Posts

Showing posts from July, 2019

जिल्ह्यात ८ ऑगस्ट रोजी जंतनाशक गोळ्यांचे वाटप

Image
·         समन्वयाने काम करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना वाशिम , दि. ३१ : जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना व बालकांना राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त ८ ऑगस्ट २०१९ रोजी जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा झाली. या मोहिमेतून एकही विद्यार्थी अथवा बालक वंचित राहणार नाही , याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात झालेल्या या सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी तानाजी नरळे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले , ८ ऑगस्ट रोजी होणारी जंतनाशक गोळी वाटपाची मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग , शिक्षण विभाग , अंगणवाडी , एकात्मिक महिला व बालविकास विभाग , शाळा , महाविद्यालये व्यवस्थापन य

तक्रार निवारण शिबिराच्या पूर्व तयारीचा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या चमूने घेतला आढावा

Image
·         आज विभागस्तरीय तक्रार निवारण शिबीर वाशिम , दि. ३१ : बालकांवर होणारे अत्याचार , पिळवणूक , त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन आदी विषयीच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत १ ऑगस्ट २०१९ रोजी वाशिम येथे विभागस्तरीय एकदिवसीय तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या पूर्व तयारीचा आज राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या चमूने आढावा घेतला. तसेच शिबिरामध्ये नोंदविल्या जाणाऱ्या तक्रारींवर करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले. या चमूमध्ये आयोगाच्या वरिष्ठ तांत्रिक तज्ज्ञ शाइस्ता शाह, भावना बजाज, सुदीप चक्रवर्ती, कपिल शर्मा यांचा समावेश होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, अनुप खांडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी तानाजी नरळे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थि

‘आयुष्मान भारत’च्या लाभार्थ्यांनी गोल्डन कार्ड प्राप्त करून घ्यावे - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

Image
वाशिम , दि. ३१ : आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी गोल्ड कार्ड प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. कॉमन सर्व्हिस सेंटर, ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्र अथवा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे अंगीकृत रुग्णालयात नोंदणी करून हे गोल्डन कार्ड प्राप्त घेता येईल. तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपले गोल्डन कार्ड प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या ई-कार्ड वाटप विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे समन्वयक डॉ. स्वप्नील सरनाईक, कॉमन सर्व्हिस सेंटरचे जिल्हा समन्वयक भगवंत कुलकर्णी, श्री. देशमुख यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत योजनेच्या गोल्डन कार

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या चमूने साधला स्वयंसेवी संस्थांशी संवाद

Image
वाशिम , दि. ३० : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या चमूने आज नियोजन भवन येथे जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून १ ऑगस्ट २०१९ रोजी होणाऱ्या विभागस्तरीय एकदिवसीय तक्रार निवारण शिबिराच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या जनजागृतीबाबत माहिती घेतली. तसेच शिबिरामध्ये तक्रार नोंदणीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. या चमूमध्ये आयोगाच्या वरिष्ठ तांत्रिक तज्ज्ञ शाइस्ता शाह, भावना बजाज, सुदीप चक्रवर्ती, कपिल शर्मा यांचा समावेश आहे. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी तानाजी नरळे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने अमरावती विभागातील बालकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी वाशिम येथे १ ऑगस्ट रोजी तक्रार निवारण शिबीर आयोजित केले आहे. सकाळी ९ वाजेपासूनच तक्रार नोंदणी सुरु होणार आहे. शिबिरामध्ये सर्व घटकातील मुलांना आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागता येणार आहे. स्वयंसेवी संस्थांनी अशा अन्याय, अत्याचारग्रस्त बालकांची तक्रार शिबिरामध्ये नोंदविण्यासाठी सहक

तक्रार निवारण शिबिराच्या पूर्व तयारीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

Image
वाशिम , दि. ३० : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत गुरुवार , १ ऑगस्ट २०१९ रोजी वाशिम येथे विभागस्तरीय एकदिवसीय तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे हे शिबीर आयोजित केले जाणार आहे. जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज नियोजन भवनला भेट देवून तक्रार निवारण शिबिराच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्व तयारीची पाहणी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा शिबिराचे नोडल अधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा संपर्क अधिकारी सुभाष राठोड, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार उपस्थित होते. अमरावती विभागातील बालकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी हे तक्रार निवारण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. १ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेपासून तक्रारींची नोंदणी सुरु होईल. तसेच सकाळी १० वाजेपासून सुनावणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातून येणारी बालके, त्याचे पालक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी बैठक व्यवस्था, सुनावणीसाठी तयार

हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची महिला बचत गटांनी योजनेचा लाभ घ्यावा

वाशिम , दि. २६ : कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या ‘ महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्ट-अप धोरण २०१८ ’ या धोरणानुसार महिला बचत गटांच्या नाविन्यपूर्ण उद्योग संकल्पनांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत महिला बचत गटांना तालुका व जिल्हास्तरावर मंच उपलब्ध करून देवून व उत्कृष्ट नाविन्यपूर्ण संकल्पनांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हा हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची योजनेच्या नोडल अधिकारी तथा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालक प्रांजली बारस्कर यांनी कळविले आहे. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एनआरएलएम ), राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (एनयुएलएम ), महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम ) अंतर्गत किमान एक वर्षापूर्वी स्थापन केलेल्या व राष्ट्रीय जीवनोन्नती अभियानातील पंचसूत्रीचे पालन करणारे महिला बचत गट या योजनेत सहभाग घेता येणार आहे. तालुकास्तरावरील गटांना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना प्रदर्शित करण्यासाठी तालुकास्तरावर मंच उपलब्ध करून देण्यात येईल. ह

महिलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रज्ज्वला योजना उपयुक्त - आमदार राजेंद्र पाटणी

Image
प्रज्ज्वला योजनेंतर्गत बचत गटांचे प्रशिक्षण उत्साहात ·         राज्य महिला आयोगामार्फत आयोजन वाशिम , दि. २६ : महिलांना स्वावलंबी व सक्षम बनविण्यासाठी राज्य शासनाने प्रज्ज्वला योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत बचत गटांच्या माध्यमातून उद्योग उभारून महिलांना उद्योगिनी बनण्यास मदत केली जाणार आहे. महिलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटणी यांनी केले. राज्य महिला आयोग व राज्य शासन यांच्यावतीने आज स्वागत लॉन येथे आयोजित प्रज्ज्वला योजनेंतर्गत बचत गटांचे प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रज्ज्वला समिती सदस्य उषा वाजपेयी, अर्चना डेहनकर, सामाजिक कार्यकर्त्या जयश्री देशमुख, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक विजय खंडरे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालक प्रांजली बारस्कर, प्रभारी गट विकास अधिकारी डॉ. निलेश वानखेडे यांची प्रमुख उपस्थि

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने निकाली काढा - गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील

Image
  ·         शिक्षक सहविचार सभा वाशिम , दि. २६ : जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे निवृत्ती उपदान अंशदायी योजनेबाबत, त्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाबाबत, शिक्षक बदलीत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत आणि पदोन्नतीच्या प्रकरणासह अन्य प्रश्न तातडीने निकाली काढावेत, असे निर्देश गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. आज २६ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात आयोजित शिक्षकांच्या सहविचार सभेत डॉ. पाटील बोलत होते. यावेळी प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के. आर. तापी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक व प्राथमिक) अंबादास मानकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी व्यंकटेश जोशी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालक प्रांजली बारस्कर, वेतन पथकाचे अधीक्षक श्री. कदम, श्री. साठे, सहाय्यक प्रशासन अधिकारी गजानन खुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेच्या व खाजगी शाळांच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्ती उपदान अंशदायी योजनेच्य

राष्ट्रीय बालक हक्क संरक्षण आयोगाच्या शिबिरामुळे बालकांवरील अन्यायाविरुद्ध दाद मागण्याची संधी - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

