वृक्ष लागवड, संवर्धनासाठी पुढाकार घ्या - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक




·         दोनद बु., शिवणी येथे वृक्ष लागवड मोहीम
·         सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेअंतर्गत उपक्रम
वाशिम, दि. ०९ : जलसंधारण आणि पर्यावरण रक्षणासाठी वृक्षांची संख्या वाढणे महत्त्वाचे आहे. याकरिता जलसंधारणाच्या इतर कामांसोबत वृक्ष लागवड व संगोपनासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज केले. कारंजा तालुक्यातील दोनद बु. व मंगरूळपीर तालुक्यातील शिवणी या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांमध्ये वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
दोनद बु. येथे झालेल्या कार्यक्रमाला कारंजाचे उपविभागीय अधिकारी अनुप खांडे, तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके, गट विकास अधिकारी कालिदास तापी, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. इढोळे, पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सुभाष नानोटे, तालुका समन्वयक रविंद्र लोखंडे व प्रशांत अवचार उपस्थित होते. तसेच शिवणी येथे झालेल्या कार्यक्रमाला मंगरूळपीर तहसीलदार किशोर बागडे, गट विकास अधिकारी डी. एच. टाकरस, तालुका कृषि अधिकारी सचिन कांबळे, सरपंच लल्लू गारवे, पानी फाउंडेशनचे तालुका समन्वयक समाधान वानखडे, अतुल तायडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, दोनद बु. व शिवणी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत वृक्ष लागवडीसाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करणे आवश्यक असून इतर गावांनीही यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. याकरिता गावातील नागरिकांनी एकत्र येवून लोकसहभाग देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
दोनद बु. हे गाव मागील वर्षी पासून पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी होत आहे.  येथील ग्रामस्थांनी ३५०० रोप लावून त्यांची संगोपनाची जबाबदारी घेतली आहे. तसेच शिवणी येथे सुध्दा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे