Posts

Showing posts from February, 2017

राष्ट्रीय लोकअदालतीमुळे वादाला पूर्णविराम - न्यायमूर्ती भूषण गवई

Image
·        वाशिम जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालात ·        विविध २३० तंटे सामोपचाराने सोडविले वाशिम , दि . ११ :   न्यायालयात दाखल झालेली तसेच दाखल पूर्व प्रकरणे सामोपचाराने सोडवून वादावर जलदगतीने तोडगा काढण्याची संधी राष्ट्रीय लोकअदालतीमुळे मिळते. याद्वारे वादाला पूर्ण विराम मिळत असल्याने पक्षकारांच्या वेळेत व पैशात बचत होते, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले. येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शाम दरणे होते.  याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. श्रीराम काळू, वाशिम जिल्हा विधिज्ञ संघाचे उपाध्यक्ष अॅड. गणेश अवस्थी यांची प्रमुख उपस्थिती होती. न्यायमूर्ती गवई म्हणाले की, न्यायालयामध्ये दाखल होत असलेल्या प्रकरणांचे प्रमाण वाढत असल्याने ही प्रकरणे निकाली निघण्यास वेळ लागतो. तसेच कनिष्ठ न्यायालयाने निकाल दिल्यावरही ज्या पक्षकाराच्या विरोधात हा निकाल जातो, तो वरिष्ठ न्यायालया

अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीसाठी वाशिम जिल्हा प्रशासन सज्ज

Image
·         सर्व २९ मतदान केंद्रांवरील तयारी पूर्ण ·         १८ हजार ७३६ मतदार बजावणार हक्क ·         जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेतला आढावा वाशिम , दि . ०२ :   अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीसाठी दि. ३ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वा. पर्यंत मतदान होत असून याकरिता वाशिम जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. वाशिम जिल्ह्यात एकूण १८ हजार ७३६ पदवीधर मतदार असून २९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया चालणार आहे. याकरिता नियुक्त अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील, वाशिमच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार बळवंत अरखराव, रमेश जसवंत, शेख यांच्यासह सर्व मतदान केद्राध्यक्ष, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक मतदान केंद्रावर केन्द्राध्यक्षसह मतदार संख्येनुसार ४ ते ५ मतदान अधिकारी, कर्मचारी व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले, पदवीध