Posts

Showing posts from October, 2022

सरदार वल्लभभाई पटेल यांचा 31 ऑक्टोबर हा जयंती दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.या दिवसाचे औचित्य साधून वाशिम येथे जिल्हा क्रीडा संकुल येथून एकता दौडचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,वाशीमच्या वतीने करण्यात आले आहे.

Image
31 ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दौड सहभागी होण्याचे आवाहन वाशिम दि.28 (जिमाका) सरदार वल्लभभाई पटेल यांचा 31 ऑक्टोबर हा जयंती दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.या दिवसाचे औचित्य साधून वाशिम येथे जिल्हा क्रीडा संकुल येथून एकता दौडचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,वाशीमच्या वतीने करण्यात आले आहे.         31 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता दौडच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात येईल.एकता दौड क्रीडा संकुल येथून बस स्टँडमार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,पाटणी चौक,अकोला नाका,जिल्हा सामान्य रुग्णालय मार्गे डॉ. देशमुख हॉस्पिटल चौकातून जिल्हा क्रीडा संकुलात पोहचुन दौडचा समारोप होईल.एकता दौडमध्ये वाशिम शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातीलविद्यार्थी,युवक - युवती,विविध क्रीडा संघटना व नागरिकांनी सहभागी व्हावे.असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी केले आहे.

ऊर्जा संवर्धन " यावर चित्रकला स्पर्धा जिल्हा,राज्य व राष्ट्रियस्तर स्पर्धेचे आयोजन

Image
"ऊर्जा संवर्धन " यावर चित्रकला स्पर्धा  जिल्हा,राज्य व राष्ट्रियस्तर स्पर्धेचे आयोजन वाशिम दि.28 (जिमाका) योग्य पद्धतीने ऊर्जेचा वापर केल्यास बचत करण्यासोबतच पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांपासून वीज निर्मितीमुळे उदभवणारे दूष्परिणाम टाळता येणे शक्य आहे.म्हणुनच ऊर्जा बचतीविषयीची शालेय विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांमध्ये जाणिव निर्माण व्हावी या उद्देशाने ऊर्जा दक्षता ब्युरो, विद्युत मंत्रालय,भारत सरकार यांच्यावतीने इयत्ता 5 ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा,राज्य व राष्ट्रीय स्तरावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जाच्या वतीने आयोजित या चित्रकला स्पर्धेत इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गट “अ”तसेच आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गट “ब”  असे दोन गट आहे.  'गट -अ' साठी चित्रकलेचे विषय असे आहेत.  1) देशभक्तीची मेणबत्ती पेटवा, राष्ट्रासाठी ऊर्जा वाचवा.(Light the Candle of Patriotism,Save Energy for the Nation), 2) ऊर्जा बचतीचे नियम तयार करून स्वप्नांचे जग बनवूया.(Let's make a world of drea

आशाताईंना साडी - चोळी भेट देऊन भाऊबीज साजरी सामाजिक संघटनांची बांधिलकी भावुक करणारी - डॉ सुहास कोरेकाटा केंद्र क्षयरोग मुक्तीसाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार

Image
आशाताईंना साडी - चोळी भेट देऊन भाऊबीज साजरी   सामाजिक संघटनांची  बांधिलकी भावुक करणारी - डॉ सुहास कोरे काटा केंद्र क्षयरोग मुक्तीसाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार वाशिम.दि.27( जिमाका) वाशिम तालुक्यातील काटा प्राथमिक आरोग्य केंद्र क्षयरोगमुक्त करण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी घेतलेला पुढाकार हा लाखमोलाचा आहे. संघटनांनी भाऊबीजेनिमित्त आशाताईंचा साडी-चोळी देऊन हृद्य सत्कार केला. ही जपलेली बांधिलकी भावुक करणारी आहे.असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुहास कोरे यांनी केले.            26 ऑक्टोबर रोजी माॅ गंगा मेमोरियल बाहेती हॉस्पिटलच्या श्री. श्री.सभागृहात आयोजित भाऊबीज कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून डॉ.कोरे बोलत होते.लायन्स क्लबचे अध्यक्ष बॉबी गुलाटी,रेडक्रॉस सोसायटीचे सचिव डॉ.सुखविंदर ओबेराय,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,आर्ट ऑफ लिविंगचे शिक्षक पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, काटा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय काळे,सक्षमच्या जिल्हाध्यक्ष डॉ. सरोज बाहेती,इनरव्हील क्लबच्या संगीता देशमुख,डॉ.अर्चना म