Image
·          तक्रार निवारण शिबिराबाबत पत्रकार परिषद ·          प्रत्येक बालकाला अन्यायाविरुध्द दाद मागण्याचा हक्क ·          समाजातील सर्व घटकांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी सहकार्य करा वाशिम , दि. २३ : बालकांवरील अत्याचार, पिळवणूक याविषयीच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत वाशिम येथे १ ऑगस्ट २०१९ रोजी एकदिवशीय विभागस्तरीय तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामुळे वाशिमसह अमरावती विभागातील इतर जिल्ह्यातील बालकांना आपल्यावरील अन्यायाविरुद्ध दाद मागण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या शिबिराची माहिती समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसारमाध्यमांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केले. वाकाटक सभागृहात आयोजित या पत्रकार परिषदेला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा तक्रार निवारण शिबिराचे संपर्क अधिकारी सुभाष राठोड यांच्यासह विविध वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांचे हक्क

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत १ ऑगस्ट रोजी वाशिम येथे विभागस्तरीय तक्रार निवारण शिबीर – जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

Image
·         बालकांच्या अधिकारांच्या उल्लंघनाबाबत तक्रारींवर होणार सुनावणी वाशिम , दि. २२ : बालकांवर होणारे अत्याचार, पिळवणूक आदी विषयांवर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत १ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी १० वाजता वाशिम येथे विभागस्तरीय तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरात अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील तक्रारींवर सुनावणी घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील बालक, पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, बचत गट यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज वाकाटक सभागृहात झालेल्या पूर्वतयारी बैठकीत दिल्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा महसूलचे उपजिल्हाधिकारी रमेश काळे, उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे, अनुप खांडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, जिल्हा महिला व बाल विकास

जिल्हा कारागृहातील जलशुद्धीकरण सयंत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

Image
वाशिम , दि. १७ : जिल्हा कारागृह येथे बंदिजनांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी बसविण्यात आलेल्या जल शुद्धीकरण सयंत्राचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते झाले. जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून हे जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, जिल्हा कारागृह अधीक्षक सोमनाथ पाडुळे, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. एस. हरण, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक एम. पी. वावगे, नगरपरिषदेचे तेजस पाटील, तुरुंग अधिकारी आर. एच. भापकर व एस. एस. हिरेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा कारागृहातील बंदिजनांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून जलशुद्धीकरण सयंत्र खरेदी करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी निधी मंजूर केला होता. या निधीतून ५०० लिटर प्रतितास पाणी शुद्ध करण्याची क्षमता असलेले सयंत्र जिल्हा कारागृहात बसविण्यात आले आहे, अशी माहिती श्री. पाडुळे यांनी यावेळी दिली. जिल्हा कारागृह परिसरात वृक्षारोपण

वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवावे - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

Image
·         मतदार याद्यांचा दुसरा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर ·         ३० जुलैपर्यंत मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी वाशिम , दि. १५ : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार १५ जुलै २०१९ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. १५ जुलै ते ३० जुलै २०१९ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीत मतदार यादीमध्ये नाव नोंदविता येणार आहे तसेच मतदार यादीतील दुरुस्ती , सुधारणाही करता येणार आहे. तरी १ जानेवारी २०१९ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक व्यक्तींने या मोहिमेदरम्यान मतदार म्हणून नाव नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे. नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी २० व २१ जुलै आणि २७ व २८ जुलै २०१९ रोजी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. ५ ऑगस्ट २०१९ पर्यंत पर्यवेक्षक, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अथवा मतदार नोंदणी अधि

पारधी समाजाला योजनांचा लाभ देवून विश्वास निर्माण करा - किशोर तिवारी

Image
वाशिम , दि. १५ : पारधी समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन आता बदलला पाहिजे. ते सुद्धा आपल्या समाजाचा एक भाग आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. पारधी समाजाला विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देवून त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करावा, असे मत कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आज १५ जुलै रोजी जिल्ह्यातील पारधी बेड्यावरील विविध समस्यांचा आढावा घेतांना श्री. तिवारी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. फारुकी, पारधी समाजाचे प्रतिनिधी मतीन भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. तिवारी म्हणाले, जिल्ह्यातील फासे पारधी समाजाच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आदिवासी विकास विभागाने १५ दिवसांत करावा. पारधी समाजाच्या विकासासाठी विविध यंत्रणांकडे असलेल्या संकल्पना जिल्हाधिकारी यांना द्याव्यात. त्यानुसार योजन