयत्न करीत आहे. बचत गटांचे सर्व व्यवहार ऑनलाईन व अपडेट करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वाशिम जिल्हा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अॅनिमेटर यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी ‘नाबार्ड’चे सहाय्यक महाप्रबंधक विजय खंडरे व ‘माविम’चे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांच्या हस्ते ६० अॅनिमेटर यांना स्मार्टफोनचे वाटप करण्यात आले. जिल्ह्याट सुरुवा

दहावी, बारावी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

Image
वाशिम , दि. १७ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० या कालावधीत जिल्ह्यातील एकूण ६५ परीक्षा केंद्रांवर व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) ३ ते २३ मार्च २०२० या कालावधीत जिल्ह्यातील एकूण ८६ परीक्षा केंद्रांवर होत आहे. या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच परीक्षा केंद्रांभोवती कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी इयत्ता १२ वी परीक्षा होणाऱ्या सर्व परीक्षा केंद्रांच्या २०० मीटर परिक्षेत्रात १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० या कालावधीत तसेच इयत्ता १० वी परीक्षा केंद्रांच्या परिसरात ३ ते २३ मार्च २०२० या काळात (सुट्टीचे दिवस वगळून) फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आले असून परीक्षा केंद्रांवर ओळखप

अपघात रोखण्यासाठी उपाययोजना आवश्यक - खासदार भावना गवळी

Image
·         रस्ता सुरक्षा संसदीय क्षेत्र समिती सभा ·         प्रमुख मार्ग, चौकात दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचना ·         अवैध गतिरोधक, अपघातस्थळांचा अहवाल सादर करा वाशिम , दि. १७ : अपघातात होणाऱ्या मृत्युंचे प्रमाण कमी होणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यात अपघात रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत. रस्ता सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना खासदार तथा रस्ता सुरक्षा संसदीय क्षेत्र समितीच्या अध्यक्ष भावना गवळी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, १७ फेब्रुवारी रोजी झालेल्या रस्ता सुरक्षा संसदीय क्षेत्र समितीच्या सभेत त्या बोलत होत्या. यावेळी वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, जयंत देशपांडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तानाजी नरळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य महामार्ग महामंडळ व पोलीस विभाग

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप; प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

वाशिम , दि. १५ : राज्य शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या धोरणानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय काम वाटप समितीमार्फत जिल्ह्यातील सुशिक्षित बरोजगारांच्या सेवा सोसायटींना कंत्राटी तत्त्वावर काम वाटप करण्यात येते. त्यानुसार जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राकडे जिल्हाधिकारी कार्यालय अल्पसंख्यांक मुलींचे वसतिगृह येथे २ सुरक्षा रक्षक महिला गार्ड व जिल्हा क्रीडा संकुल समिती येथे १ संगणक चालक, १ लिपिक, १ शिपाई व १ सफाईगार तसेच जिल्हा क्रीडा परिषद येथे १ संगणक चालक, 2 मैदानी सेवक व मंगरूळपीर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील १ सफाईगार, वाशिम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील १ सफाईगार ही पदे ११ महिने मानधन तत्त्वावर भरण्यासाठी मागणी पत्र सादर केले आहे. जिल्ह्यातील इच्छुक व पात्र जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार सेवा सोसायटींनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपले प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र, जिल्हाध

जी.डी.सी.अँड ए., सी.एच.एम. परीक्षेसाठी १६ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन

वाशिम , दि. १५ : सहकार खात्यामार्फत घेण्यात येणारी जी. डी. सी. ॲण्ड ए. व. सी.एच.एम परीक्षा २२, २३ व २४ मे २०२० रोजी घेण्यात येणार असून परीक्षार्थीकडून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज १५ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२० पर्यंत भरता येतील. परीक्षार्थींसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तयार केलेला युझर आयडी व पासवर्ड परीक्षेचा निकाल प्रसिद्ध होईपर्यंत योग्य प्रकारे जतन करून ठेवणे आवश्यक आहे. जी. डी. सी. ॲण्ड ए. परीक्षा शुल्क ८०० रुपये तर सी.एच.एम परीक्षा शुल्क ५०० रुपये आहे. सविस्तर सूचना वाशिम येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर तसेच sahakarayukta.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आर. एन. कटके यांनी कळविले आहे. *****

संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

Image
वाशिम , दि. १५ : संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, तहसीलदार तथा अधीक्षक प्रशांत जाधव, नायब तहसीलदार घनश्याम डाहोरे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

समुदाय विकास योजना अंतर्गत येवती येथे एकदिवशीय कार्यशाळा संपन्न

वाशिम , दि. १५ : ग्रामीण भागातील युवक-युवतींना गावाच्या गरजेनुसार मोफत प्रशिक्षण देणे व विविध तंत्रज्ञानाची माहिती देवून गावातील लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत करण्यासाठी वाशिम शासकीय तंत्रनिकेतनच्यावतीने समुदाय विकास योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत येवती येथे एकदिवशीय कार्यशाळा नुकतीच पार पडली. अध्यक्षस्थानी पोलीस पाटील संपतराव शिंदे होते. योजनेचे समन्वयक प्रा. ल. कि. लोणकर, नारायण आरु, भगवान शिंदे, दत्ताराव बांगर, श्री. साव्के, श्री. गडेकर, श्री. काळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेमध्ये विद्युत उपकरणे दुरुस्ती, दुचाकी, गॅस शेगडी, कुकर, मिक्सर दुरुस्तीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच येवती येथे सुरु असलेल्या ब्युटीशियन आणि हेअर ड्रेसिंग अभ्यासक्रमातील प्रवेश घेतलेल्या ४५ प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. संचालन मंगला ढोरे यांनी केले, तर आभार प्रशिक्षिका कल्पना शिंदे यांनी मानले. *****