पाडवा आणि भाऊबीजेनिमित्त मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला दीपोत्सवाच्या शुभेच्छा**शेतकरी, कष्टकरी, सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास**विकास कामांमध्ये सामान्यांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब**मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही*

Image
*जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)* *पाडवा आणि भाऊबीजेनिमित्त मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला दीपोत्सवाच्या शुभेच्छा* *शेतकरी, कष्टकरी, सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास* *विकास कामांमध्ये सामान्यांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब* *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही* मुंबई, दि. 27: शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित- शोषित अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असून तो पुर्ण करण्यासाठी आम्ही एकजूटीनं प्रयत्न करतोय. प्रत्येकाच्या मनातलं हे आपलं सरकार आहे. त्यानुसार आमची वाटचाल सुरू असल्याचे सांगत आता सगळ्याच क्षेत्रांत, आघाड्यांवर विकास कामांचा धडाका सुरू आहे. कृषी, सिंचन, पायाभूत सुविधा, उद्योग, पर्यटन, आरोग्य आणि शिक्षण अशा बहुतेक सर्वच क्षेत्रांतील कामांनी गती घेतली आहे. विकास कामे, योजना, प्रकल्पांमध्ये सामान्यांच्या आशा- आकांक्षा यांचं प्रतिबिंब उमटेल यावर भर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  पाडवा आणि भाऊबीजेच्या दिवशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यातील जनतेला दीपोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते. मु

नक्षलवाद संपवण्यासाठी पोलीस दल सक्षम - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* *भामरागड मधील अतिदुर्गम भागात पोलीस जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी केली दिवाळी साजरी*

Image
*नक्षलवाद संपवण्यासाठी पोलीस दल सक्षम - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*  *भामरागड मधील अतिदुर्गम भागात पोलीस जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी केली दिवाळी साजरी* गडचिरोली, दि. 25 ऑक्टोबर : गडचिरोली पोलीस हे आपल्या कुटुंबापासून, घरापासून दूर राहून संवेदनशील भागात नक्षल विरोधात कर्तव्य बजावतात. नक्षलग्रस्त भागात जाऊन त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करणे हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. या ठिकाणी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. भामरागड (जि. गडचिरोली) तालुक्यातील धोडराज येथे पोलीस मदत केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व जनजागरण मेळाव्याप्रसंगी तसेच आदिवासी बांधव आणि पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी करताना ते बोलत होते. यावेळी पोलीस महासंचालक रजनीश सेठ, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक निलोत्पल आदी उपस्थित होते. धोडराज येथील अतिदुर्गम व अतिसंवेदनशील भागातील पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री ना. शिंदे म्हणाले की, यापूर्वी पालकमंत्

मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा'वर साजरी केली शेतकऱ्यांसोबत दिवाळी**मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब केले प्रत्येक शेतकऱ्याचे औक्षण*

Image
*जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)* *मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा'वर साजरी केली शेतकऱ्यांसोबत दिवाळी* *मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब केले प्रत्येक शेतकऱ्याचे औक्षण* *शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि कृती विकास आराखडा तयार करणार* - *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* मुंबई, दि. २५: दीपावली निमित्त राज्यभर प्रकाशपर्व साजरे होत असताना मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्याने आज अनोखी दिवाळी अनुभवली. राज्यातून आलेल्या शेतकरी कुटुंबियांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब दिवाळी साजरी केली. त्यांच्यासोबत फराळाचा आस्वाद घेतला. आलेल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाचे औक्षण करीत त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. मुख्यमंत्र्यांच्या या आगळ्यावेगळ्या कृतीमुळे भारावून गेलेले शेतकरी बांधव वर्षातून बाहेर पडताना मुख्यमंत्र्यांनी बळीराजाची कदर केल्याची भावना व्यक्त करताना दिसून आले. राज्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि कृती विकास आराखडा तयार करीत असल्याचे सांगतानाच नैसर्गिक आपत्तीत सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्ही धीर सोडू नका. राज्य शासन तुम

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्तेसेवा पंधरवडानिमित्त 363 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व धनादेशाचे वितरण

Image
पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सेवा पंधरवडानिमित्त 363 लाभार्थ्यांना      प्रमाणपत्र व धनादेशाचे वितरण          वाशिम, दि. 21 (जिमाका) :  राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात आला. यादरम्यानच्या विविध योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश व प्रमाणपत्राचे वितरण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज 21 ऑक्टोबर रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात करण्यात आले. यावेळी आमदार ॲड. किरणराव सरनाईक, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे, सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम. यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.           या पंधरवडानिमित्त विविध विभागाकडे जिल्हयातील नागरीकांचे प्रलंबित असलेले पोर्टलवरील तसेच प्रत्यक्ष आलेले अर्ज व तक्रारी निकाली काढण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले होते. यादरम्यान जिल्हयात 1 लक्ष 50 हजारपेक्षा जास्त पोर्टलवरील तसेच प्रत्यक्ष आलेले अर्ज व तक्रारी नि

पालकमंत्री श्री. राठोड यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ

Image
पालकमंत्री श्री. राठोड यांच्या हस्ते  आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ          वाशिम, दि. 21 (जिमाका) :   पालकमंत्री श्री. संजय राठोड यांच्या हस्ते आज 21 ऑक्टोबर रोजी वाशिम शहरातील वार्ड क्र. 3 मधील आर.डी. चव्हाण यांच्या स्वस्त धान्य दुकानातून दिवाळीच्या निमित्ताने शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वस्तु वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार ॲड. किरणराव सरनाईक, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.             सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्हयातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब योजना, एपीएल (केसरी) शेतकरी योजनेतील लाभार्थी अशा एकूण 2 लक्ष 52 हजार 736 शिधापत्रिकाधारकांना दिवाळी निमित्ताने रवा, चनादाळ, साखर व पामतेल प्रत्येकी 1 किलो याप्रमाणे देण्यात येणार आहे. आनंदाचा शिधा एक दिवाळी किट प्रति शिधापत्रिका ई-पॉस प्रणालीव्दारे प्रति संच 100 रुपये दराने संबंधित लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. जिल्हयातील 776 स्वस्त धान्य दुकानातून या किटचे वितरण करण्यात येणार आहे. ज्या पात्र

नियोजन समितीच्या निधीतील कामे यंत्रणांनी गुणवत्तापुर्ण व दर्जेदार करावी -पालकमंत्री संजय राठोड

Image
नियोजन समितीच्या निधीतील कामे यंत्रणांनी गुणवत्तापुर्ण व दर्जेदार करावी                                                                  -पालकमंत्री संजय राठोड जिल्हा नियोजन समिती सभा          वाशिम, दि. 21 (जिमाका) :  जिल्हयाच्या ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासात जिल्हा नियोजन समितीची अत्यंत महत्वपूर्ण भूमिका आहे. या समितीच्या माध्यमातून विकास कामांसाठी व लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. यामाध्यमातून विविध विकास कामे करतांना भौतिक सुविधा निर्माण करण्यासोबतच विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यात येते. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात येणारी कामे यंत्रणांनी गुणवत्तापुर्ण व दर्जेदार करावी. असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.          आज 21 ऑक्टोबर रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री श्री. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार सर्वश्री ॲड

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते जिल्हा स्त्री रुग्णालयातील अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृहाचे उदघाटन

Image
पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते जिल्हा स्त्री रुग्णालयातील अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृहाचे उदघाटन  वाशिम दि.21(जिमाका)पालकमंत्री संजय राठोड यांनी आज 21 ऑक्टोबर रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट दिली. पालकमंत्र्यांच्या आगमनप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ विजय काळबांडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आमदार ऍड.किरणराव सरनाईक,आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस,सहायक जिल्हाधिकारी मिन्नू पी.एम,वैद्यकीय अधिकारी डॉ. कावरखे,डॉ.लोणकर,डॉ.हरण यांचेसह अन्य वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.         पालकमंत्री श्री.राठोड यांनी स्त्री रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर जिल्हा नियोजन समितीच्या सन 2021 -22 च्या 4 कोटी 5 लक्ष रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या तीन अत्याधुनिक शस्त्रक्रियागृहाचे फित कापून उद्घाटन केले.या शस्त्रक्रियागृहामुळे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील स्त्री रुग्णांना मोठी सुविधा उपलब्ध झाल्याचे मत पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले.

पालकमंत्री संजय राठोड 21 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात

Image
पालकमंत्री संजय राठोड आज जिल्ह्यात  वाशिम दि.20 (जिमाका) पालकमंत्री संजय राठोड हे आज 21ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.सकाळी 8.30 वाजता यवतमाळ निवासस्थान येथून शासकीय वाहनाने वाशिमकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह वाशिम येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती,सभागृह येथे आयोजित जिल्हा नियोजन समिती सभेला उपस्थिती. दुपारी 1.30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेला उपस्थिती.दुपारी 2 वाजता अतिवृष्टी, मदत व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान वाटपा संदर्भात जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक. दुपारी 2.15 वाजता नियोजन समिती सभागृह येथे "आनंदाचा शिधा " या योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांमध्ये पामतेल,साखर, रवा, चणाडाळ वाटपाबाबत आढावा बैठक. दुपारी 2.30 वाजता समाधान शिबिरासंदर्भात जिल्हा प्रशासन  अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. दुपारी 2.45 वाजता जिल्हास्तरीय पाणी आरक्षण बैठकीला उपस्थित राहतील.दुपारी 3 वाजता सेवा पंधरवडानिमित्त विविध लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करती

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या लाभार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून पुष्प देऊन सत्कार

Image
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना  प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या लाभार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून पुष्प देऊन सत्कार    वाशिम दि.20 (जिमाका) महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.       या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण  जिल्ह्यातील प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या लाभार्थ्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात उपस्थित राहून बघितले. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस आणि जिल्हा उपनिबंधक दिग्विजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.      जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांच्या हस्ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कामकाज उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल पंकज दिवनाळे यांचा तसेच भटउमरा येथील दामोदर काळे व इंदुबाई उमाळे,कारली येथील शरद देशमुख, सावरगाव (बर्डे) येथील दिलीप शेळके,खरोडा येथील महादेव ठाकरे या पात्र लाभार्थी शेतकऱ्य

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ** एकाच वेळी ७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २५०० कोटी रुपये जमा**बळीराजा खचू नको..धैर्याने संकटाला समोरे जा..शासन आहे पाठीशी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही*

Image
*जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)* *महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ* *एकाच वेळी ७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २५०० कोटी रुपये जमा* *बळीराजा खचू नको..धैर्याने संकटाला समोरे जा..शासन आहे पाठीशी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही* मुंबई, दि. २०: नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. आज एकाच वेळी राज्यातील ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे २५०० कोटी रुपये जमा करण्यात आले. अशा प्रकारे एकाचवेळी थेट खात्यात रक्कम जमा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे बळीराजाने खचून जाऊ नये राज्य सरकार पाठीशी असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.  दरम्यान, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे उपग्रह आधारीत तंत्रज

प्राथमिक आरोग्य केंद्र काटा येथे निक्षय मित्र मेळावा संपन्न

Image
प्राथमिक आरोग्य केंद्र काटा येथे निक्षय मित्र मेळावा संपन्न           वाशिम, दि. 19 (जिमाका) :  सन २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारत करण्याच्या अनुषंगाने कार्यक्रम राबविण्यात येत आहे. २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारताचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी या योजनेंतर्गत क्षयरुग्णांना सामुदायीक सहाय्य हा आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाचा एक प्रमुख उपक्रम आहे. क्षयरुग्णांना अतिरिक्त सहाय्य मिळावे यासाठी समाजातील विविध भागधारक सहकारी, कॅर्पोरेट, लोकप्रतिनिधी, वैयक्तिक व सामाजिक संस्था यांनी क्षयरुग्णांना सहाय्य देऊन मदत करून निक्षय मित्र बनता येते.           राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ केला. केंद्र शासनाने प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत हे अभियान सुरु केले आहे. यामध्ये निक्षय मित्र बनवून त्यांच्यामार्फत क्षयरुग्णांना 1 ते 3 वर्षासाठी कोरडा आहार पुरविता येतो. जिल्ह्यात राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमाला सहकार्य करून प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानाअंतर्गत निक्षय मित्र बनून सहकार्य करावे. असे

एकल वापर प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Image
एकल वापर प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही            मुंबई ,  दि . 20  :- राज्यात एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली असून, या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात येईल ,  अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. शालेय विद्यार्थ्यांसह मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.                         वातावरणीय बदलांचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. यामुळे पर्यावरण रक्षणाची आवश्यकता लक्षात घेऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान 2022 अंतर्गत प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,  शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर ,  सहकार मंत्री अतुल सावे ,  राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई ,  मुख्य सचिव मनुकमार श्रीवास्तव ,  पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे सचिव प्रवीण दराडे ,  प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोप

रोजगार मेळाव्यातून १०४ युवक-युवतींची रोजगारासाठी विविध उद्योग व्यवसायात प्राथमिक निवड

Image
रोजगार मेळाव्यातून १०४ युवक-युवतींची रोजगारासाठी विविध उद्योग व्यवसायात प्राथमिक निवड            वाशिम, दि. 19 (जिमाका)  महाराष्ट्र स्टार्ट अप रोजगार व उद्योजकता सप्ताहाचे १५ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आले. जिल्हयातील उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व राजस्थान आर्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ऑक्टोबर रोजी राजस्थान आर्य महाविद्यालय वाशिम येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या रोजगार मेळाव्यात राज्यातील नामांकित उद्योग व्यवसायांकडून ५०० संख्येपेक्षा जास्त रिक्तपदांसाठी मनुष्यबळाची मागणी करण्यात आली .         मेळाव्यात ५२२ रोजगार इच्छुक उमेदवारांनी सहभाग नोंदविला. राज्यातील एकुण १० नामांकीत उद्योग किंवा व्यवसाय संबंधित उद्योजक/प्रतिनिधींनी उपस्थित राहून मुलाखतीद्वारे १०४ नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार देण्यासाठी प्राथमिक निवड केली.या रोजगार मेळाव्यात राजस्थान आर्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश पगारीया व जिल्हा

पहिल्या यादीतील पात्र लाभार्थी आज प्रोत्साहनपर योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार लाभ

Image
पहिल्या यादीतील पात्र लाभार्थी आज प्रोत्साहनपर योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार लाभ           वाशिम, दि. 19 (जिमाका) :  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेतील पहिल्या यादीतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज योजनेच्या लाभाचे वितरण आज २० ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हा नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. हे असतील.            पहिल्या यादीतील पात्र आधार प्रमाणीकरण यशस्वीपणे करणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक दिग्विजय राठोड यांनी केले आहे. *******

विविध ठिकाणी जागतिक युवाकौशल्य दिन उत्साहात साजरा

Image
विविध ठिकाणी जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा          वाशिम, दि. 19 (जिमाका) :   जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम आणि स्टेट बँक ग्रामिण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमांत प्रशिक्षण संस्थेतील फोटाग्राफी ॲण्ड व्हिडीओग्राफी या अभ्यासक्रमांतर्गतच्या प्रशिक्षण वर्गातील प्रशिक्षणार्थ्यांना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,वाशिमच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दिनेश बारापात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.          सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, वाशिम, सुशिलाताई जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिम,स्वामी विवेकानंद व्होकेशनल इंस्टिटयूट, रिसोड जि. वाशिम येथेसुद्धा कार्यालयाच्या संयुक्त वतीने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, वाशिम येथील विद्यार्थ्यांना ऑनलाईन वेबिनारद्वारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार

कारंजा येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर दिवाळीपूर्वी दिव्यांगाना जीवनावश्यक साहित्य भेट

Image
कारंजा येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर दिवाळीपूर्वी दिव्यांगाना जीवनावश्यक साहित्य भेट           वाशिम, दि. 19 (जिमाका) :  18 ऑक्टोबर रोजी पंचायत समिती कार्यालय कारंजा येथे तालुका विधी सेवा समिती व पंचायत समिती कारंजा यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या वतीने  दिव्यांग कुटूंबाना विविध साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये ग्रामपंचायत पारवा, कोहर, मनभा, कोळी, गायवळ, सोहळ, किन्ही ( रोकडे ) व तुळजापूर आदी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना लाभ देण्यात आला. निश्चितच या ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी घेतलेला पुढाकार हा तालुक्याला आदर्श ठरणार आहे. वाटप केलेल्या जीवनावश्यक साहित्यामध्ये किराणा किट, सिलिंग फॅन, वॉटर कॅन, तीनचाकी सायकल आदी सोबतच कायदेविषयक मार्गदर्शन व विविध योजनेची माहिती विविध विभागामार्फत देण्यात आली.         कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून दिवाणी न्यायाधीश श्री.ठवरे, सहदिवाणी न्यायाधीश श्री. हक, सह दिवाणी न्यायधीश श्रीमती पुंड, नायब तहसीलदार श्री. जाधव, आगार प्रमुख व समाज कल्याण अधिकारी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने रेखाताई राष्ट्रीय विद्यालयात बालीका दिन साजरा