तलाठी, आपले सरकार सेवा केंद्र चालक यांना आधार प्रमाणीकरणविषयी प्रशिक्षण

Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ·         जिल्हा, तालुकास्तरावर कार्यशाळा; माहितीपुस्तिकेचे वितरण वाशिम , दि. १५ : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र, बँकेत या याद्या प्रसिद्ध करण्याची कार्यवाही होईल. यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र, बँक तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये जावून बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरणद्वारे आपल्या कर्ज रक्कमेचे प्रमाणीकरण करावे लागणार आहे. आधार प्रमाणीकरणविषयी तलाठी व आपले सरकार सेवा केंद्र चालकांना सविस्तर माहिती देण्यासाठी आज, १५ फेब्रुवारी रोजी तालुका व जिल्हा स्तरावर कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हास्तरावर नियोजन भवन येथे जिल्ह्यातील १०९३ आपले सरकार सेवा केंद्रचालकांची कार्यशाळा झाला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील आधार प्रमाणीकरण प्रक्रीयेविषयी पीपीटी व मार्गदर्शक व्हिडीओच्या सहाय्याने माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. ह

जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यशाळेत आयकर कपाती विषयी मार्गदर्शन

Image
वाशिम , दि. १३ : आयकर अधिनियम १९६१ अंतर्गत टीडीएस कपातीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आज, १३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पगारातून मासिक आयकर कपात, कराचा विहित कालावधीत भरणा करणे आदी विषयांवर अकोला येथील आयकर अधिकारी (टीडीएस) श्रीमती रश्मी देवपुजारी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी (महसूल) रमेश काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव, उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक प्रशांत जाधव यांच्यासह जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकारी उपस्थित होते. श्रीमती देवपुजारी म्हणाल्या, सर्व आहरण व संवितारण अधिकाऱ्यांनी नियमानुसार टीडीएस कपातीची आणि कपात केलेला टीडीएस विहित कालावधीत शासनास जमा करण्याची कार्यवाही करावी. कपात केलेली रक्कम कोणत्याही परिस्थितीत स्वतःकडे ठेवू नये. तसे करणे अनियमितता समजून सदर आहरण व संवितरण अधिकारी कायदेशीर कारवाईस पात्र ठरतो. आयकर निरीक्षक उज्ज्वल कुल्हार

मुद्रा योजना एलईडी व्हॅन, चित्ररथाला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी

Image
·         हस्तपुस्तिका, स्टँडी, घडीपुस्तिकेचे विमोचन वाशिम , दि. १२ : प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती जिल्ह्यातील होतकरू, गरजू बेरोजगार युवक-युवतींपर्यंत पोहोचावी, यासाठी जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समिती व नियोजन विभागामार्फत योजनेचा प्रचार, प्रसार करण्यात येत आहे. यानिमित्ताने तयार करण्यात आलेल्या एलईडी व्हॅन व चित्ररथाला जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज, १२ फेब्रुवारी रोजी हिरवी झेंडी दाखविली. तसेच प्रधानमंत्री मुद्रा योजना विषयी माहिती देणाऱ्या हस्तपुस्तिका, स्टँडी व घडीपुस्तिकेचे विमोचनही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास प्रबंधक विजय खंडरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, माहिती सहाय्यक तानाजी घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती. गरजू तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून अर्थसहाय्य करण्यात येते. या योजनेविषयी जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना माहिती मिळावी, यासाठी एलईडी व्हॅन वाहन

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना लाभार्थ्यांसाठी पीक कर्ज पुरवठा विशेष मोहीम - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

Image
वाशिम , दि. १० : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्याप कोणत्याही वित्तीय संस्था व बँकांकडून पीक कर्ज घेतलेले नाही , अशा शेतकऱ्यांनी पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे अवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये २ लाख १७ हजार १९४ शेतकऱ्यांची प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी म्हणून नोंद झाली आहे. यापैकी १ लाख ५६ हजार ८८५ लाभार्थी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या वित्तीय संस्था व बँकाकडून पीक कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. कोणत्याही वित्तीय संस्था तसेच बँकांकडून पीक कर्ज न घेतलेले प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचे ६० हजार ३०९ लाभार्थी शेतकरी जिल्ह्यामध्ये आहेत. या शेतकऱ्यांना बँकींग क्षेत्राकडून पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट ऑफ फायनान्शीयल सर्व्हीसेस तथा कृषी मंत्रालयाचे आदेश प्राप्त झाले आहेत. या शेतकऱ्यांना अर्ज करता यावा, यासाठी आयबीए संस्थेकडून एक पानी अर्जाचा नमुना सर्व बँकांना उपलब्ध क

वाशिम जिल्ह्यात उत्कृष्ट बॅडमिंटनपटू तयार व्हावेत - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

Image
·         राज्यस्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे उदघाटन वाशिम , दि. ०८ : बॅडमिंटन खेळाची आवड निर्माण होवून जिल्ह्यात राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट बॅडमिंटनपटू तयार व्हावेत. याकरिता जिल्हा क्रीडा संकुल समिती व जिल्हा क्रीडा परिषदेच्यावतीने राज्यस्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी सांगितले. जिल्हा क्रीडा संकुल येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये राज्यस्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, विजयश्री मोडक , डॉ. संदीप हाडोळे, आनंद देशमुख, वाशिम जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव नंदकिशोर इंगोले, क्रीडा अधिकारी संजय पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ८ व ९ फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा होत आहे. जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, वाशिम येथे होत असलेल्या राज्यस्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमुळे जिल्ह्यातील खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होवून इतर जिल्ह्यातील खेळाडूंच्या तुलनेत आपले कौशल्य आजमावण्याची संधी मिळेल. या स्पर्धेमधून जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये बॅडमिंटन खेळाची आवड निर्म