Image
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने रेखाताई राष्ट्रीय विद्यालयात बालीका दिन साजरा           वाशिम, दि. 19 (जिमाका) :   जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम यांच्या संयुक्त वतीने नुकतेच वाशिम येथील रेखाताई राष्ट्रीय विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे आंतरराष्ट्रीय बालिका दिवसाच्या निमित्ताने कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी होते. जिल्हा विधिज्ञ संघाचे अध्यक्ष अॅड. डी. आर. कलवार, अॅड. जी. एस. अवस्थी, माजी आमदार भिमराव कांबळे, प्राचार्य एस.पी. भालेराव व रेखाताई राष्ट्रीय विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे संचालक लुंबिनी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.           श्री. टेकवाणी यांनी उपस्थितांना बालिका दिवसाचे महत्व विषद करुन बालिकांसंबधीत असणाऱ्या कायद्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. श्रीमती पी.एल. वैरागडे यांनी बालिका दिवस या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. अँड. जी. व्ही. मोरे यांनी बालिकांचे अधिकार व कायदे या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. संचालन व आभार संदिप

आरटीओकडून स्लिपर कोच बसेसची विशेष तपासणी मोहिम खाजगी ट्रॅव्हल्सनी प्रवाशांकडून आकारावयाचे भाडेदर निश्चित

Image
आरटीओकडून स्लिपर कोच बसेसची विशेष तपासणी मोहिम खाजगी ट्रॅव्हल्सनी प्रवाशांकडून आकारावयाचे भाडेदर निश्चित जादा भाडे आकारल्यास बस चालक व मालकांविरुध्द होणार कारवाई          वाशिम, दि. 18 (जिमाका) :  जिल्हयात स्लिपर कोच बसेसची विशेष तपासणी मोहिम उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून राबविण्यात येत आहे. तपासणीदरम्यान 17 ऑक्टोबरपर्यंत 216 खाजगी बसेसची तपासणी करण्यात आली. 59 खाजगी बसेसवर मोटार वाहन कायदयाअंतर्गत कार्यवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान खाजगी बसेसवर दंड आकारुन 1 लक्ष 72 हजार 100 रुपये दंड वसूल करण्यात आला. या तपासणी मोहिमेदरम्यान जादा भाडे आकारल्याचे आढळून आले नाही. तसेच प्रवाशांकडून जादा भाडे आकारणी केल्याची तक्रार उप प्रादेशिक परिवहन कार्यालयास प्राप्त झाली नाही. प्रवास करणाऱ्या प्रवशांकडून जादा भाडे आकारणीची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित खाजगी ट्रॅव्हल्सवर मोटार वाहन कायदयाअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने खाजगी ट्रॅव्हल्सकरीता असणारे भाडे दर पुढीप्रमाणे निश्चित केले आहे.              नॉनएसी निमआराम सिटर 2.94 रुपये प्रति कि.मी., एसी सिट

उद्योजकता विकास केंद्राचे मंगरुळपीर येथे 1 ते 9 नोव्हेंबर दरम्यान स्वयंरोजगार प्रशिक्षण

Image
उद्योजकता विकास केंद्राचे मंगरुळपीर येथे 1 ते 9 नोव्हेंबर दरम्यान स्वयंरोजगार प्रशिक्षण           वाशिम, दि. 18 (जिमाका) :  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जिल्हा उद्योग केंद्र आणि स्व. प्रवीण देशमुख बहुउद्देशीय संस्था कवठळ यांच्या संयुक्त वतीने १ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान मंगरुळपीर येथे सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींकरीता स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण आयोजित केले आहे.         उद्योजकतेचे सुप्त गुण असलेल्या युवक-युवतींना शोधून त्यांच्यामधील सुप्त उद्योजकीय गुणांचा पद्धतशीरपणे आखलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमामधून विकास करून स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या विविध उद्योगसंधी विषयीचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणात गृह उद्योग, लघु उद्योग, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, गाय व म्हैसपालन, कुकुटपालन ईत्यादी याशिवाय उद्योजकता प्रशिक्षण ज्यामध्ये उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग संधी शोधणे, उद्योग व्यवसायाची उभारणी, उभारणीचे विविध टप्पे, उद्योग व्यवसायाचे व्यवस्थापन, बाजारपेठ प